TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
पोचवी पैल तीराते श्रीराम ...

मानसगीत सरोवर - पोचवी पैल तीराते श्रीराम ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गुहकाचे गाणे

पोचवी पैल तीराते श्रीराम विनवि गुहकाते ॥

तुम्हि कोण कुणाचे स्वामी मज कथन करा या कामी ॥

तू ऐक सांगतो आम्ही वसतसो अयोध्या ग्रामी ॥

पाळिले पितृवचना मी करितसे गमन विपिना मी ॥चाल॥

गुहकाची ऐकुन माता ॥

म्हणे नावेवरि रघुनाथा ॥

नको बसू देउ तू आता ॥

हा करिल हिला नारीते ॥

अनिवार विघ्न वारी ते ॥श्रीराम०॥१॥

याचि कीर्ति प्राचिन काली ऐकिली आम्ही जी झाली ॥

हा जाता आपुल्या चाली पदधुळी शिळेवर गेली ॥

रंभेसम कामिनि झाली श्रीरामपदांबुजि रमली ॥चाल॥

काष्ठाच्या नावेवरती ॥ हा चढता अगणित युवती ॥

होतील गळा मग पडती ॥

पोशिता एक अबलेते तव त्रेधा निशीदिनि होते ॥श्रीराम ॥२॥

हसू येत मनी रामासी, पाहोनि भक्तप्रेमासी ॥

पोचवावया आम्हासी परतिरा वित्त किति घेसी ॥

म्हणे गुहक पूर्णकामासी करि पावन मम धामासी ॥चाल॥

चल ऊठ अता श्रीरामा ॥

घे बंधु सिता घनशामा ॥

ही रात्र क्रमवि विश्रामा ॥

तव चरण धुइन मम हाते करि सेवन फल-हाराते ॥श्रीराम०॥३॥

भव भक्ती अष्ट भावे पूजिनि म्हणे या नावे ॥

वरि बसुनि पर तिरा जावे ॥

बालका कधि न विसरावे ॥

वनवास करुनि झणि यावे ॥

या दासा दर्शन द्यावे ॥चाल॥

तू धेनू वत्स मि तुझे ॥

तू हरिणी पाडस समजे ॥

तव दीननाथ ब्रिद गाजे ॥

हरि शीघ्र त्रिविध तापाते ॥

करि पावन या कृष्णेते ॥श्रीराम०॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T21:07:56.3430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

भुसंडा

 • पु. घासलेली , चोळवलेली , जीर्ण आणि झिजलेली , खोमललेली व चेंचलेली , दमलेली भागलेली स्थिति ( दांडग्या व बेपर्वा वागवणुकीखालीं वस्तूंची , जबर श्रमानें प्राण्यांची , शरिराची ); चुराडा ; पीठ ; पिट्टा . ( क्रि० पाडणें , काढणें , पडणें , निघणें , वासणें ). [ भूस हिं . ] भुसंडा खेळ - पु . 
 • भुसडा पाडणारी वागवणूक ; नास , बिघाड होईल अशा तर्‍हेनें कामास लावणें ( प्राणी , वस्तु ). ( क्रि० खेळणें , करणें , लावणें , चालविणें ). 
 • दांडगाईनें फेटाळणें ; तिरस्कारणें ( मुद्दा , मत ). 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.