मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
आहे जो विधिलेख भालिं लिहि...

राम गणेश गडकरी - आहे जो विधिलेख भालिं लिहि...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


आहे जो विधिलेख भालिं लिहिला कोणास तो नाकळे ॥

आहे जो सुखदुःखभोग नशिबीं, कोणास तो ना टळे ॥

आहे जीवित हा हिशेब सगळा--हा बोध चित्तीं ठसे ।

देणें हें गतकाळिंचें सकळही सव्याज देणें असे ॥१॥

आशा मावळल्या; समूळ तुटले हृद्‌बंध नानापरी ।

इच्छा केवळ दुःखदा, अनुभवें हें बाणलें अंतरीं ॥

आतां एकच मागणें तव पदीं, देवा, असे एवढें ।

संसारीं मिळतां न तें, मन सदा शोकाग्नितापें कढे ॥२५॥

आतां दुःख नको, नकोच सुखही, होणार होवो सुखें ।

इच्छा वावरती मनांत, तरि हीं केलीं मुकीं तन्मुखें ॥

"जें कांहीं घडतें सदैव तुझिया इच्छाबळें तें घडे"

ऐसें जाणुनि सोसण्यास मज तें सद्धैर्य दे तेवढें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP