मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| श्री निपटनिरंजन दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती श्री निपटनिरंजन दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय श्री निपटनिरंजन Translation - भाषांतर जन्म: चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात जन्म, १६२३आई/वडिल: ज्ञात नाही कार्यकाळ: १६२३-१७३८संप्रदाय: नाथ संप्रदायगुरु: चर्पटनाथसमाधी: आवतार समाप्ती १७३८निपटनिरंजन महाराज श्री निपटनिरंजन हे एक संतकवी असून यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी चिझौतिया जातीच्या गौड ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून यांच्या मनावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयालची भजने हे आवडीने गात. सन १६६३च्या सुमारास आपल्या वृद्ध मातेला घेऊन हे बऱ्हाणपूरमार्गे औरंगाबादेस आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुऱ्यात एकनाथमंदिराजवळ चिलखते वगैरे बनविण्याचा यांचा छोटा व्यवसाय होता. परंतु धंद्यात अपयश आल्याने ते निराश झाले. वृद्ध आई मृत्यू पावली तेव्हा गरिबीमुळे त्यांना तिचा अंत्यसंस्कारही नीटसा करता आला नाही. आईच्याच चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण बैरागी बनले.ध्यानधारणा व योगसाधना यांत त्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी मठाच्या बागेतच यांना दत्तदर्शन झाले. कोणा चर्पटनाथ नामक साधुपुरुषाकडून यांनी देवगिरीवर गुरुपदेश घेतला. अष्टमहासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या. प्रत्यक्ष औरंगजेबावरही या योगी पुरुषाच्या सामर्थ्याचा प्रभाव पडला.त्यांची काही पदे व दोहे प्रसिद्ध आहेत. एक अद्भुत दत्तभक्त - कवी निपट निरंजनआनेकी बाट कोन । जानेका घाट कोन ।ब्रह्म का कपाट कोन । कहासे जीव आया है ।जीव कोन शिव कौन । शिवका स्वरूप कोन ।माया कोन धरनी कोन । धरनी को धरे कोन ।सोवनमे जागे कोन । देहले भागे कोन ।वादचंद लागे कोन । कोन मे कोन समाया है ।कहे निपट निरंजन । इतना नाही बुझे तो ।झक मारन नरदेह पाया है ।हे एक संत कवी असून ह्यांचा जन्म बुंदेलखंडातील चंदेरी गावी गौड सारस्वत ब्राह्मण कुळात झाला. लहानपणापासून ह्यांच्यावर धार्मिक संस्कार होते. संत दादू दयाळ ह्यांची भजने हे आवडीने गात असत. सन१६६३ च्या सुमारास हे आपल्या वृद्ध मातेस घेऊन औरंगाबाद येथे आले आणि तेथेच राहू लागले. औरंगपुरा येथे त्यांचा चिलखते बनविण्याचा छोटा व्यवसाय होता. धंद्यात अपयश आल्यामुळॆ हे निराश होते त्यातच ह्यांच्या वृद्ध मातेचा मृत्यू झाला व त्यांच्या जवळ मातेच्या अंत्य संस्कारासाठी सुद्धा पैसे नव्हते.आईच्या चितेवरची राख अंगाला फासून हे पूर्ण वैरागी बनले. ध्यान व योग धारणा ह्यात ह्यांचा काळ जाऊ लागला. काही दिवसांनी ह्यांना दत्त दर्शन झाले. चर्पटनाथ नावाच्या साधू कडून ह्यांना देवगिरीवर गुरूपदेश झाला व अष्ट महासिद्धी त्यांना प्राप्त झाल्या .निपट निरंजन ह्यांना भेटण्यास औरंगजेब सन १६८२ मध्ये आला तो त्यांना वश करण्यासाठी .कारण त्याने श्री निपट बाबांच्या सिद्धी विषयी ऐकले होते. औरंगजेब आला त्यावेळेस बाबाना ताप आला होता. त्यांनी लगेच ओळखले की हा संतांना शरण नाही तर मराठयांची पाळेमुळे खणण्यासाठी आला आहे. निपट निरंजन व औरंगजेब ह्यांच्यात जो संवाद झाला, त्याच्या ११४ ओव्या उपलब्ध आहेत. ह्या’ निरंजन बानी’ ह्या पुस्तकात दिल्या आहेत‘सून आलमगीर दिल से भी जायेगा दुनिया से भी जायेगा’ बाबानी औरंगजेबाला त्याच्या क्रूर कर्माबद्दल असे सुनावले.दावा बादशहा का करते, और दुवा मांगते है तो फकीर सेकहे निपट ये दिल्ली का दरबार नही फकिरी दरबार हैचारो दिशा बाहर मार- काट किया कत्ले आमऔर फकीर की दुवा मांगने आया है ?औरंगजेबाने निपट बाबाची परीक्षा घेण्यासाठी मक्केची बोरे खायची इच्छा केली त्यावेळेस काय झाले त्याचे वर्णन संतकवी महिपतीनीआपल्या भक्तलीलामृत मध्ये वर्णन कारक आहेमशिदीत मध्य कोनाड्यात गेले जावोनि बैसले तयावेळीपाशह कुराण पढावया आला । अकस्मात याला पाहता हे ।विचारात नाम निपट सांगती । बोलाविले प्रीती म्हणुनी आलो ।पाशहाने तेंव्हा केला चमत्कार । सांडोनि कलेवर मक्के गेला ।तेथे सिद्ध सात होते त्या । नमन बद्री वृक्ष जाण होता तेथे ।निपट हि गेले त्या वृक्षीं देखील । बोरे खाती वाहिले आनंदात ।पाशह प्रसाद मागातचि । म्हणत देऊ मशिदी चाल आता ।गेला शरीरात पाहे कोनाड्यात । बैसोनि हे बोरे खात तेथे ।बोराचा प्रसाद देता लोटांगण । घालोनिया म्हणे ईश्वर हा । - भक्तलीलामृतब्रह्मा पिता है कौन । माया की माता कौनखात कोन पिता कोन । कहाँ वाको घर हैनिर्गुण की जात कोन । सगुन की गोत कोनज्योतीं का ज्योत कोन । कोन परात्पर हैसिद्धां का वेद कोन । योगियो का नाद कोनवेदन का भेद कोन । शास्त्र क्या आधार हैकहे निपट निरंजन । गुरुकI न जाना घरस्वर है की नर या सुकर कूकर है श्री निपटनिरंजन संतकवी श्री निपटनिरंजन मंदिर महाराष्ट्राच्या संत परंपरेत तसेच सूफी परंपरेत निपट बाबा परिचित होते व त्यांच्या इतर संतांशी गाठी भेटी होत असत. संत कवी महिपतीनी पण आपल्या भक्त लीलामृत मध्ये निपट निरंजनांचे वर्णन केले आहे. असा पण एक प्रवाद आहे की निपट व निरंजन ही गुरु शिष्याची जोडी होती व त्यांचे नाव बरोबर घेतले जाते.निपट निरंजनाचें लिखाण हे नाथ परंपरेला शोभेल असेच होते व जास्त करून ते हिंदीतच रचना करत. ह्यांचे किती ग्रंथ उपलब्ध आहेत ह्याबद्दल माहिती नाही.निपट निरंजन ह्यांचे मंदिर औरंगाबाद येथे आहे N/A References : N/A Last Updated : June 20, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP