मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| नैतिक शिक्षणाची लोकधारणा अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - नैतिक शिक्षणाची लोकधारणा लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत नैतिक शिक्षणाची लोकधारणा Translation - भाषांतर हासु नको गौरी, तुला हासनं भवलं ।धुतल्या साडीला, कोणी वंगण लावलं ॥जाईन सभेतून । सभेची मी लेकबाळ ।खाली पाह्म पाप्या । मीरी मही पाय-घोळ ।जाईन उभ्या गल्ली । उभारीचा मव्हा रंग ।खाली पाह्य पाप्या । धरणी होईल दुभंग ।शिकवलं ग्यानं । माय माह्या गिरजेनं ।उभं नाही राहु बाई । परपुरुषाच्या सावलीनं ।आपला पुरुष । पांघरावी शालजोडी ।परपुरुषाशी बोलायची काय गोडी ।कुळाच्या नारीनं । कुळाचा केला नास ।धन्याची कोथमिरं । मळयाबाहेर गेला वास ॥घराची आस्तुरी जसं तुळशीचं रोपं ।परनारीसाठी घेतो गल्लीनं झोपं ॥मव्हन्या नारीनं मव्हनं घातली दह्यातं लोकाचा भ्रतार हिनं घेतला कह्यातं ॥अंधार्या रातचे कोण वाळवते राळे ।अस्तुरीचे चाळे पुरुषा तुले काय कळे ।दोन बायका करण्याची समाजरुढी दोन बायकांची चाल लावली देवानं ।पारबतीवर गंगा सवत आणली देवानं ॥दोन बायकांची हौस मोठी गडयाले ।दिवाळी सणाले आंघोळ करतो वढयाले ॥दोन बायकांचा दादला करे गावाचा निवाडा ।याच्या घरी नित सवती सवतीचा झगडा ।विधवा विवाह, परजातीत लग्न करणे याचा समाजनिषेधपाटाच्या नारीचा सहा महिने गजर ।असा उतरला हिच्या साडीचा पदर ।रांडपण घालती रांडपणाचा कळस ।धाकली बहिण दारी वाळते तुळस ।नारीनं केला संग, नाही पाहिला जातीचा ।कुंभाराच्या दारी दिवा जळतो मातीचा ।अन्य काही सामाजिक रुढींचे प्रगटीकरण.जवाई, जवाई नको म्हणू येडे बाई ।जिनं देला जन्म तिचा तिले झाला नाही ॥ताडक्या लेकीचं नांव, सीता नाही ठेवू ।सीताच्या कर्माचा पवाडा झाला बहु ॥संबरत सोयरा कणीं नाही याच्यापाशी ।काय करायाचे याचे, बारा बैल बारा म्हशी ॥नांदाया चालली देशमुख पाटलाची कन्या ।हिच्या बुदीले चांदण्या संग महार राखण्या ।गावचे पाटील, चिखलीले गेले ।राघो तुमच्या मामीयाचे शिरी मंदील झळकले ॥मेहेकार तालुक्याले कोन बोलतं पाखरू ।बैयाचं बाळराज, जमिनदाराचं लेकरु ॥नांदाया घालली मैना लाडं कोडं ।मामा धरे धोड चुलते चालती पुढं ।मामाच्या वाडयाले, मामा भाचीच्या पाया पडे ।घरच्या घरी काशीचं तीर्थ घडे ॥शकून-अपशकून, दृष्ट लागणे ह्या प्रथाही समाजात दिसतात.शेजीचा मुराळी मह्या दारावरुन गेला ।त्याचा पायगुण झाला । बंधु राती न्यायाले आला ।माय-बापाले एकला याले घोकू नये बाई ।निंघते धनुराज, याले हटकू नाही बाई ।अशी झाली दिट, मह्या नवतीच्या लालाले ।तिन्ही वाटंची माती, जाते निंबाच्या पाल्यालेविविध जाती धर्माचे स्नेहपूर्ण समाजजीवनगुरु-भाऊ केला जातीचा मुसलमान ।याच्या बिब्या मले करती सलाम ।गुरु-बंधू केला जातीचा माळी ।त्याच्या बागेत केळी, नित धाडतो नव्हाळी ।सळु बहीण केली, म्यातं लभान्याची लेकं ।भेटीची आगद. गाडी हाणं तांडयालोकं ।माह्या सोबदनी वाण्या बामनाच्या पोरी ।तांब्याच्या धागरी, भेटी व्हतील गंगेवरी ।सखू बहिण केली, चंभाराची भागु ।बंधुच्या मह्या कोटावर काढे राघू । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP