मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - भाऊबीज आणि संक्रांत

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


सणामंदी सण दिवाळी बहू आनंदाची ।
नेणत्या बंधूची वाट पाहयते गोईदाची ॥
बहिणीले भाऊ एकतरी असावा ।
चोळी बांगडी एका रातीचा इसावा ॥

किंवा
किती पाहू वाट दिवाळया नारीची ।
सावळा बंधू चोळी घेईल चिलारीची ॥
दिवाळीच्या दिसी उटणं गेलं वाया ।
पाठचा बंधू गेला कार्तीक न्हाया ॥
चाटी धुसतो घाटयाले कव्हा इकरा व्हईल ।
भाऊ बहिणीचा येईल हात दिंडाले लावल ॥
भाऊबीजेची बोळवण काठा-पदरा रेशीम ।
पाठच्या बंधूनं अवघं धुंडलं वाशिम ॥
भाऊबीजेच्या दिसी भाऊ बहिणीच्या देशाला ।
खिशात पवळे लालाच्या खिशाला ॥
नको घालू देवा जन्मा बहिणीच्या वाचून भावाले ।
शिनगारली घोडी जाईन कोणाच्या गावाले ॥
भाऊबीजेच्या दिवशी ववाळते चंद्राले ।
आयूष मागते पाठच्या बंधूले ॥

मकर संक्रांत
संक्रांतीचा सण आला एका एकी ।
सुगडयांचं वाण देवू मायलेकी ॥
सणामंदी सण संक्रांत भोगी ।
बापानं देल्या लेकी एका नगरात दोघी ॥
तीळ-लेणं या लुगडयानं ।
सीता मालनी वाण देते सुगडयानं ॥
मातीचा केला हत्ती वर बसली गांधारी ।
वाण देते पतीच्या मंदिरी ॥
उगवले नारायण अहेवाच्या वाडया गेले ।
सीता गं मालनीनं कुंकानं लाल केले ॥
उगवले नारायण सोन्याच्या संदूकात ।
बैयामही लावे कुंकू, जीव मव्हा आनंदात ॥
उगवले नारायण काय मांगू त्याले ।
आयुष मांगते जोडव्या-कुंकाले ॥
नारायण देवा तू एकला तपला ।
अन्‌ मपल्या कुंकाचा टिळा घामा-गई झाला ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP