मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
हरि -हरात भेद पूर्वि काय ...

मानसगीत सरोवर - हरि -हरात भेद पूर्वि काय ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


हरि-हरात भेद पूर्वि काय मानुनी ॥

काय धेनु-वत्स यात बिघड घालुनी, बिघ घालुनी ॥

कुरुंगिणी-पाडसासि दवडिले वनी ॥

न कळे काय कर्म असे घडले पातका ॥

कमलनयन भुजगशयन विश्वपालका, विश्व० ॥

म्हणुनि विष मी देत यास रक्षि बालका ॥धृ०॥१॥

पात्रि विप्र जेविता मि त्यासि उठविले ॥

करुनि गुरु-द्रोह वृथा संत निंदिले ॥

काय जननि-तात यांसि यष्टि ताडिले ॥

न कळे अतिथास कधी मारिला बुका ॥कमल०॥२॥

पुत्रवधावयालागि यत्‍न बहु करी ॥

प्रथम गजेंद्राचे पदी बांधिला हरी ॥

अग्निकुंडि लोटुनिया ढकलि सागरी ॥

रक्षियला बाळ तिथे शेषतल्पका कमल०॥३॥

शोकभरित माय अंकि घेत तान्हया ॥

पाळियले पूर्ण मास उदरि मी जया ॥

आज कालकूट पती देववी तया ॥

पतिवचना मोडु कसे ताटिकांतका ॥कमल०॥४॥

नाभी जननि हालाहल देइ तू मला ॥

त्र्यंबक त्या पिउनि कसा नीलकंठ जाहला ॥

नारायणा स्मरुनि बाळ प्राशि कुतुहला ॥

सकल तनू अमर होइ मृत्यु येइ का ॥कमल०॥५॥

ऐकुनि असुर क्रोधयुक्त होय अंतरी ॥

सांग तुझा नारायण आहे कुठे तरी ॥

बोले बाळ तात जळी काष्ठभीतरी ॥

सर्व भूति भरुनि उरे दशांगुल निका ॥कमल०॥६॥

थर थर थर कापतसे भूमि अंतरी ॥

स्तंभि लाथ मारे असुर प्रगटले हरी ॥

अंकि असुर धरुनि उदर फाडि दोकरी ॥

सुरवरांनी सुमनवृष्टि केलि बालका ॥कमल०॥७॥

होत असुर-अंत बाळ नमित नरहरी ॥

मातेसह हो उनि पुढे प्रार्थना करी ॥

होई शांत रमाकांत कोप नच धरी ॥

हेचि प्रार्थि लीन कृष्णि अंबुबालिका ॥कमल०॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP