मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍...

राम गणेश गडकरी - डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


डोळा साचा ॥ हा मोरपिसार्‍यावरचा ॥धृ०॥
बुट्टे काळ्या शालूवरतीं । तारे निळ्या नभीं लकलकती ।
कृष्णजलावरी कमलें रमती । तसा डोळा हा ॥मोरपिसावर पाहा ॥
दिसती रंग उघड नयनांतें । आहे विद्युत्-शक्तिहि यातें ।
ओढी वस्तुमात्र; जग म्हणतें ! खरें असावें ॥ कां नाहीं उगिच म्हणावें ?॥
मोहकता तर आहे खास । ओढी ती त्याजवळि जगास ।
वाटे सौंदर्याचा बास । असावा त्यांत ॥ ग्रह पहिला बघतां होता ॥
दिसतें काय कुणा परि यानें । रुदना खुलवी कां हंसण्यानें ।
फुलतें कुठल्या कीं प्रेमानें ? क्षणमात्रांत ॥ हे विचार येत मनांत ॥
सजीवतेचें निर्जिव फूल । नुसती सौंदर्याची भूल ॥
ईश्वरतेची पोकळ हूल । भिन्न रंगाची ॥ ही बैठक भिन्नपणाची ॥
क्षणमात्राची मोहकता ही । चंचलतेनें चमकत राही ।
प्रेमाचें मुळिं पाणी नाहीं । कसला डोळा ? ॥ हे रंग जाहले गोळा ॥
शोभा प्रेमावांचुनि फोल । जिणेंहि याचें कवडीमोल ।
अर्थाविण मेलेले बोल । टाकुनि द्याना ॥ खेळणें मुळाबाळांना ॥
कितीक असले फसवे डोळे । रंगीबेरंगी जणुं गोळे ।
जगांत पाहुनि फसती भोळे । हे ही जोढ ॥ देवा ते डोळे फोड ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP