TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
जोवरि आहे घरात बहु धन तोव...

मानसगीत सरोवर - जोवरि आहे घरात बहु धन तोव...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


बोधविषयक गाणे

जोवरि आहे घरात बहु धन तोवरि तव गमजा ॥

गेली अवघी रुसून लक्ष्मी मग कैसे मनुजा ॥धृ०॥

बहु मोलाची काया असुनी करिसी मातेरे ॥

नाहि तुझ्या भय मानसि का देवा घरचे रे ॥

पशुसम केवळ काळ घालवुनि विषयी लोळसि रे ॥

मत्तकुंजरासम जन्मोनी कितिकचि मेले रे ॥जो०॥१॥

शांत दांत अनंत अनात्मा अंतरि नच बघसी ॥

क्षणभंगुर या संसाराची हाव बहू करिसि ॥

धन सुत दारा मोह पसारा बघुनी बहु रमसी ॥

माझे माझे लटिके ओझे शिरि वाहुन भ्रमसी ॥जो०॥२॥

सरता खणखण, करिते फुणफुण, प्राणप्रिया रुसली ॥

थकता छण छण मदिरादेवी बाजारी बसली ॥

मान कापते जरा कामिनी देहपुरी शिरली ॥

दूत पातले आयुष्याची दोरी तव तुटली ॥जो०॥३॥

आणुनि अश्रु नेत्री क्षणभर स्मशानि तनु नेती ॥

लावुनि अग्नी भस्म करूनी सदनाप्रति येती ॥

उरली अवघी खणखण तीचे हक्कदार बनती ॥

कर्माचा अधिकारि जीव हा विचार करि चित्ती ॥जो०॥४॥

सावध होई तू लवलाही रामपदी राही ॥

काया वाचा मन भावाने शरण तया जाई ॥

नवविध भक्ती करुनि सतत तू रामरूप गाई ॥

त्रिकाल ध्यानी आणुन ईशा निर्गुणास पाही ॥जो०॥५॥

किति कनवाळू संत दयाळू मम संनिध आले ॥

नामामृत हे बहु प्रेमाने प्राशनार्थ दिधले ॥

नाम सुधा ती म्हणते कृष्णा गटागटा प्याले ॥

सोडुनि विषया दिनरजनी मी हरिनामी रमले ॥जो०॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-31T01:42:52.0230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

gonosomic mosaic

 • Zool. जननकायिक मोझेक 
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.