मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज Translation - भाषांतर जन्म: उरण जवळ पोंपुड गावचेआई / वडिल: विठाबाई / गणपतरावगुरु: १९७४, अबु पहाडावर दत्तशिखरावर ‘ॐ गुरुदत्त’ मंत्र मिळाला.ओम श्रीदत्त ठाकूर महाराज ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराजसाठ वर्षांचे ठाकूर महाराज यांची महती एक उरण दत्तभक्त म्हणून मोठी आहे. हे मुंबईजवळ उरण नजीक पोंपूड या गावचे. पण लहानपणापासून यांना चिंतनाचा व परमार्थाचा नाद असल्यामुळे त्यांचे पुढील आयुष्य मुंबई येथे गेले. यांना दत्तात्रेयाचा व नरसिंहसरस्वतींचा लोभ होता. गाणगापूर येथे गेल्यावर यांना स्वामींचा साक्षात्कार झाला. आणि त्यांनी पोंपूड येथे एक दत्तमंदिर बांधून दत्तभक्तीचा प्रचार केला. हे स्थान पुढे दत्तवाडी या नावानेच ओळखू जाऊ लागले. गुरुचरित्र या ग्रंथाची त्यांनी अनेक पारायणे केली. पुढे यांचा परिवार वाढीस लागला. अनेक भक्तगण त्यांच्याभोवती जमा झाले. गुरुवारी यांनी दत्ताची भजने मोठ्या सुरात म्हणण्यास प्रारंभ केला. लोक त्यांच्या संगीतप्रेमावर आणि दत्तभक्तीवर लुब्ध झाले.यांनी अनेक तीर्थ क्षेत्रांच्या यात्रा केल्या. गाणगापूर येथे दत्ताई नावाचे स्थान निर्माण केले. तेथे अनेक भक्तांसहित यांची उपासना चालू असते. सन १९७१मध्ये यांनी उजैयनी येथील कुंभमेळाचा आनंद उपभोगला. १९७४ साली हरिद्वार येथे हे गेले. त्यानंतर आबू पहाडावरील गुरुशिखरावर यांना ॐ दत्त असा मंत्र मिळाला. १९७५ मध्ये यांनी उरण येथे अवधूत नावाचे स्थान निर्माण केले.दत्त ठाकूर महाराज ॐ श्रीदत्त, ठाकूर महाराजहे प्रथम रेल्वेत नोकर म्हणून होते. १९७६ मध्ये यांनी नोकरीचा राजीनामा दिला. १९७८ मध्ये गाणगापूर येथे यांना नरसिंहसरस्वतींचा प्रसाद मिळाला. १९८० मध्ये चंपकेश्र्वर येथील कुंभमेळात राहून यांनी ३६ दिवस केवळ दूध पिऊन उपासना केली. सन १९८१ मध्ये यांची वाटचाल परमार्थाच्या मार्गाने सुरू झाली. १९८३ मध्ये उरण येथे दत्तात्रेयांची मूर्ती यांनी स्थापन केली. १९८६ मध्ये महाराज पुन्हा हरिद्वारला कुंभमेळ्यासाठी गेले. १९८९ मध्ये अलाहाबाद येथील कुंभमेळा करून काशीला गेले. तेथील दत्तमठाचा जीर्णोद्धार करण्यासाठी यांनी एक लाख हजार एकशे अठरा देणगी म्हणून दिले. १९९० मध्ये उरण येथील दत्तमंदिराजवळ यांनी हनुमान, शिवलिंग, लक्ष्मी यांची मंदिरे बांधली. हे स्थान पुढे ‘नवीन पोंपूड’ म्हणून ओळखले जाऊ लागले. क्षेत्र कुरवपूर येथील श्रीपादवल्लभांच्या स्थानासाठी यांनी पाच हजार पाचशे एक देणगी दिली.आज ठाकुर महाराज यांचे स्थान माटुंगा येथे आहे. येथे अनेकदा गुरुचरित्राचे पारायण होते. ठाकूर यांच्या नावावर अनेक लहानमोठी काव्ये आहेत. श्रीचिलेमहाराज दत्तगीते, दुमदुमली पंढरी, शंकरमहाराज, दत्ताई, वासुदेवानंदसरस्वती अशी यांच्या कॅसेट्सची व पुस्तकांची नावे आहेत.श्री ओम् दत्त ठाकूर महाराजांनी श्री नृसिहसरस्वती स्वामी महाराजांचे इच्छेनुसार श्री क्षेत्र गाणगापूर येथे श्री दत्ताई देवी मंदिर व श्री दत्ताई सदन यांचे बांधकाम भक्तांचे सहकार्याने पूर्ण केले. प्रतिवर्षी श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे वर्धापन दिवस उत्सवासाठी येत असतात. त्यात मुख्यत्वेकरून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व बेळगाव येथील भक्तांचा समावेश असतो.प. पू . ओम दत्त ठाकूर महाराज एप्रिल २०२१ मध्ये दत्तचरणी विलीन झाले. पण त्यांचे आशीर्वाद सदैव भक्तांचे पाठीशी आहेत.॥ यतीरूप दत्तात्रयादंडधारी ॥ ॥ पदी पादुका शोभती सौख्यकारी ॥ ॥ दयासिंधु ज्याची पदें दुःखहारी ॥ ॥ तुम्हांवीण दत्ता मला कोण तारी ॥१॥॥ श्री दत्तस्तुती ॥ ठाकूर महाराजनी स्थापिलेली दत्तमूर्ती कडगंजी ठाकूर महाराजनी स्थापिलेली दत्तमूर्ती ...कडगंजी N/A References : N/A Last Updated : June 29, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP