मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - गौराई शंकराचे गाणे

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


चाल चाल गौराई आपल्या घरी ।
मी नाही येत आपुल्या घरी ।
डोना नाही माय डोन्याची काडी ।
भोळा शंकर बांधे मांडी । बांधून बांधून शाबूत केली ।
चाल चाल गौराई आपुल्या घरी ।
ढवळया दुधावर पिवळी साय ।
गौराई महे लेकी तोडे लेवून जाय ।
कशी लेवू माय शंकर वाट पाहे ।
आपले दुध तापे त्यावर पिवळी साय ।
गौराई महे लेकी पाटल्या लेवून जाय ।
कशी लेवू माय शंकर वाट पाहे ।
शंकर घोडयावरी गौराई चाले पायी ।
ढवळया दूधावर पिवळी साय । आखरी गेल्या गाई ।
दंडवल्या लेवून जाय चांगुना बाई ।
कशी लेवू माय श्रीयाळ वात पाहे ।

सकरुबाचे विसर्जन झाल्यावर परत येतानाची गाणी.
सकरुबा येल्हवला (आळविल, ओवाळिला, लाडविला) पाणी बलवला ।
झिलप्याबाई, झिलप्या, याच वाटनं गेल्या बाई । सकरुबाच्या पालख्या ।
खडेबाई, खडे परातभर खडे । याच वातनं गेलेबाई सकरूबाचे घोडे ।
पाणीबाई, पाणी रानोमाळ पाणी ।
याच वाटनं गेली बाई शिराळाची राणी ।
हिरवी हराळी पिवळे ठसे, गौराई म्हने माहेर दिसे ।
दिसला रे दिसला सोनारवाडा, दंडवळया घडवा रे घडवा ।
घडवल्या रे घडवल्या माय म्हणे लेव लेकी ।
काय लेवू माय शिराळ राजा परण्या जायं ।

किंवा
नाचून नाचून दमली गं सई । कुंकाचं बोट आजून नाही ॥धृ॥
कुंकाचा बैल खरेदी केला । गावचा पाटील जामीन देला ।
देणं आलं जीवावर म्हणून । बहिणीच्या घरी मुक्काम केला ।
नाचून नाचून दमले गं सई । हळदीचं बोट अजून नाही ।
हळदीचा बैल खरेदी केला गावचा माळी जामीन देला ।
हाणून मारून येशीच्या दारी । लक्ष्मण माळयाची बहिण । माश्या मारी ।
नाचून नाचून दमली गं सई ॥धृ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP