TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
जो श्रीकृष्णाचे जन्मवृत्त...

मानसगीत सरोवर - जो श्रीकृष्णाचे जन्मवृत्त...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


कृष्णजन्माचे गाणे

जो श्रीकृष्णाचे जन्मवृत्त आइके ॥

होति राखरांगुळी जन्मांतर पातके ॥

दिलि वसुदेवाला देवकि कंसासुरे ॥

देइ दासदासि तो आंदण माणिक हिरे ॥

गजाश्वशाळा सैन्य छत्र चामरे ॥

रथि बैसुनि आपण नगरि मिरवि वधुवरे ॥

ध्वनि वाजंत्र्याचा गगन-मंडळी भरे ॥

हो सावध कंसा नभ-वाणि ऐकरे ॥

ह्या देवकि उदरी होतिल जी बालके ॥

त्यामाजिल अठवा मारिल तुजला निके ॥ जो श्री०॥१॥

ही सुरवर-वाणी ऐकुनिया भूपती ॥

कर धरुनि भगिनिचा ओढि रथाखालती ॥

म्हणे वधून टाकिन पापिणिला या क्षिती ॥

ती दीन होउनी प्रार्थित अपुला पती ॥

मग सरसाउन वसुदेव पुढे बोलती ॥

तू परिस नृपवरा माझि एक वीनती ॥

ह्या देवकि उदरी होतिल जी बालके ॥

ती अर्पिन सकलहि मानि वाक्य मम निके जो श्री० ॥२॥

कथितार्थ परिसुनी कारागृहि ठेविली ॥

मग प्रथम देवकी पुत्ररत्न प्रसवली ॥

वसुदेवे आपली सत्य भाक राखिली ॥

त्या सुंदर शिशुची तनु असुरा अर्पिली ॥

बघुनिया सत्यता त्यासि दया उपजली ॥

जा घेउन या आठवा वधिन मी अरी ॥

शिशु घेउनि निघता ये नारद कौतुके ॥

मनि म्हणति न घडति यासि पुरि पातके ॥जो श्री०॥३॥

सन्माने पूजुनि ही वार्ता कळविली ॥

हे मथुराधिपते बुद्धि तुझी गुंगली ॥

हिचि आठी बाळे उलटसुलट मोजिली ॥

तरि हाचि आठवा शत्रु होय बहु बली ॥

कंसातर भरवुनि नारद लावी कळी ॥

वसुदेवाकरिचे घेत बाळ करतळी ॥

आपटून शिळेवरि उडवि गगनमंडळी ॥

अशि कंसें बाळे साहि तिची मारिली ॥

जिरे गर्भ सातवा राहे रोहिणीस्थळी ॥

मग पुन्हा गर्भवति कंस-भगिनि जाहली ॥

पाहता देवकी जाउनि नृपनायके ॥

वसुदेव सांगतो कंस अला लाडके ॥ जो श्री०॥४॥

भुज पिटूनि बोले तयि ती कंसासूर ॥

मर्दून टाकितो मुष्टिक आणि चाणुर ॥

ही बंदीशाळा फोडिन मी महाविर ॥

स्थापीन मथुरे उग्रसेन नृपवर ॥

स्त्री हरणि करिन मी रुक्मियास जर्जर ॥

शिशुपाळ बंधुसह पाडिन भूमीवर ॥

मी प्रतिपालिन मम प्रिय भगिनीप्रियकर ॥

मज बघुनि थरथरा कापतील अरिवर ॥

मी षोडश सहस्त्र युवतीसह द्वारके ॥

राहीन मजपुढे पडतिल शत्रू फिके ॥जो श्री ॥५॥

हे वाक्य ऐकुनी कंस मनी दचकला ॥

तेथोनि परतता मार्गि बघी शत्रुला ॥

जाय मंदिरास तव द्वारि तोचि भासला ॥

तो भोजनि बसता कृष्ण बघुनि थांबला ॥

करि कोप स्त्रीवरी ताडन करि तो तिला ॥

मग मंदिरि शत्रू कैसा त्वा रक्षिला ॥

तो उठवा बसता येत जात बरळला ॥

धन देता घेता आठवा अवलोकिला ॥

मुखकमल ना दिसे दर्पणि त्या देखिला ॥

दशदिशा विलोकी भरुन कृष्ण उरला ॥

येइना जयासी मंचकि निद्रा सुखे ॥

जो मारिल आठवा त्या देइन भातुके ॥जो श्री०॥६॥

परिजनासि आज्ञा कंसराय देउनी ॥

मम भगिनि-प्रसूती-समय जपा अनुदिनी ॥

नउ महिने नउ दिन पूर्ण तिला होउनी ॥

तो निराकार ये सगुण रूप घेउनी ॥

आनंद जाहला देव येति मेदिनी ॥

कुणि लोटांगण कुणी प्रदक्षिणा घालुनी ॥

नमुनिया स्तवीती, गर्भातुन ये क्षणी ॥

अष्टवर्ष जयाला बाळ असा होउनी ॥

पातला ऐकुनी निजस्तवना सुरमुखे ॥

तनु पाहुनि जाती स्वस्थाना सुर मुखे ॥ जो श्री०॥७॥

दक्षिण अयन आणि तृतिय ऋतु श्रावण ॥

वद्य अष्टमी रोहिणि बुधवासर जाणुन ॥

मध्यरात्रि जन्मले चंद्रउदय पाहुन ॥

जागि झालि देवकी सन्मुख नारायण ॥

ते स्वरूप पाहता रवि शशि ओवाळुन ॥

टाकावे भासते कोट्यवधी उतरुन ॥

कर जोडुन देवकि स्तवन करी निज मुखे ॥

ते ब्रह्मरूप तिशि पूर्णपणे ओळखे ॥जो श्री०॥८॥

कसुनिया कटी तो पितांबर भरजरी ॥

रत्‍नजडित मेखला झगझगते त्यावरी ॥

त्या कदळि पोटर्‍या चरणि नूपरे बरी ॥

वनमाळा कौस्तुभ लोळत नाभीवरी ॥

ती किरिट-कुंडले चंदन उटि केशरी ॥

तो सुवास घेउन वसंत खेपा करी ॥

म्हणे देवकि देवा हरिली मम पातके ॥

मम बाळ हो उनी दावि जगा कौतुके ॥ जो श्री०॥९॥

अंगुष्ठ जयाने घालुनिया निज मुखी ॥

तो बाळ जाहला पाहुनिया देवकी ॥

करिजागृत पतिला नच माये हर्ष की ॥

वसुदेव आलिंगुनि चुंबन कौतुकी ॥

म्हणे बाळ लपवुनी ठेउ कुठे देवकी ॥

ध्वनि झाले गोकुळी नेउन मज ठेव की ॥

म्हणे कृष्णा कृष्णचरित्र इथवर मुखे ॥

कथुनिया राहिली कृष्णपदांबुजि सुखे ॥जो श्री० ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T21:51:01.0900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बुडबुड

  • स्त्री. तोंडाची पुटपुट ; बुटबुट पहा . [ ध्व . ] बुडबुड , डां - क्रिवि . 
  • बुडबुड्याच्या आवाजाप्रमाणें , बुडबुड असा आवाज करुन . 
  • बुटबुट पहा . [ ध्व . ] बुडबुडगंगा - स्त्री . भरभरस्नान ; दंडस्नान ; मुसळस्नान ; धोपटस्नान . 
RANDOM WORD

Did you know?

गणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.