TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
कुसुम स्वर्गिचे नारद हरि ...

मानसगीत सरोवर - कुसुम स्वर्गिचे नारद हरि ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


पारिजातक

कुसुम स्वर्गिचे नारद हरि ते ॥

देत प्रमोदे रुक्मिणि करि ते ॥

हे कळवी सखि भामेला ॥

का आला मम महाला ॥

म्हणे भामा श्रीरंगाला ॥धृ०॥१॥

त्यागुनि शय्या भूमिवरि या ॥

का निजली सत्राजित-तनया ॥

सखयांनो झडकरि बोला ॥

हरि वदला भामेला ॥

पुरविन मी तव हट्टाला ॥२॥

जरि नावडते हरि मी आता ॥

तरि का घडि घडि सदनी येता ॥

ही भ्रांती पडत मनाला ॥कां०॥३॥

सोळा सहस्त्र जरि मज युवती ॥

परि पूर्णचि तुजवरती प्रीती ॥

धरि चित्ती मम वाक्याला ॥हरि०॥४॥

जरि आवडते हरि मी तुम्हा ॥

तरि सवतिस का देता कुसुम ॥

हे योग्यचि नच तुम्हाला ॥का०॥५॥

हरि म्हणे इतुक्यासाठी रुसणे ॥

हे योग्यचि नच तुज मृगनयने ॥

तव अंगणि लाविन तरुला ॥हरि०॥६॥

करि समजुत हरि अंकी धरुनी ॥

दे आलिंगन प्रेमे करुनी ॥

नमि कृष्णा त्या उभयाला ॥का०॥७॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T22:12:31.6670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सइर

  • वि. स्वैर ; स्वच्छंदी . दास म्हणावया न वळे रसना । सइर वचना वासगळे । - तुगा २९७८ . सइराट - क्रिवि . स्वैरपणें ; इकडेतिकडे ; भलतीकडे . [ सं . स्वैर ; प्रा . सइर ] 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.