मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
लावियली कळ देवमुनींनी ॥ ...

मानसगीत सरोवर - लावियली कळ देवमुनींनी ॥ ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


लावियली कळ देवमुनींनी ॥

द्युति शिव हरिला हैमवतीने ॥

झाला दिगंबर जात रुसोनी ॥

गिरिजा जात मागे शोधास्तव ॥ गि० ॥१॥

कोण कोठिल तू सांग सुंदरी, सत्वर मजला गे ॥

पुसे शिव सत्वर मजला गे ॥धृ०॥

हिमालयी शिव पाहुन सतिने ॥

नटली सर्वहि श्रृंगाराने ॥

भुलवि शंकर नृत्यकलेने ॥

उघडी नेत्र वेगे शंकर तो, उ० ॥कोण०॥२॥

सांग तुझी मज ताता जननी ॥

कोणाची तू अससि कामिनी ॥

व्याकुळ केले मज मदनाने ॥

नच बोलसि कागे, सुंदरि तू नच० ॥कोण०॥३॥

नाम खूण का पुसता मजला ॥

स्त्री कोठे तुम्हि टाकुनि आला ॥

झोंबु नका हो मम अंगाला ॥

बोलतसे रागे शिवाप्रति, बोल० ॥कोण०॥४॥

पाहुनिया तव मुखकमलाते ॥

लाजुनिया शशी आला येथे ॥

प्रेमे धरिला भाळि मि त्याते ॥

आलिंगन दे गे भिल्लिणी तू, आलि०॥कोण०॥५॥

का रे जोगड्या ह्या कांतारी ॥

परांगनेसी बोलसि भारी ॥

उग्र पतीची आहे मी नारी ॥

चल सर हो मागे तामशा तू, चल० ॥कोण० ॥६॥

तुझ्या अधिन मी ने सदनासी ॥

ऐकुन गिरिजा धरित करासी ॥

नेउन पूजी शिव कैलासी ॥

प्रेमे पदि लागे कृष्णा म्हणे, प्रेमे० ॥कोण०॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP