TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
ऋतुस्नान मंदिरात एकटी असे...

मानसगीत सरोवर - ऋतुस्नान मंदिरात एकटी असे...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


दौपदीचा धावा

ऋतुस्नान मंदिरात एकटी असे ॥

धरुनि मूद वेणि मला ओढितो कसे ॥

नाहि सुचत काय करू लागले पिसे ॥

अंधपुत्र म्हणतो मला मांडिवरि बसे ॥चाल॥

कसे करू, कुणा स्मरू, समइ यादवा ॥अशा सम०॥

राखि लाज बंधुराज धाव माधवा ॥

दुःशासन दुष्टमती ओढि पल्लवा ॥धृ०॥१॥

भीष्म द्रोण विदुर मौन धरुनि बैसले ॥

पंडुपुत्र पंच व्याघ्र स्तब्ध राहिले ॥

नष्ट कर्ण शब्दबाण ह्रदयि लागले ॥

समय असा, जाणुनिया, तुजसि वाहिले ॥चाल॥

करि त्वरा यदुवरा, धाव बांधवा, त्वरे धाव०॥राखि०॥२॥

ऐकुनिया दीन शब्द पळतसे हरी ॥

नाभि नाभि द्रुपदसुते स्थीरता धरी ॥

नेसविता पीतवसन लाजले अरी ॥

ध्याउनि कृष्ण कृष्णि सदा प्रार्थना करि ॥

विभो नमो, प्रभो नमो, वारि या भवा ॥अता वा०॥राखि०॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-30T22:16:51.4000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रेंकणे

 • अ.क्रि. 
 • ( म्हैस , रेडा इ० नी ) ओरडणे . 
 • घोगर्‍या आवाजाने बोलणे ; गाणे ; मोठ्या , कर्कश शब्दाने बोलणे ; मोठ्याने हांक मारणे . 
 • चरफडणे ; पिरपिरणे ; असंतुष्टपणाने ओरडणे . ( गो . ) रेक्यौंचे . [ रां . रेष = अव्यक्त शब्द करणे ] रेंकत - क्रिवि . हळू ; जडपणे ; आळसटपणाने ; आळसावत ; मंद गतीने ; ( क्रि० करणे , बोलणे , चालणे ). [ रेंगत याबद्दल वरील शब्द या वाक्प्रचारांत आलेला दिसतो . याशिवाय इतर ठिकाणी याअर्थी रेंकणे याचा उपयोग नाही ] रेंकत येणे - ( म्हैस अभिलाषाने ओरडत येते त्याप्रमाणे ) लालचीने , आपण होऊन येणे ; उत्सुकतेमुळे धांवत येणे . आम्हांस श्रीमंत होऊ द्या , मग कोण पाहिजे तो रेंकत येईल . रेंकाट्या , रेकाट्या - वि . म्हशीसारख्या आवाजाचा ; रेंकत बोलणारा ; घोगर्‍या आवाजाचा ; कर्कश आवज असलेला . 
RANDOM WORD

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.