TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|मानसगीत सरोवर|
पहिली प्रदक्षिणा , केली ...

मानसगीत सरोवर - पहिली प्रदक्षिणा , केली ...

भगवंताच्या लीला, त्याचे स्वरूप, अवतारकृत्ये व प्रत्येक अवतारातील अनेकविध प्रसंग, यावर आधारीत भजनांचा संग्रह, म्हणजेच मानसगीत सरोवर.


गणपतीच्या प्रदक्षिणाचे अभंग

पहिली प्रदक्षिणा, केली गजानना ॥ देई माझ्या मना, सुबुद्धीते ॥१॥

दुसरी प्रदक्षिणा, केली मोरेश्वरा ॥ चौर्‍याशीचा फेरा, शीघ्र सोदी ॥२॥

तिसरी प्रदक्षिणा, केली विनायका ॥ दावी मोक्ष लोका, शीघ्र माते ॥३॥

चवथी प्रदक्षिणा, केली वक्रतुंडा ॥ क्रोध गजशुंडा, तोडी माजी ॥४॥

पाचवी केली आता, अंबीकेच्या पुत्रा ॥ दावी ज्ञानमित्रा, झणी माते ॥५॥

साहवी प्रदक्षिणा, ऋद्धि-सिद्धि-नाथा ॥ संसारात आता, घालू नको ॥६॥

सातवी केली आता, मोरयाच्या भोती ॥ संसाराचे किती, दुःख सांगू ॥७॥

आठवी प्रदक्षिणा, माझी शूर्पकर्णा ॥ नको जन्ममरणा यातायाती ॥८॥

नववी केली भावे, मदनारी बाळा ॥ दावी विश्व-पाळा, पाय तुझे ॥९॥

दहावी प्रदक्षिणा, चौदा विद्यावंता ॥ हरी माझी चिंता, संसाराची ॥१०॥

अकरा प्रदक्षिणा, झाल्या गणपती ॥ देई मज मती, बारावीते ॥११॥

बारा करुनीया, पुढील तेरावी ॥ करिते हरावी, कुबुद्धि जी ॥१२॥

तेरा झाल्या पुर्‍या, करिते नमस्कार ॥ होवो चिंता दूर, एकदंता ॥१३॥

चौदा संपवुनी, घाली लोटांगण ॥ देई वरदान, प्रेमानंदे ॥१४॥

पंधरावी चालली, माझी चिंतामणी ॥ सोसेना काचणी, प्रपंचाची ॥१५॥

सोळा प्रदक्षिणा, करुनी नमन ॥ प्रार्थी मी चरण, दावी मज ॥१६॥

सत्रा प्रदक्षिणा, केल्या मोरयाला ॥ दोष हरायाला, संचिताचे ॥१७॥

अठरावी घालूनी, मागतसे तुला ॥ साह्य करो मला, राणी तुझी ॥१८॥

विघ्नहरा तुज, एकुणीस केल्या ॥ वासना त्या गेल्या पळोनिया ॥१९॥

वीस करूनीया, पाहिले म्या मुख ॥ झाले बहु सुख, कृष्णा म्हणे ॥२०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2007-12-31T02:58:31.9700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उखळबेरीज

  • स्त्री. एखाद्याचें दुष्कृत्य उजेडांत आणणें ; एखाद्याचें दोषाविष्करण करणें ; टवाळकी करणें ; टोमणे मारणें ; उखाळी . ( क्रि० काढणें ). 
RANDOM WORD

Did you know?

Navchandi Paath explain why it should be done?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.