मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
हा असे खेळ दैवाचा । अपराध...

राम गणेश गडकरी - हा असे खेळ दैवाचा । अपराध...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


हा असे खेळ दैवाचा । अपराध यांत कोणाचा ॥धृ०॥

कमलिनी मनोहर बाला । कमलमुखी शोभा वाही ॥
गुणरूप रेखिल्याऐसें । कोठेंही न्यून न कांहीं ॥
मकरंदें रसपूर्णा ती । कोणाला ठाउक नाहीं ॥

पंकांत जन्म परि तिजला ॥
देतांना विधि का निजला ॥
हें पाहुनि जीवची थिजला ॥
परिणाम पूर्व जन्माचा । अपराध यांत कोणाचा ॥१॥

उदयाचलिं श्रीमान् रवि ये । निज तेज तिजगीं पसरी ॥
अति पवित्र त्या स्पर्शानें । कमलिनी जाहली हंसरी ॥
कुरवाळी तिजला स्वकरीं । भाग्याला उरली न सरी ॥
तेजाला तेज मिळालें ॥
दोन जीव एकच झाले ॥
“मी कुठें, कुठें तूं”  सरले ॥
हा धर्मचि सम हृदयांचा । अपराध यांत कोणाचा ! ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP