मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
कल्याणाचें नाम कल्याणकारक...

श्री कल्याण स्तवन - कल्याणाचें नाम कल्याणकारक...

रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.

कल्याणाचें नाम कल्याणकारक । जपतां लाभे सौख्य अनुपम्य ॥१॥
कल्मष हराया नलगे वाड वेळ । जपतां भावबळें नाम मुखें ॥२॥
समर्थाच्या कृपें अद्बय अनामी । प्रगटला स्वामी श्री कल्याण ॥३॥
कल्याणीं च राहणी कल्याण करिती । सुमंगल वाप्ति होय भक्ता ॥४॥
गावें ध्यावें मनीं श्रीकल्याणनाम । सखा आत्माराम होय त्या़चा ॥५॥

N/A

Last Updated : March 26, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP