मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - नवरात्र उपासना

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


आई रेणुकेचं सोन्याचं नाकं ।
हिचा सार्‍या दुनियेला धाकं ॥
आई रेणूकेचं झाडते पटांगण ।
बाळाचा नवस खेळू केलं काटयावर लोटांगण ॥
आई मरी तुही निंदा कोणं केली ?
याले ढाल उलटी झाली ॥
मंगळवार्‍या दिली नाही झाडलं घरं ।
आई रेणूके एवढा गुन्हा माफ करं ॥
चिखलीच्या वाटं आडवी लागे गंगा ।
रेणूकेला नमस्कार सांगा ॥

नाथपंथीय स्त्रियांचे जोगवा गीत
उदभलं उदभलं । नऊचंडी नऊ दुर्गा ।
वटी खारका नऊ रेणूका । गोंधळ घालती ।
खिरी तुप पात्र भरती । उदभलं उदभलं ।

मातंग स्त्रियांचे पारंपारीक गीत
आई या तुळजा देवी या तुळजा ।
आईच्या भगती गोंधळ घालती ।
आई बसली नवरती । नवा रोजची भरती ।
येतील मांगणी जोगणी । हाती कुंकाचं करंडं ।
भांग भरला मोत्यानं । मळवट भरला कुंकानं ।
पाटील पांडे या मिळोनी । गाव लोक या मिळोनी ।
सिवा लग्ना जाती । तुरे धानाचे लेती ।
पुढे वाजंत्री वाजती । मांग मशाली जाळती ।
मशालीच्या उजेडानं । आई अंबिका खेळती ।
सोनं घेऊन घरी येती । बहिन भावाले ववाळती ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP