मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणस्वामींची पदे|
तो चि तो साधव रे । सख्या ...

श्री गुरूचे पद - तो चि तो साधव रे । सख्या ...

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


तो चि तो साधव रे । सख्या बोधक माधव रे ॥धृ०॥
प्रपंच लटिका निर्फळ दावी । सर्व भूतांतर अंतर भावी ॥१॥
स्वधर्मकर्मी शुद्ध क्रिया करी । भूत कृपाघन दीनास तारी ॥२॥
ब्रह्मचर्यव्रत निस्पृहधारी । ब्रह्यस्थितिवर भिक्षाहारी ॥३॥
शांति छत्रपति निशाण फडके । उत्तम कीर्ति दुंदुभि धडके ॥४॥
मर्दुनि षड्‍ रिपू भजनविलासी । सुखरूप भवभय कल्याणरासी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP