मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| देव देवता अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - देव देवता लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत देव देवता Translation - भाषांतर म्हसोबाशेताच्या मेरंवरं म्हसोबा देव ।बंधूले मह्या नाही चागल्याले भेव ।बंधूच्या मेरंवरं देव म्हसोबा जागल्या ।बंधूच्या मह्या सुडया गगनी लागल्या ।लक्ष्मीबाईलक्ष्मीबाई आली आपुल्या शिवारात ।पाणी पिलो कोर्या घागरीत ॥आली आली लक्ष्मीबाई उठत बसत ।बंधू गवळयाचा वाडा पुसत ।लक्ष्मीबाई आली येंघ महा उंबरठा ।तुले देते जागा बैल राजीयाचा कोठा ॥लक्ष्मीबाई आली, तांब्यानं ताक पिली ।बंधूच्या माह्या तनघरा राजी झाली ॥दूहारीच्या शेती जागलीचं होईल कसं ।लक्ष्मीबाईनं देलं मदनाले उसं ।लक्ष्मीबाईचा उबा मळवट ।बंधु जागल्याले सांगे गोठं ।गाईचे गोमतीर अंगणी आला पूर ।बंधू तुमचे दैव थोर ।गाईले झाले गोरे, म्हशीले झाल्या वगारी । बंधू तुमचे दैव फळले आगारी ।बाळाचे शेताले सोन्याची उपनवटी ।लक्ष्मीबाई पाटया देती । बाळा तुह्या शेती वांझ तासं किती?तिथं उतरले महादेव पारबती ।मुंजा वारं नाही वावधन पिंपळ कशानं हालतो ।बंधू तुमच्या शेतात मुंजोबा खेळतो ।रातनंदिवस मन मव्हं धोके खातं ।शिवच्या शेल्याले बाळ मव्ह जागलीले जातं ॥क्षेत्रपाळ मारोती मारोती मेडया उठून उभा राहे ।नेणंत्याच्या संग जागलीले जाय ॥मारोती मेडया चाल मह्या वाडया ।शेंदूराच्या पुडया टाकते पायघडया ॥मारोती मेडयाचा मले शेजार साजतो ।याचे आंघोळीले नित चौघडा वाजतो ॥क्षेत्रपाळ गोसावीपाचा कणसासाठी महादेव गेले चोरी ।उपटूनी धांडा कुणबी भारी ।पाचा कणसासाठी महादेव गेले चोरी ।पार्वती पाखरापरी हाका मारी ।बोलली पारबती महादेवा ।पाचा कणसासाठी कुणब्याचा मार कां खावा ?लावणीचा आंबा ह्याची वाढ बिगी बिगी ।पाणी घालू दोघी तिघी ॥कापसाचा भात माह्या मालणीले ठावं । बयाचं बाळ नितकरे खामगांव ।सीता मालन काहून सुकली तोंडाले ।कापसाच्या गाडया लईदी लागले मोंढयाले ।कापसाच्या जिनामंधी कापसाची घाण ।दादा मव्हा नवा लागला कारकून ।गाव पाडळीची काय वाहवा सांगू बाई ।वाकोडीच्या वढयाले ‘फेडरेशन’ आलं बाई ।माळी हाने मोट माळीन देते हाका ।दवण्याची काडी मोडली बारी देता देता ।आपल्या शेतीले पानभर्या गहू ।ईजच्या डंकिणीनं पाणी जात बहू ॥गाव पाडळीचा काय गवाही देवू बाई ।गावाच्या खालतं आरामशीन आली बाई ॥लव्हाराच्या वाडया लव्हारीन मावली ।दारी लावला निंभोरा धनकर्यावर सावली ॥धन मारु मारु थकली लव्हारीन साजणी ।लोखंडाच्या कामाले आता ईजची जोडणी ॥जाईन शेताले कवळया दुपारा ।मळणी यंत्रात हाब्रेट झालं चुरा ॥पलाटावाल्या दादा नको करु नसनस ।तुपल्या बिजवाईले नाही फुल बारुमासं ॥उन्हाळया दिसाची काय निंदू काळी माती ।बंधूच्या शेताले नरमाधी डोल देती ॥ससु आत्याबाई तुम्ही दळू दळू मेल्या ।आमच्या राज्यात गिरण्या सुरु झाल्या ॥इंदिराबाईचं राज्य आहे उलटं ।गावोगावी काढले नरमादीचे फलाटं ।आसं सरकार हुन्नेरी ।यानं काढली हायब्रीड जवारी ।जमिनीचा भार उचलला कोणं ?गाईच्या पुतानं जुआले देली मानं ॥नको म्हणून बाई सालदार महिनदार ।बैलाचे ताबेदार काळीचे राबणार ॥किंवा पड पड रे पावसा नको आयकू जनाचं ।आसं झालं वाळवन गाईबाईच्या तनाचं ॥वारं वावधन पुढे घाले सैतान ।मांगुन येतो बाई पाऊस राजा निचितीनं ॥पड पड रे पावसा सोन्याचे शिंतोडे ।जोंधळया राजानं कणसं टाकले वाकडे ॥मेघ गं राजानं काळी घोडी शिनगारली ।घडीच्या घडीत पिरथमी वल्ली केली ॥सोन्याची म्होरकी बाळाच्या गं हाती ।म्हसीले मारे हाका घरी येना दौलती ।बैल नंदिण्या बांधू देईना कोणाले ।हाका मारतो राजस धन्याले ।गायीचा गुराखी रानात झोपी गेला ।गाय गं कपिलीनं हंबरुन जागा केला ।किंवाचाडयावर मुठ नंदिले म्हणतो वल्हा ।बोलला पपया दिवस पेरणीचा आला ।बैलाविषयीचा विशेष जिव्हाळा असणार्या रचना.बैल सरजानं मेरंवरं तास नेलं ।उलटून पाहे मातीचं गं सोनं झालं ।बैल बाशिंग याच्या कमयीले मोठं जयं ।जोंधळे साठवता दुखले महे माय ।बैलाचे नाव चिंतामण्या वारु पाठीवर आसूड ।बंधु तुम्ही नका मारु ॥बैल पितांबर्या मांडी घालून बैसला ।नेणंता धनी बाळ मनात हासला ॥किंवाशिनले बैलराज, शिनल्या याहीच्या माना ।नेणंत्या बंधू येळं पारगाची जाणा ।काळया वावरात तिफन टाकते वला । सांगते नेणत्याले बैल बाबल्याशी बोला ।हळू टाक पाय तिफन नाचणी ।पेरणीच्या घाती मोठी बैलाले जाचणी । तिफनं बाईचा चारदोर घसाटला ।घरच्या गाईचा नंदी दिष्टावला ॥पेरणी वाईनं कवटाळलं रानं ।रासण्याची बहु घाणं ॥पिकामंधी पिक पळाटी कामीनं ।जोंधळराजानं अवघी झाकली जमीनं ।गहू हरबर्याचा उडतो फुफाटा ।जोंधळयाराजाले दम मोठा ।पिकामंधी पिक पळाटी कामीनं ।जोंधळंराजानं कुणबी झाला आबादाणी ।पाठीवर चारदोर नंदी आले हुंबरत ।जोंधळयाराजाहून कोणी नाही संबरत ॥पड पड रे पावसा होवू दे वल्ली माती ।गायीच्या चार्यासाठी कुणबी आला धायकुती ।सोन्याच्या घागरमाळा सोईर्याच्या बैलाले ।नका घोकू बाई देवाले ॥काळया वावरात तिफनं नवरी । जानोसा देला बाई सुताराचे घरी ।तिफण बाईचा वखर भ्रतार । मागुन येती वखर हिचे देरं ।किंवाकाळया वावरात तिफन चाले सरसती ।मागून येतो बाई मोगडा हिचा पती ।किंवा मेघराज नवरदेव, आभाळाचा केला डफ ।इजबाई करवली, कशी आली चमकतं ।मेघराज नवरदेव, काळी घोडी सिनगारली ।घडीच्या घडीत, पिरथमी ओली केली ।चांदण्या रातवं वाजे आसुडाचं पान ।दादानं मह्या केलं उसरानं ।चांदण्या रातची वाजे आसुडाची बाळी ।दादा मपला देतो, ऊस रानाले पाळी ।चांदण्या रातच्या बाई नांदी आल्या रसा ।किती सांगू बाई कालचा (कमी वयाचा) मव्हा भाचा ।किंवालगनापरिस तुमचे गुर्हाळं गळती ।नांदीवर दिवे जसे हिलाल जळती ।लगनपरिस हवा गुर्हाळाची केली ।चरकाच्या बैलाले चांदणी (सावली) कुठं देली ।लगनापरिस गुर्हाळाची हवा ।नांदीवर दिवा दिसती चारी शिवा ।लगनाचा सामा आला गुर्हाळाले कामा ।दादानं मह्या लेकी बहिणी केल्या जमा ।किंवा हाती पायी शेला निजला शिराळाचा ।दादाले मह्या शिण आला गुर्हाळाचा । गूळ करण्याची ओवी गीतांतून प्रगटलेली प्रथा कढया आल्या उतू सिपले दूर दूर, गुळवे महे देर ।कढया आल्या उतू सिपले धिर धरा, गुळव्याले मह्या । दादाले जागे कर ॥गुळाचा भाव वाणी पुसतो वाण्याले, दादाचा मह्या ऊस । चालला बेन्याले ॥गुळा तुव्हा भाव वाणी पुसतो सावळा । ऊस बेन्याचा कवळा ।गुळा तुव्हा भाव वाणी पुसतो थळयात । दादा महे मालधनी गुर्हाळातं ।पिकला ऊस, गुळ भंडाराचे वानी ।दादा तुमच्या थळात पाल ठोकून गेला वाणी । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP