मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| श्रीमद् गोविंद स्वामी महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती श्रीमद् गोविंद स्वामी महाराज दत्त संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांची परंपरा दत्तात्रेय-चांगदेव राऊळ-गुंडम राऊळ-चक्रधर अशी आहे. Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय श्रीमद् गोविंद स्वामी महाराज Translation - भाषांतर जन्म: ज्ञात नाही.आई/वडील: ज्ञात नाही.गुरु: ज्ञात नाही.शिष्य: वासुदेवानंद सरस्वती.विशेष: निर्याण प्रसंगी वेदांताचे सर्व ज्ञान वासुदेवानंद सरस्वती याना दिले.नृसिंहवाडी क्षेत्रातील तपोनिधींच्या मालिकेतील श्रीमद् गोविंद स्वामी हे ब्रह्मनिष्ठ महापुरूष होते. त्यांचे ब्रह्मानंदांच्या मठातच वास्तव्य होते. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती हे गोविंद स्वामींना गुरुस्थानी मानत असत. श्रीमद् गोविंद स्वामींचे श्रीवासुदेव शास्त्री (प. प. वासुदेवानंद सरस्वती) च्या वर अकृत्रिम प्रेम होते. श्रीमद् गोविंद स्वामींनी निर्वाणकाळी वेदांताचे रहस्य श्रीवासुदेवशास्त्रींना सांगून त्यांना अनेक दुर्मिळ मौल्यवान ग्रंथ दिले.श्री गोविंद स्वामींचा अधिकारनृसिंहवाडीला सनकादिकात गोविंद स्वामी महाराजांचा अर्थात ब्रह्मय्या स्वामी महाराजांचा अधिकार फार मोठा. थोरल्या महाराजांना जे गुरुस्थानी होते त्यांच्या अधिकाराची काय थोरवी वर्णावी ? प्रत्यक्ष दत्त महाराज यांच्याशी बोलत असत. असे जरी असले तरी आज यांच्याविषयी केवळ थोरल्या महाराजांच्या चरित्रात माहिती उपलब्ध आहे, अन्य कुठेही यांचे विषयी माहितीचा आधार नाही. अगदी पहिल्यांदा थोरले महाराज जेव्हा नृसिंहवाडीला जाण्याकरिता निघाले तेव्हा बोरगाव मुक्कामी महाराजांना पहिला दृष्टांत झाला. दृष्टांतात सांगणे झाले कि नृसिंहवाडीला गोविंदस्वामी म्हणून मोठे अधिकारी पुरुष आहेत त्यांचे दर्शन घ्यावे. मजल-दरमजल करीत महाराज वाडीला पोहोचले आणि प्रथम दत्त पादुकांचे दर्शन घेऊन गोविंदस्वामींची चौकशी करणार इतक्यात ब्रह्मानंदांचे मठातील माडीवरून गोविंदस्वामी स्वतः खाली येऊन चिरपरिचिताप्रमाणे विचारू लागले, काय वासुदेव शास्त्री केव्हा आला ? चला माडीवर, स्नान वगैरे करून या. थोरल्या महाराजांची हि नृसिंहवाडीला पहिलीच भेट होती आणि कोणी त्यांना त्या वेळेस ओळखत नव्हते. नेसलेला एक मळकट पंचा आणि एक पांघरलेला असा त्यांचा वेष पाहून हे ब्राह्मण आहेत का ? असा तेथील पुजाऱ्यांना संशय आला. पुजाऱ्यांनी देवाला पाणी घालू न दिल्याने नुसते दर्शन घेऊन महाराज मुकाट्याने वर येऊ लागले. यावेळी गोविंदस्वामी मठात पोथी वाचत होते. दत्त महाराज गोविंदस्वामींना म्हणाले, पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले आहे ते पहा. त्या लांबून आलेल्या ब्राह्मणाला पुजारी पाणी घालू देत नाहीत. हे दत्त महाराजांचे सांगणे होताच गोविंदस्वामी खाली आले. तोवर थोरले महाराज खिन्न चित्ताने वर येत होते. त्यांना गोविंदस्वामी महाराज म्हणाले, शास्त्रीबुवा, पादुकांवर पाणी घातले कि नाही ? यावर घडलेली हकीकत महाराजांनी गोविंदस्वामींना सांगितली. यावर आपला दंड थोरल्या महाराजांचे हाती देऊन गोविंदस्वामी खाली मंडपात आले. थोरल्या महाराजांनी पादुकांवर पाणी घातले आणि पुजारी वर्गाची शंका दूर झाली. नृसिंहवाडीस असताना रात्री कृष्णामाईवर थोरले महाराज हातपाय धुण्यास गेले. रात्री शेजारतीनंतर खाली दत्त महाराजांपाशी जायचे नाही हा नियम त्यांना ठाऊक नव्हता. स्वामी महाराज खाली गेले तेव्हा शेजारती होऊन गेली होती. द्वार बंद असल्याने आता देवदर्शन होणार नाही तेव्हा प्रदक्षिणा घालून जावे या विचाराने ते प्रदक्षिणा घालण्याकरिता पुढे येताच दक्षिण द्वारापाशी एका भव्य तेजःपुंज संन्यासी महाराजांनी त्यांना दरडावून विचारले, शेजारती झाल्यावर इकडे न येण्याचा नियम तुला माहित नाही काय ? त्यावेळी स्वामी महाराजांनी नमस्कार करून क्षमा मागितली आणि हा नियम ठाऊक नसल्याचे सांगितले. नंतर ते संन्यासी महाराज म्हणजे साक्षात नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराज होते असे गोविंद स्वामींकडून समजले.पंचायतन पूजेबरोबर दत्त पादुकांची पूजा करावी असे गोविंदस्वामींनी थोरल्या महाराजांना सांगितले, पण देवाची इच्छा असेल तसे होईल असे म्हणून थोरले महाराज स्वस्थ राहिले. पुढे काही दिवसांनी पादुका पूजनाचा दृष्टांत झाला आणि थोरल्या महाराजांनी पादुका पूजन सुरु केले. गोविंदस्वामी महाराज हे थोरल्या महाराजांना गुरुस्थानी होते. त्यांचे सांगणे म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचे सांगणे हा अनुभव अनेकदा थोरल्या महाराजांनी घेतलेला होता. गोविंद स्वामींचा असा फार मोठा अधिकार होता.गोविंद व मौनी स्वामी हे समकालीन होते. त्यानाही श्री दत्ताचे सांगणे होत होते. प. पु. टेम्बे स्वामींची वाडीत प्रथम कोणाशीच ओळख नव्हती. नेसलेला एक मळकट पंचा व एक पांघरलेला असा वेष असलेले टेम्बे स्वामी ब्राम्हण तरी आहेत की नाहीत? असा पुजाऱ्याना संशय आल्याने त्यांना श्री पादुकांवर पाणी घालू दिले नाही. तेव्हा ते नुसते दर्शन घेऊन मुकाट्याने वर येऊ लागले. इतक्यात श्री गोविंद स्वामींना प्रभूंचे सांगणे झाले की, पोथी वाचण्याचे सोडून मंडपात काय चालले ते पहा. त्या बिचाऱ्या लांबून आलेल्या ब्राम्हणाला पुजारी पाणी घालून देत नाहीत. हे सांगणे झाल्यावर गोविंद स्वामी ताबडतोब उठून खाली आले. वासुदेव शास्त्री खिन्न चित्ताने वर येत होते. त्यांना पाहिल्यावर गोविंद स्वामी म्हणाले 'शास्त्रीबुवा पादुकांवर पाणी घातले की नाही ?' नंतर शास्त्रीबुवानी घडलेली हकीकत सांगितली. तेव्हा गोविंद स्वामींनी आपला दंड त्यांचे हाती दिला व ते श्रीच्या मंडपात आले. नंतर शास्त्री बुआनी गुरुपादुकाना पाणी घातले. त्या वेळी त्यांना गुरुकृपेची अगाध लीला अनुभवता आली. गोविंद स्वामींचा समाधी काळ जवळ आला तेव्हा शास्त्रीबुवा वाडीतच होते. त्यांना त्यांनी दशओपनिशीद सांगून पूर्ण आशीर्वाद दिला. समाधीचे अधलेदिवशी शास्त्री बुवाना उद्या गोविंदस्वामी देह सोडतील असा द्री्ष्टांत झाला तेव्हा बुआ त्यांचे जवळच बसून राहिले. जेव्हा गोविंद स्वामींचे निर्वाण झाले तेव्हा मौनी स्वामीसारख्या जीवन्मुक्त यतीलाही अतिशय दुःख झाले. नंतर यार्थशास्त्र कृष्णेच्या प्रवाहात स्वामींचा देह विसर्जन करण्यात आला. शेवटी मौनी स्वामींचे आज्ञेनुसार बुवाचे हस्ते समराधन करण्यात आले.श्रीमद् गोविंद स्वामी ज्या ठिकाणी ध्यानास बसत त्या स्थानाला ‘गोविंदपूर’ म्हणतात. त्या गोविंदपुरावर एक अश्वत्थ वृक्ष आहे. पादुका असलेली दोन-तीन मंदिरे इ. देवांची मंदिरे आहेत.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वतींच्या अलौकिक जीवनात श्रीमद् गोविंद स्वामींचे स्थान अढळ आहे. N/A References : N/A Last Updated : May 19, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP