मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| राम ओवी आख्यान अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - राम ओवी आख्यान लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत राम ओवी आख्यान Translation - भाषांतर रामग्रंथाचा पोथी अध्यात्म झाला एक ।वनवासा गेला राजा दशरथाचा ल्योक ॥रामग्रंथाचे पोथी अध्यात्म झाले दोन ।वनवासा गेली राजा दशरथाची सून ॥रामग्रंथाचे अध्यात्म झाले तीन ।वनवासा गेले रामासंग लक्ष्मण ॥रामग्रंथाचे अध्यात्म झाले चार ।वनवासा गेले उर्मिलेचे भरतार ॥रामग्रंथाचे अध्याय झाले पाच ।सितेचा सासूरवास रामा तुमच्या पुस्तकात ॥रामग्रंथाचे पोथी अध्याय झाले नवं ।देवा मारोतीनं देला लंकेला खेवं ॥उगवले नारायण उगवता जोडीन हात ।मावळता धरीन पाय ॥देवा नारायणा चिंता अवघ्याची करून जाय ।पाह्यटं उठूनी करते झाडलोट ॥देवा नारायणाचा रथ आला वाडयानेटं ॥उगवला नारायण उगवला आडभिती ।पाह्नती चईतर दुनिया वापरती कशी ॥घेई ना, मी कोणाचं चोरून मारुन ।देव गं नारायण पाह्यती वरुन ॥पाह्यटं उठून मले येशीकडं जाणं ।मारोतीच्या दर्शनाले गोळा झालं अवघे जनं ॥देवा मारोतीच्या आरतीची वेळ झाली ।नेणती मैना कापूराले गेली ॥मारोती मेडयाची आरती होई तिन्ही सांजं ।नेणंता बाळ वाजवतो झांजं ॥दिवस मावळता काम सांगा करतीले । दिवा नेते मारोतीले ॥पंढरीचा देव नाही कोणाच्या देव्हारी ।तुळशीच्या माळा साधू झाले परोपरी ॥पंढरी जायाला चंचल झालं मन ।देवा इठ्ठलाचं कव्हा होईल दर्शन ॥विठ्ठल पिता रुख्मिण माता ।हारला शिनभाग दोहीले वया गाता ॥चंद्रभागी आला पूर वाहून गेला सर्वा घाटं ।तिर्थाचा घेई घोट भाऊ पुंडलीक ॥काहून शिनली कुंभारीची ईटीबाई ।इठ्ठल सख्याचं वझं झालं पाय़ी ॥तुका म्हणजे जीजा टाक ईवाइनात पाय ।जावू वैकुंठाले कशाचे बाप माय ॥पंढरीच्या वाटं साध संताची गंमत ।दिंडया चालल्या रंगत ॥संसारी येवून एकादस कर नारी ।कुडी गेली गावखरी आत्मा गेला थेटावरी ॥किंवास्वर्गलोकात यम धरे मनगट ।काय केलं पाप-पुण्य, खरं खोटं ॥स्वर्गलोकात यमराजाचे बंगले ।पापी उरफाटे टांगले ॥स्वर्गलोकात यमराजाची जाचणी ।जिवाले सोडवनं गुरु कर साजणी ॥संसारी येवूनी भलाई भोग नारी ।संग नाही येत धन मालाच्या धागरी ॥भावाच्या शेजी बहिण बसली बिजली ।सांगती सासुरवास खाली धरितरी भिजली ॥सासरी जाता डोळा येतं पाणी ।परघरी गेली तान्ही ॥नांदाया चालली हिनं वलांडले माळ ।हाती लुगडयाचे घोळ डोळा लागले पनाळ ॥सासरी जाता डोळा येती गंगा ।सखे गं बाईला महिन्याची बोली सांगा ॥सासरी जाता माय माडीतून पाह्ये ।कधी येशील कळपातली गायं ॥गेला मव्हा जीव नको रडू येडया भावा ।जीवाले समजावा बाई गेली तिच्या गावा ॥कशाचं घरदार कशाच्या गाई-म्हशी ।अंत: काळाचे येळ आत्मा गेला उपाशी ॥किंवाजीवा जडभारी धरणी केलं अंथरुण ।जीवाच्या मायबहिणी आल्या पाय उचलून ॥जीव जडभारी कोणा घालू वझं ।गौळणबाई तातडीनं येणं तुझं ॥सुखमधलं दुःख शेज्या पाह्यतील दारुण ।बैया मही येती पडदे सारुन ॥सुख मपलं दुःख दुसरीले कळलं कवा?गौळण मपली गावातली जल्दी घेईल धरवा ॥किंवाबोलले बापाची लेकी सासुरवास भोगा । चरकात ऊस झाला भुगा ॥सुख सांगु येता दुःख उचमळे । पाणी नेतराचं गळे ॥आंब्याच्या वनी कोयल बोले राधा ।साती बहिणी उपासी गेले दादा ॥सटी घालते अक्षर बरम्या करतो तातडी ।नारीच्या जन्माची रेघ पडली वाकडी ॥सीता चालली वनाले सैल्या घेतल्या कोसकोस ।कशाले येता बाई शिरी मह्या वनवास ॥आरुण्या वनात दगडाची केली उशी ।सीताबाई तुले झोप आली कशी ॥जंगलाच्या पाखरा मी तुमच्या आसर्यानं ।तातोबाचे मठी घाल नेऊन ॥सीता बाळंतीण जवळ नाही कोणी ।नेतरं लावूनी तातोबा टाके पाणी ॥सीतेले सासुरवास राम ऐकतो दारुन ।कवळं याचं मन आले नेतरं भरुन ॥सीता बाळंतीण हिले बाळांत्याची वाण (कमतरता)खाली आंथरले केळीचे पान ॥सीतेला सासुरवास जिले आला तिनं केला ।रामासारखा जोडा हिले नाही भोगु देला ॥लाडक्या लेकाचं नाव सीता नाही ठेवू ।सीतेच्या कर्माचा पवाडा झाला बहू ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP