मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
कमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...

मानसगीत सरोवर - कमलवदन राजिवाक्ष धाव गोपि...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


कमलवदन राजिवाक्ष धाव गोपिवल्लभा ॥

करावयासि नग्न मला धरितो दुष्ट पल्लवा ॥धृ०॥

असति वृद्ध भीम इवशुर अंधचि धृतराष्ट्र हा ॥

धरिति मौन प्राणपती मम वसन ओढि हा ॥कमल०॥१॥

पट्टराणि होइ अता अंकि बैसगे म्हणे ॥

धरिते आस, बांध कास जग उदास तुजविणे ॥कमल०॥२॥

सिंहसभे हरिणि हरी, द्रुपदसुता कोंडिली ॥

कुंतिकुमारि लाविलि पणा, विटंबना मांडिली ॥कमल०॥३॥

भीमकजे धाडि त्वरे, कांत तुझा ह्या क्षणी ॥

त्यागि शेज बंधुराज भगिनिकाज करि झणी ॥कमल०॥४॥

मदनतात पळत जात भगिनिमात ऐकुनी ॥

नाभि नाभि वदत हरी पीतवसनि झाकुनी ॥कमल०॥५॥

बघुनि कृष्ण कृष्णवदन सभय शत्रु जाहले ॥

धन्य बंधु-भगिन अशी, वंदि कृष्णि पाउले ॥कमल०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP