मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| फुगडीचे गाणे अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - फुगडीचे गाणे लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत फुगडीचे गाणे Translation - भाषांतर खडकावर झाड जाई जूईचं जाई-जुईचंकरणफुल मह्या भावजईचं भावजजीचं भावजयी पडली लोकांची लोकांची बशी फुटली काचाची काचाचीफुटली व फुठली दादानं बायकोला कुटली कुटली फु बाई फूऽऽऽकिंवाएरंडाचे पानावर झगमग दिवा ।सवतीची बोळवन आली रे देवा ।आली तशी पळून गेली ।पळता वळता मोडला काटा ॥शंभर रुपये आला तोटा । फु बाई फूऽऽऽकिंवाआठक्या घरात पडक्या घरात चिकन माती ।सोबतीणीचा पाय घसरला जसा हाल्या पसरला फु बाई फूऽऽऽकिंवामाळयाची लेक चाळयाची । कांदा खाते पातीचा पातीचानवरा करते जातीचा फु बाई फूऽऽऽअसा मेल्यानं नवस केला । फकिरा बुडयाला कोंबडं देला ।महागावच्या पोरीनं जयहिंद केला फु बाई फूऽऽऽकिंवानदीच्या काठी राळा पेरलाबाई, राळा पेरला ।एके दिवशी काऊ आला बाई, काऊ आला ।एकच कणीस तोडून नेलं बाई, तोडून नेलं ।सईच्या अंगणात टाकून देलं बाई, टाकून देलं ।सईनी उचलून घरात नेलं, कांडून राळा केला ।राळा घेऊन बजारात गेली, बाजारात ईकून ।तीन पैशाच्या घागर आणली, घागर घेऊन पाण्याले गेली ।मधल्या बोटाले विंचू चावला बाई, विंचू चावला ।रडत पडत घरी आली बाई. घरी आली ।देश्या मंतर खोटा, विंचू उतरेना बाई उतरेचा ।नवर्याचा मंतर खरा, विंचू उतरे भरा भरा ।किंवादोन बायकाची हौस मोठी गडयाले ।दिवाळी सणाले आंघोळ करतो वढयाले ॥दोन बायकाचा पुरुष बसे चुलीपशी ।जळली दाढी-मिशी याचा न्याव गेला येशीपाशी ॥कोण्या गावी गेला बाई फेंगडया पायाचा ।नाही भरवसा याचा घरी येण्याचा ॥काय झाकशिल गोरी मिशाच्या आकडयाले ।चटणी नाही तुकडयाले काय राखती झोपडयाले ॥आळशा नारीनं घेतलं निजून ।भोळा भ्रतार देतो खारका भाजून ॥वाटंच्या वाटसरा काय पाह्यतं खेडयाले ।सोन्याचं कुलूप मह्या बंधुच्या वाडयाले ॥मुलगी.लाडक्या लेकीच्या किती घालू येनी गुढ ।माणिक चौकात मोत्याचा झाला सडा ॥साखर सोजीची सर्व लावली आजीनं ।लाडक्या लेकीचं तोंड जळतं भाजीनं ॥किंवा पराचा परदेशी मैना मही सासुरवासी ।जाऊन पाह्य बाळा तोंडावरची निळी कशी?किंवा सासुरवासनी येनं मह्या वसरीले ।तुपल्यासारखी मैना मही सासराले ॥आईबाप.माय करता माय. माय मव्हळाचा मध ।आंतरी केला शोध ताकाचं होईना दूध ।मपल्या संसाराची चिंता कोणाले आसलं ।झोप बैयाच्या नेतरी नसलं ॥जिव्हाळा.नगरच्या वाटं घोडं कोणाचं एकलं ।नाही धाडलं बाईले तोंड बंधूचं सुकलं ॥दिवस मावळला झाडाझुडावरही बोले रावा ।बैया तुहं बाळ बहिणीसाठी घेते धावा ॥वाटवर वडं गटुळया पानाचा ।बोळवतो बहिणी बंधू कवळया मनाचा ॥किंवाबहिणीच्या घरी भाऊ गेला लय दिसा ।गोफाचा करदुडा उकलती फासा ॥भावाले पाहूणचार शेवग्याच्या शेंगा ।सांगतो मोठेपण तोंडी लावल्या लवंगा ॥भाऊ घेतो चोळी भावजय राग राग ।चोळीची काय गोडी जोडयानं नांदा दोघं ।बोबडे तुहे बोल लागतील गोड । पपया फिरुन पुन्हा बोल ॥लाडली मैना खेलायाले गेली राती ।पैजणाची माती मामा काढे दिव्या-जोती ॥लाडका लेक खिजला आर्ध्याराती । खेळयाले चंद्र मागे हाती ॥राघो मैनाचा पिंजरा जाईच्या शेंडयाले ।राघो तोडतो कळया मैना गुफते येनीले ॥मनाची हाऊस सांगीन शेजच्या भ्रताराले ।कुलूपाचे तोडे सांग सोनाराले ॥भ्रताराचं सुख सांगते मी माहोरी ।काचेचा पलंग याले मोत्याच्या झालरी ॥पिकल्या पानाचे ईडे केले परातीत ।दोहीचं एकचित्त काय करल तिर्याईत ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP