मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
नरदेह गेला रे । घात जाला ...

श्री कल्याणचे पद - नरदेह गेला रे । घात जाला ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


नरदेह गेला रे । घात जाला रे ।
नस्ती बला देहबुद्धी । घेउनिया मेला रे ॥१॥
काय केलें रे । वय गेलें रे ।
माझें तुझें घेउनि वोझें । स्वामी अंतरला रे ॥धृ०॥
रिपु साही रे । लुटिलें पाही रे ।
संचित रुका नेला फुका । दैन्यवाणा जाला रे ॥२॥
नाच योनी रे । न चुके जनीं रे ।
मनुष्यदेहा आंचवला । अंधकार जाला रे ॥१३॥
ज्ञान नाहीं रे । ध्यान नाही रें ।
भक्ति नाहीं भाव नाहीं । नाहीं वोळखिले कल्याणाला१ रे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP