मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष|
श्री बाळानंद स्वामी महाराज

श्री बाळानंद स्वामी महाराज

दत्त संप्रदायातील सत्पुरूष


श्री बाळानंद स्वामी महाराज श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज

सत्पुरुषांचे नाव: श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज  
आईचे नाव: सावित्री
वडिलांचे नाव: रघुनाथ
जन्म: १७४०
बालपण: महाराष्ट्र खान्देश गिरणा नदीच्या तटावर गिरड गाव  येथे
कार्यकाळ:  इ. स . १७४० ते  १८३९
गुरु: मंगलदास
पंथ: दत्त पंथी
गुरुप्राप्ती

१७६६ मध्ये त्यांनी  घर सोडले व ते श्रीक्षेत्र माहूर येथे पोहचले. त्यांना बाळपणापासून प्रत्यक्ष परमेश्वर (देव) बघण्याची तीव्र इच्छा होती. माहूर येथील ज्ञानी अनुभवी लोकांना भेटल्या नंतर भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शना करीता पाच वर्षे त्यांनी श्रीक्षेत्र  माहूर येथील द्त्त शिखराच्या खाली अखंड तपश्चर्या केली त्यांची श्रद्धा, भक्ती व निष्ठा याचा परीणाम म्हणून साक्षात दत्तप्रभुंनी त्यांना सगुण रुपात दर्शन दिले य प्रसाद म्हणून स्वतः चेच रुप असलेली एकमुखी दत्तात्रयाची मुल्यवान धातची मूर्ती अर्पण केली आणि दरवर्षी  मूर्ती घेऊन  दत्त जयंतीस माहूर येथे येणेची आज्ञा केली. आपण आजही श्री बाळानंद स्वामी यांची तपश्चर्येची जागा व दत्तमूर्ती श्रीक्षेत्र माहूर येथे जाऊन बघु शकता.
तपश्चर्या काळ

इ.स. १७६८ ते १७७३ अशी पाच वर्षे त्यांनी श्रीक्षेत्र  माहूर येथील द्त्त शिखराच्या खाली अखंड तपश्चर्या केली. पहिल्या वर्षी फल आहार, दसऱ्या वर्षी कंद आहार, तीसऱ्या वर्षी पर्ण आहार, चवथ्या वर्षी जळ आहार आणि पाचव्या वर्षी निराहार राहून तप पूर्ण केले.

​ श्री बाळानंद महाराज
अध्यात्मिक कार्य

हिंदू धर्म प्रसार करण्यासाठी गुप्त प्रसार यात्रा केल्या., भागवत वारकरी, कर्मयोग व भक्तियोग जागृती. अध्यात्माची जाणीव निर्माण केली, हरी भक्ती जागवली. त्यांनी लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी अनेक चमत्कार केले. श्री दत्त भक्ती निर्माण केली श्री दत्त जयंती उत्त्सव सुरु केला.
समाज प्रबोधन

स्वातंत्रार्थ उपदेश दिला वारीच्या निमित्याने जनजागृती केली, परधर्माचा भयापासून वाचवले. लोक एकत्रित केले. स्वधर्म, स्वराष्ट्र प्रेरणा देऊन राष्ट्रप्रेम जगवले, धर्म/ कर्म रक्षणार्थ उत्तेजना दिली, स्वातंत्रवृत्ती निर्माण केली
विशेष कार्य

सनातन हिंदू धर्म रक्षणार्थ  प्रचार प्रसार केला.  समाज कल्याण केले, अन्नदान केले, तसेच ज्ञान, विज्ञान कला विषयी उपदेश केला व प्रेरणा दिली.
शिष्य व विशेष कार्य

श्री गोपाळनंद, श्री नारायणनंद , श्री गोपालदास,  श्री विष्णुदास, श्री गोरक्षनाथ, श्री मच्छिन्द्रनाथ, श्री रघुनाथ बुआ, विष्णुदास कन्नडकर, श्री बाळासाहेब,
ग्रंथ

श्री समर्थ बाळानंद गुरुनाथ ओवी चरित्र, दत्तस्वरूप सप्ताह पारायण बाळानंद चरित्र- ७ अध्याय पोथी, श्री बाळानंदांची ३१ अध्यायी पोथी
तीर्थयात्रा

इ.स. १७७४ पासून श्री क्षेत्र दुसखेड - श्री क्षेत्र माहूर अशी दर वर्षी यात्रा सरु झाली. श्री बाळानंद स्वामींनी ६५ वर्षे अखंडपणे श्रीक्षेत्र दुसखेड- श्रीक्षेत्र माहूर पायी यात्रा केल्या. यात्रेचा ही परंपरा त्यांचे वंशज ह्यांनी आजही सुरु ठेवले आहे.  इ.स.. २०१९ मध्य श्रीक्षेत्र दुसखेड- श्रीक्षेत्र माहूर प्रती वर्षी च्या २४५ यात्रा पूर्ण झाल्या या कालावधीत ५ ते ६ पिढ्यांचा कालखंड व्यतीत झालेला आहे. तेव्हापासून आज पर्यंत प्रतिवर्षी ही एकमुखी दत्तमूर्ती घेऊन श्री दत्तजयंतीस श्रीक्षेत्र माहूर येथे जाणेची परंपरा अखंडपणे सुरू आहे. श्री बाळानंद महाराजास मिळालेली  प्रासादीक दत्तमूर्ती आज ही आपण दुसखेड येथील गावात असलेल्या मंदिरात बघू शकता. दत्तस्वरूप श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज यांच्या कृपेने संकटे आपोआप नष्ट होतात.
श्री समर्थ बाळानंद स्वामी महाराज श्री बाळानंद महाराजांची समाधी
महानिर्वाण

इ. स. १८३९ मध्ये दुसखेड येथेच देह ठेवला व त्याच जागेवर त्याचा समाधी बांधण्यात आली आहे.
समाधी

श्रीक्षेत्र दुसखेड येथ श्री बाळानंद महाराजांची समाधी आहे. समर्थांची समाधी गावाजवळच बहुला नदीचे पात्रात पुर्वाभिमुख आहे तशी श्रीक्षेत्र माहूर येथे हा बाळानंद महाराज यांचे विठ्ठल मंदिर (मठ) आहे. हा मठ म्हणजे एका  महान सत्पुरुषाची स्मृती आहे.
श्री दत्तमूर्तीचे मंदिर

श्रीक्षेत्र दुसखेड गाव येथे समर्थ बाळानंद त्यांना मिळालेली प्रासादिक दत्तमूर्ती आपणास बघावयास मिळेल. विलोभनीय दत्तमूर्ती ४ ते ७ इंच उंच व बहुमूल्य धातूची एकमुखी व ६ हात असलेली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 15, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP