मराठी मुख्य सूची|व्यक्ति विशेष|दत्त संप्रदायातील सत्पुरूष| श्रीमद् मौनी स्वामी महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष अद्वितीयानंद सरस्वती महाराज सतगुरु श्री आगाशे काका श्री आनंदभारती स्वामी महाराज श्री आनंदनाथ महाराज अनिरुद्ध जोशी (अनिरुद्ध बापू) ब्रम्हर्षी आत्माराम शास्त्री जेरें श्री नारायणदास श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री बाळकृष्ण महाराज (सुरतकर) श्री बालमुकुंद अथवा बालावधूत (बालाजी अनंत कुलकर्णी) श्री बालमुकुंद बालावधुत दत्त महाराज (करवीर) श्री बाळानंद स्वामी महाराज श्री बाळाप्पा महाराज (श्री स्वामी समर्थ ब्राम्हनंद स्वामी महाराज) श्री भैरवअवधूत ज्ञानसागर (ज्ञानसागरे स्वामी) श्रीमद् ब्रह्मानंद स्वामी महाराज श्री चिदंबर दिक्षीत महास्वामी ओम चिले दत्त स्वामीभक्त श्री चोळप्पा परमपूज्य स्वामी सेवक श्री दादा महाराज जोशी महीपती संत दासगणु महाराज श्री दासोपंत महासाधू श्री दत्त दिगंबर अण्णाबुवा महाराज श्री दत्तगिरी महाराज श्री दत्तमहाराज अष्टेकर ब्रम्हर्षी दत्तमहाराज कवीश्वर श्री दत्तावतार दत्तस्वामी श्री दत्तनाथ उज्जयिनीकर श्री देवमामालेदार तथा श्री यशवंतराव महाराज सद्गुरू देवेंद्रनाथ महाराज दत्तावतरी धूनी वाले दादाजी श्री दिगंबरबाबा वहाळकर श्री दिगंबरदास महाराज (श्री विठ्ठल गणेश जोशी) दिंडोरीचे खंडेराव आप्पाजी उर्फ मोरेदादा श्री दीक्षित स्वामी श्रीसंत एकनाथ महाराज श्री गगनगिरी महाराज परम् सदगुरू श्री गजानन महाराज, अक्कलकोट संत गजानन महाराज शेगावीचा योगीराणा श्रीगंगाधर तीर्थ स्वामी महाराज श्रीश्री गणेश महाराज श्री गोपाळबुवा केळकर श्री गोपालदास महंत महाराज श्रीमद् गोपाळ स्वामी महाराज श्री गोरक्षनाथजी श्री. गोविंद महाराज उपळेकर श्रीमद् गोविंद स्वामी महाराज श्री परमपूज्य गुरुनाथ महाराज दंडवते महाराज गुरु ताई सुगंधेश्वर श्री सदगुरू हरिबाबा महाराज श्री हरिभाऊ निठुरकर महाराज श्रीहरिनाथ महाराज मुखेड प. पू. सद्गुरु डॉ. हरिश्चंद्र जोशी श्री जनार्दनस्वामी सद्गुरू श्रीजंगलीमहाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ श्री मधुसूदन विष्णू कान्हेरे गुरुजी श्री अनंतसुत कावडीबोवा श्री केशवानंद सरस्वती स्वामी महाराज श्री किनाराम अघोरी प. प. कृष्णानंद सरस्वती श्री कृष्णनाथ महाराज श्री कृष्णेन्द्रगुरु श्री गुरुकृष्णसरस्वती (कुंभार स्वामी) श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज सद्गुरू मछिंद्रनाथ महाराज श्री महिपतिदास योगी श्री सद्गुरू मामा देशपांडे श्री दत्तावतारी माणिकप्रभु श्रीमद् मौनी स्वामी महाराज श्री मोतीबाबा जामदार (महिबाबा योगी जामदार) श्री मुक्तेश्वर, श्री संत एकनाथांचे नातु श्री नानामहाराज तराणेकर श्री नारायण गुरुदत्त महाराज (कृष्ण आप्पा) नारायणकाका ढेकणे महाराज श्री नारायण महाराज जालवणकर (त्रिविक्रमाचार्य) सद्गुरु नारायण महाराज केडगावकर श्री नारायणस्वामी श्री नारायणतीर्थ देव स्वामी महाराज औदुंबरचे श्री नारायणानंद स्वामी आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज श्री निपटनिरंजन श्री निरंजन रघुनाथ श्री नृसिंह सरस्वती यांचे अंतरंग शिष्य- गुरुचरित्रातील सिद्ध श्री नरसिंहसरस्वती स्वामी आळंदी श्री नृसिंह सरस्वती पाचलेगावकर महाराज (श्री संचारेश्वर) श्री पद्मनाभाचार्य स्वामी महाराज पंडित काका धनागरे महाराज श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर परमात्मराज महाराज श्रीपादश्रीवल्लभ पिठले महाराज श्री रघुनाथभटजी नाशिककर श्री रामानंद बिडकर महाराज श्रीमद् रामचंद्र योगी श्री रामकृष्ण क्षीरसागर परमपूज्य श्री रंग अवधूत स्वामी महाराज श्री सच्चिदानंद विद्याशंकर भारती श्री साधु महाराज कंधारकर श्री संत साईबाबा श्रीसमर्थ साटम महाराज श्री सायंदेव सद्गुरु शंकर महाराज दगडे श्री शंकर महाराज प. प. श्रीशंकर पुरूषोत्तमतीर्थ स्वामी महाराज श्रीमद् शंकर स्वामी श्री शांतानंद स्वामी महाराज शरद भाऊ जोशी महाराज श्री बाबामहाराज सहस्त्रबुद्धे सद्गुरू श्री शिवाजी महाराज, विडनी श्री श्रीधरस्वामी महाराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री सिद्धेश्वर महाराज प. पू. ब्रह्मयोगी सीताराम महाराज श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट श्री स्वामीसुत महाराज श्री जयकृष्ण जनार्दन बुवा तथा मधू बुआ प. पू. सौ. ताईमहाराज चाटुपळे ॐ श्रीदत्त ठाकूर महाराज श्री उपासनी बाबा साकोरी श्री वासुदेव बळवंत फडके प. पू. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती श्री विद्यानंद बेलापूरकर श्री विरुपाक्षबुवा नागनाथ स्वामी महाराज श्री विष्णुबुवा ब्रह्मचारी प. पु. श्री सद्गुरू विष्णुदास महाराज श्री विष्णुदास महाराज कोल्हापूरच्या विठामाई श्री वामनराव वैद्य वामोरीकर श्री यती महाराज श्री योगानंद सरस्वती श्रीमद् मौनी स्वामी महाराज दत्त संप्रदायातील सत्पुरूष Tags : dattadattatreyaguruगुरूदत्तदत्तात्रेय श्रीमद् मौनी स्वामी महाराज Translation - भाषांतर श्रीमद् मौनी स्वामी महाराज (श्रीमद् प.प. प्रद्युम्नाचंद स्वामी महाराज)जन्म: सोलापुरातील देशस्थ ब्राह्मण कुळात कार्यकाळ: साधारण १८०९ चे दरम्यान विशेष: कृष्णा वेणीचा उत्सव सुरु केला समाधी: मार्गशीर्ष शु. ९मौनी स्वामी महाराज श्रीमद् मौनी स्वामी महाराजमौनी स्वामी हे सोलापुरातील अत्यंत पवित्र अशा देशस्थ ब्राम्हण कुळात जन्म झाला. लहानपणीच ते घराबाहेर पडले. काशी, रामेश्वर इत्यादी यात्रा पायी केल्या. कडुलिंबाच्या पाल्याचा रस हाच त्यांचा कित्येक वर्षे आहार होता. श्री दत्त प्रभूंच्या आज्ञेने त्यांनी वयाच्या २५व्या वर्षी संन्यास आश्रम स्वीकारला व प्रद्युम्न। नंद असे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. परंतु त्यांनी बारावर्षे कडकडीत मौन व्रत पाळल्याने त्यांना मौनी स्वामी किंवा मौनी बाबा म्हणून परिचित झाले. श्रीक्षेत्र उज्जयिनी येथे काही काळ वास्तव्यास असताना श्री गोपाळ कृष्णाचे सुंदर मंदिर बांधले. कृष्णभक्ती व दत्तभक्ती त्यांच्या हृदयातच होती. उज्जयिनी वरून ते सरळ नारसोबा वाडीला पोहोचले व तेथेच वास्तव्य केले.मौनी स्वामी यांचा निश्चित कालावधी माहित नाही. प. पू. वक्रतुंड शास्त्री त्यांना गुरुस्थानी मानत असत व त्यांची शिष्या प्रमाणे सेवा करीत असत. श्री वक्रतुंड महाराज कविश्वर यांचा जन्म इ. स.१८३९ सालाचा. या वरून मौनी स्वामींचा कालावधी साधारण १८०९ च्या दरम्यान असावा. श्री मौनी स्वामी वाडी क्षेत्री श्री नारायण शास्त्री पुजारी वाडीकर यांचे घरी रहात असत. नंतर काही काळ मंदिर परिसरातील एका ओवरीत राहत होते. खडतर तपस्ये मुळे त्यांना वाचासिद्धी प्राप्त झाली होती अष्टसिद्धी त्यांच्या दासी होत्या. वाचासिद्धीचा उपयोग करून त्यांनी असंख्य भक्तांचे कल्याण केले. त्यांना समस्यातून सोडविले. एकदा श्रीमंत कागलकर सरकारांची स्वारी दत्त दर्शनास वाडीस आली, त्यावेळी मौनी स्वामी घरातील सोप्यावरील खोलीत बसलेले होते. सरकारांनी मौनी स्वामींचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितला. त्यावेळी मौनी स्वामी म्हणाले, "आपले दुःख काय आहे ते आम्ही जाणतो. या वास्तूत गोकुळाष्टमी नवरात्र उत्सव सुरु करा आपले दुःख नाहीसे होऊन राजघराण्यात आनंदी आनंद होईल. श्री मौनी स्वामी यांच्या आशीर्वादाने राज घराण्यात पुत्र संतती होऊन आनंदी आनंद झाला. श्री कागलकर सरकारांनी या उत्सवासाठी जमीन व वार्षिक मानधन देऊ केले. गोकुळाष्टमी उत्सव सुरु झाला पण इतरत्र कोठेही सार्वजनिक करायचा नाही असा दंडकही घालून दिला. त्यामुळे मंदिरात इतर जन्मकाल साजरे होतात पण कृष्ण जन्मोत्सव नाही. त्याच्याच सांगणे प्रमाणे श्री घाटे यांचे घरी गुरुप्रतिपदा सुरु झाली. आजही दोन्हीही उत्सव आजही चालू आहेत. मौनी स्वामींना बालगोपाळांचा खूप लळा. सर्व बालके स्वामींकडे खाऊ मागण्यासाठी येत असत. पुढे हाच वारसा वक्रतुंड महाराजांनी चालविला. एकदा वाडीत खूप दुष्काळ पडला. हवालदिल जनता मौनी स्वामींचे चरणी अली. मौनी स्वामी ध्यानस्थ बसले व नंतर सर्वाना घेऊन दत्तचरणाशी गेले व प्रार्थना केली "श्री दत्तप्रभो जनतेवरील संकट निवरणा साठी जलधारांचा प्रसाद द्या" नंतर गुरुमाऊलींचे चरणी साष्टांग नमस्कार घातला व सर्वाना घरी जाण्यास सांगितले. आणि जलधारांचा प्रचंड वर्षाव झाला. पंचमहाभूतांवर केवढा अधिकार! मौनी स्वामींचा कविश्वर घराण्यावर अत्यंत कृपालोभ होता.मौनी स्वामी महाराजांची समाधी गोपाळ स्वामींचे समाधी जवळच आहे. मौनी स्वामी हे जन्मजात नित्य शुद्ध, मुक्त व सप्तमभूमीकरुढ असे योगी होते. त्यांना देहभान नव्हते. कोठेही स्वैर संचार. लोकव्यवहाार असंबद्ध असा होता. कोठे बसतील तेथे बसून राहावे. शरीराकडे दुर्लक्ष. एखादेवेळी शरीराचा एखादा भाग कुत्री कुरतडत पणत्यांचा प्रतिकारही केला जात नसे बऱ्याच काळ ते मौनातच असत.‘मौन व्याख्या प्रकटित’ या आचार्योक्तिचे मूर्तिमंत स्वरूप असणारे श्रीमद् मौनी स्वामी श्री क्षेत्र नरसोबावाडीतील प्रधानमंत्रिमंडळातील आदर्श विदेही महापुरूष होते. सोलापूरातील एका पवित्र देशस्थ ब्राह्मण कुलात मौनी बाबांचा जन्म झाला. जन्मत:च नित्य शुद्ध, मुक्त व सप्तम भूमिकारूढ अशी उत्तम पुरुषाची लक्षणे असणारे ते एक अवलिया होते. सदाचार संपन्नतेने दत्तगुरूंची उपासना करीत पंचाग्निसारखी दुश्चर साधने देहाची तमा न बाळगता परमेश्वर प्राप्तीसाठी केली होती. त्यांसाठी ‘मौन’ हे अत्यंत महत्त्वाचे साधन प्रिय असल्याने ते "मौनीबाबा" म्हणून चिरपरिचित होते.उत्तम प्रकारे सेवा करुन सिद्धावस्थेत पोहचलेल्या मौनी बाबांनी २५ व्या वर्षी दत्तगुरूंच्या आज्ञेने चतुर्थाश्रम स्वीकारला. त्यानंतर श्रीमद् प. प. प्रद्युम्नानंद सरस्वती या नावानी परिचित झाले. खडतर तपश्चर्येमुळेच त्यांना वाचासिद्धी प्राप्त झालेली होती. त्या सिद्धीने अनेक भक्तजनांचे कल्याण केले. शरण आलेल्या अनेक आर्त श्रद्धाळू भक्तांचा उद्धार दयाळू अंत:करणाने केला. पुजाऱ्यांना पूजेसाठी ते मौलिक मार्गदर्शन करीत असत.आपल्या अलौकिक सामर्थ्याने अतिशय दुर्मिळ यज्ञ त्यांनी नृसिंहवाडीत अहिताग्नि भारतीबाबा कवीश्वर यांचेकडून करविला. त्यावेळी यज्ञासाठी आवश्यक असणारे गाईचे तूप यज्ञाच्या वेळेत उपलब्ध न झाल्याने सर्व मंडळी महाराजांना शरण गेली. त्यानुसार वाचासिद्धीच्या योगाने कृष्णामाईच्या पात्रातून भरून नेलेल्या घागरीमध्ये तूप निर्माण झाले. यावरून त्यांच्या अंगी असणाऱ्या दैवी सत्त्वगुणसंपदेची साक्ष पटते. शिष्यांच्या समोर त्यांनी आदर्श ठेवला. यामुळे त्यांची अलौकिक कीर्ती दूरवर पसरली.प्लेगच्या साथीतून भक्तजनांना वाचविणारे, मौनी स्वामी अनेक लीला घडवीत आपल्या सामर्थ्याची जाणीव भक्तांना करून देत असत. दत्तोपासनेचा विशेष प्रसार करण्यासाठी विविध क्षेत्री दत्त मंदिरे उभी केली. कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर कृष्णावेणीमातेचा उत्सव यांनीच सुरू केला. ती प्रथा आजही चालू आहे. आपल्या आदर्श जीवनात शरण आलेल्या अनेक श्रद्धाळू असणाऱ्या भाविकांचा त्यांनी उद्धार केला.वक्रतुंड शास्त्री कविश्वर यांचे निरूपण अलौकिक होते. भागवत, रामायण, महाभारत यांचेवर त्यांचे प्रभुत्व होते. मौनी स्वामींना महाभारत फार आवडत असे म्हणून काही लोक त्यांना भारातीबाबा कविश्वर असेही म्हणत. एकदा कविश्वर शास्त्री ना मोठा अनेक दिवस चालणारा यज्ञ करण्यास प. प. गोविद स्वामी व मौनी स्वामींनी आशीर्वाद दिले. अनेक विद्वान ब्राम्हवृंद यात संमिलीत झाले. तूप कमी पडले आणि मौनी स्वामींनी कृष्णा माईचे जल आणुन तुपात परिवर्तित करून यज्ञ सफल केला. यज्ञ समाप्तीनंतर यज्ञवेदिखालील कासव जिवंत बाहेर पडले. अवभृत स्नानासाठी शुक्लतीर्थपर्यंत प्रचंड मोठी मिरवणूक निघाली. व सर्वाना पक्वान्नाचे अन्नदान झाले. सर्व दत्तमहाराज व सिद्ध मौनी स्वामींची कृपा! मौनी स्वामींनी सोलापूर, पंढरपूर याठिकाणी दत्त मंदिरे स्थापन केली. कृष्णा वेणीचा उत्सव यांनीच सुरवात केला. शरण आलेल्या अनेक श्रद्धावान भक्तांचा त्यांनी उद्धार केला. असे हे मौनी स्वामी वाडीक्षेत्री समाधिस्थ झाले. दत्त महाराजांचे आज्ञेने त्यांच्या पादुका स्थापन करण्यात आल्या. या पादुकांच्या जवळच मौनी स्वामींनी स्थापिलेला गणपती आहे. कागलकर सरकारांनी मौनी स्वामींची मूर्ती स्थापित केलेली आहे. मंदिर सुंदर फारशीने सुशोभित केलेले आहे.सप्तम भूमिकेवर आरूढ झालेल्या विदेही महापुरूष श्रीमद् मौनी स्वामी मार्गशीर्ष शुद्ध ॥९ दिवशी दत्तात्रेय चरणी लीन झाले. श्री दत्तगुरूंच्या आज्ञेने त्यांच्या पादुका स्थापन केल्या. त्याचेवळच स्वामींनी स्थापन केलेल्या उजव्या सोंडेच्या सिद्धी विनायकाचे स्थान आजही कडक व जागृत आहे.दत्तस्वरूप मौनी स्वामींनी पुजारी मंडळींच्यावर विशेष प्रेम केले. त्यामध्ये स्वामींच्या आज्ञेने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो.अशा श्रीमद् स्वामींचे आदर्श जीवन चरित्र हे पुजारी मंडळींच्यासाठी प्रेरणादायी आहे. अशीच प्रेरणा देऊ पुजारी मंडळीच्याकडून सेवा करून घ्यावी ही चरणी प्रार्थना! N/A References : N/A Last Updated : June 18, 2024 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP