मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
धन्य पंढरी ! धन्य भीवर...

राम गणेश गडकरी - धन्य पंढरी ! धन्य भीवर...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


धन्य पंढरी ! धन्य भीवरा ! धन्य चंद्रभागा !

भक्तांसाठीं वैकुंठींचा नाथ जिथें जागा ॥धृ०॥

स्वानंदाचा गाभा, शोभा ब्रह्ममंडळाचि ।

वैरागरिंचें रत्‍न मनोहर, आशा पुण्यांची ॥

कैवल्याचें निधान केवळ, माता संतांची ।

तो प्रभु झाला सगुण सांवला गोकुळिंच्या रंगा ॥धन्य०॥१॥

भक्तराज तो पुंडलीक या जगीं एक जाणा ।

हांक जयाची ऐकुनि धांवे लक्ष्मीचा राणा ॥

करावयास्तव जगत्रयाच्या अखंड कल्याना ।

कटिं कर, समपद, विटेवरी करि उभा पांडुरंगा ॥धन्य०॥२॥

स्वच्छंदें सच्चिदानंदपद रमे वाळवंटीं ।

’जय जय विठ्ठल’ नाद एक हा संतांच्या कंठीं ॥

पहावया स्वानंदसोहळा सुर करिती दाटी ।

’पुंडलीकवरदा हरि विठ्ठल’ रंगवि दिग्भागा ॥धन्य०॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP