मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| कौटुंबिक जीवन अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - कौटुंबिक जीवन लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत कौटुंबिक जीवनविषयक अनुभूतीची गाणी Translation - भाषांतर जन गेला जतरी, काय जनानं पाहिले ।माय बाप घरी. टूली काय देवाईनं घडलं ॥हातात तागडं वाणी हिंडतो कवाचा ।बाप या बैयाचा सौदा मिळेना दोहीचा ।अंगाच्या कातडयाच्या शिवते वाह्यना ।काशी मपल्या बयाचा उपकार फिटल्या जाईना ॥नको करु पूता मायेची धूळमाती ।तुपल्या जन्मायेळं आस्तुरी कुठं व्हती? ॥माहेर :लेकी तुही जात खायची जायची ।लेकानं केली बोली कायड काशीले न्यायाची ॥बोलले बापाजी लेकी सासुरवास कसा ?चरकात उस घातला जसा ॥बोलले बापाजी लेकी नांदून करावं नावं ।भोवताली सोयर्याचे गाव तिथं निघल तुमचं नाव ॥यावर मुलगी आपल्या सासुरवासाविषयी म्हणते.सासुचा सासुरवास भोगते जिवावर ।तुमच्या नावासाठी निजते शेवावर ॥काम करु करु मले मरुन जायाचं ।बाप या बैयाचं नाव कैलास न्यायचं ।लेक करता लेक साखरंचं पोतं ।तुपल्या संसाराचा जामीन नाही होत ॥स्त्रियांच्या सासुरवासाची सामाजिक प्रथा १.बापानं देल्या लेकी नाही पाह्मली सोय ।कसाबाच्या घरी जशी उभी केली गाय ॥पापं झालं, लय दुनिया बुडाली पापानं ।शिंगीच्या मोलानं, लेक इकली बापानं ॥बोलले बापाजी, लेकी लय झाल्या ।बोलती काशीबैया चिमण्या उडू उडू गेल्या ॥भाऊ-बहिण : आई-बापाइतकेच किंबहुना त्याहून थोडे जास्तच प्रेम त्यांना भावाविषयी वाटत असते. म्हणूनच त्या म्हणतात.मोत्या पवळयाचा पाऊस कुठें पडतो, कुठं नाही ।एवढया दुनियेमेधी, भाऊ-बहिणीले मोठा अप्रूप बाई ॥बहिण-भावंडाची, माया अंतरकाळजाची ।पिकलं सिताफळ, याले गोदी साखरची ॥बहिणीले भाऊ, एक तरी असावा ।चोळी-बांगळी, एका रातीचा इसावा ।बहिणीचा सासुरवास, भाऊ ऐकतो दुरुन ।जाय बहिण मरुन ।ल्योक हा आपला लेक मयना काहून थोडी ॥अशी जन्मली एका कुशीतून जोडी ॥नको घेऊ चोळी बांगडी । नको येवू नियाले सुखी राहाय दादा मले भारज (आधार) घेयाले ॥नको म्हणू दादा नासल घुसल ।ज्याले नाही बहीण त्याचं कितीक साचल?ज्याले नाही बहीण त्याचा खर्च वाचला ।चाटयाच्या पालात दुचित बसला ॥चाडयावर मुठ ठुतो बहिणीच्या नावानं ।बंधुच्या शेताले पिक आलं दुनिन (दुप्पट)दिवाळी दसरा मह्या जिवाले आसरा ।माय गिरजानं मूळ घाडलं उशिरा ।सीता भावजाई, भरली वटी पड पाया ।वरसाकाठी येरझारं, संबाळ मपले बापबया ॥काय सांगु बाई, मह्या माहेराच्या रीती ।तांब्याच्या परातीत, भावजया पाय धुती ॥भाऊ घेतो चोळी, भावजय राग राग ।चोळीची काय गोडी, जोडयानं नांदा दोघं ॥भावापरता भावजय रतन ।सोन्याच्या कारण चिंधी करावी जतन ॥भावापरता भावजय सीता ।शेल्याचा पदर येवू देईना रीता ।दिवाळीची बोळवण काठापदरा रेशीम । पाठच्या बंधुनं आवघं धुंडलं वाशिम ।साडीची बोळवण, लाडीच्या येईना मना ।लाडक्या लेकीले देऊळगावची मिरानी आणा ॥आताच्या समयाने भाऊ नाही बहीणीचा ।खिशात चोळी वाडा पुसे मेव्हणीचा ॥वळवाचा पाऊस पडून वसरला ।दादाले झाल्या लेकी आम्ही बहिणी इसरला ॥चांदणीनं चाँद शिकवला परोपरी ।नाही जाऊ देला बाई भाऊ बहिणीचे घरी ॥याउलट बहिणही कधी भावाविरुद्ध वागतानाचा अनुभव आहे.समयाकारण बहिणीच्या घरी भाऊ राहला सालानं ।पाणी भरतो घागरीनं ।वसरीचा खांब किडयानं कोरला ।संपत्तीसाठी भाऊ बहिणीनं मारला ।भावाची संपत्ती बहिणीचं झालं मन ।केले इखाचे लाडू, बंधु टाकला मारुनं ।सासर :पतिविषयक निष्ठा व प्रेमपाह्मटं उठूनी हात जोडते सुखाले ।अहेव मांगते जोडव्या कुंकवाले ।हेंगडा पांगळा नारी लगनाचा जोडा ॥याची कनगळी धरुन घालली अग्नीचा येढा ।काय करती गौरी देरा भायाची पालखी ॥नार भ्रतारावाचून हालकी ॥जन्म देला बाई माय-बापानं ।शेवट केला बाई परनारीच्या पुतानं ॥भ्रतार नाही बाई आहे पूर्वीचा गोतं ।नाही आठवू देली मावली परमुलखातं ॥कोण्यागावी गेला बाई माह्या जिवाचा मव्हन ।याच्या बिगर गोड लागेना जेवण ॥नको म्हणू गौरी भ्रतार भोळा ।केसानं कापल गळा याले नाही कनवळा ॥नको म्हणून गौरी भ्रतार आला हाती ।विंचवाच्या वेदना व्हतील किती ॥नको म्हणून गौरी भ्रतार आपला । नाग पेटारी तपला ॥येरंड तोडूनी घातला गराडा ।पुरुष नाही धडा नितं नारीचा पवाडा ॥आस्तुरी जन्म देव घालून चुकला ।पराचा घरी बैल भाडयानं जुपला ॥सासु-सासर्याचा आशीर्वाद घे गं सुनं ।मांडीवर तान्हं दौलतीले काय उणं ॥सासु-सासरे मह्या माडीचे कळस ।नणंद पाहूणी शोभे अंगणी तुळस ॥सूनेले सासुरवास करु मी कशासाठी ।मळयात मेथी टाकली नफ्यासाठी ॥लेकाले म्हणते दादा, सुनेले म्हणते बाई ।आपुल्या वाडयात विठ्ठल-रुखुमाई ॥सुनेले सासुरवास नको करु मायबाई ।आपला व्हता चाफा आली परायाची जाई ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP