मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
महिरावण -कांता बोले ॥ ...

मानसगीत सरोवर - महिरावण -कांता बोले ॥ ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


महिरावण-कांता बोले ॥

मम मानस तुजवरी बसले ॥ रघुविरा॥धृ०॥

मम मंदिरि रामा येसी ॥

का टाकुनि मजला जासी ॥रघु०॥

अनुचित कर्म हे करिसी ॥

शोभेना तव कीर्तीसी ॥रघु०॥

चाल-ही दिन, असे कमलीन सूर्यभूषण ब्रीद तव गेले ॥

तू सत्य वचन नच केले ॥रघु० ॥महिर०॥१॥

इंद्रतुल्य तेज म्यां रचिली ॥

वरि फुले बहुत पसरिली ॥रघु०॥

अत्तरे सुवाशिक अणिली ॥

पक्वान्ने ताटि बहु भरिली ॥रघु०॥चाल॥

करुनिया मंदिरी थाट ॥ पहातसे वाट ॥

कपट कुणि केले ॥

हे भ्रमर कोठुनी आले ॥रघु०॥महिरा०॥२॥

पतिमृत्युवृत्त म्या कथिले ॥

कपिवरे वचन मज दिधले ॥रघु०॥

मर्कटे कसे फसविले ॥

तू जासि पती मज मुकले ॥चाल॥

जरि असे अबल ही मुग्ध ॥

करिन तुज दग्ध ॥

मर्कटा वहिले ॥

मी कपिकुळ शापिन सगळे ॥रघु०॥महिरा०॥३॥

नच क्रुद्धा होऊ वनिते ॥

द्वापारयुगी गुणसरिते ॥

ऐकगे ॥ पट्टराणि करिन मी तूते ॥

हे सत्य मानि वचनाते ॥

ऐकगे ॥ चाल ॥

मजवरी ॥ रोष नच धरी ॥

स्नेह बहु करी ॥ जाति त्या वेळे ॥

पदकमली कृष्णा लोळे ॥रघु०॥महिरा०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP