मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|राम गणेश गडकरी|
वंदन नाटय-मिलिंदा, गोविंद...

राम गणेश गडकरी - वंदन नाटय-मिलिंदा, गोविंद...

राम गणेश गडकरींनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली.


वंदन नाटय-मिलिंदा, गोविंदा तव पदारविंदांना, ।
वंदन बलवन्नंदन, तेविं तुझ्या काव्य-सुंदरी-चरणा. ॥१॥

आधीं कवित्व नाहीं; त्यांतहि कांहीं सुचूं न दे घाई,
परि उत्सुकता वदवी मजकरवीं बोल बोबडे पाही, ॥२॥

चाही चार फुलें हीं प्रेमें हा बाल त्या तुम्हांलागीं, ।
ज्या तुम्हां उभयार्थीं बलवद्‌गुरु सार्थ तेविं वश्या गी. ॥३॥

आहे धाष्टर्य बहुत हें कवि-कुल-गुरु-राज मजहि हें ठावें, ।
परि गुरु-जन-दर्शन-सुख रिक्त-करें म्यां वदा, कसें घ्यावें ? ॥४॥

ती धन्या तव कविता रवि तापवितां उटी जशी अंगीं, ।
खिन्न मना दंग करी गुंगवुनी स्वैर आपुल्या रंगीं. ॥५॥

हरि ताप ‘शाप-संभ्रम’ संभ्रम निपजवि कवित्व रसिक-मनीं ।
येथुनि उचलुनि बसवुनि मनो-विमानीं तयास ने गगनीं. ॥६॥

बोलूं काय अधिक मी ? जरि असती कवि जगीं अमित साच, ।
तरि “ देवल ते देवल ” वदती ते मान्य कां न मजलाच ? ॥७॥

निर्मूनि ‘शारदा’ परि कां तुमची शारदा उगी बसली ? ।
कसली भीति धरी ती शक्ति जिची दांडगी असे असली ? ॥८॥

जिज्ञासा अधिका ही-क्षमा करात्री परी महाभाग, ।
अथवा क्षमा कशाला ? महज्जनांतें कधीं न ये राग ! ॥९॥

द्या रसिकांतें कांहीं अजुनी; घ्या मग सुखेन आराम,
विनवित सचिनय कविवर, नमन करुनिया पुन्हां पदा ‘राम’ ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 14, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP