मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| पिंगागीत अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - पिंगागीत लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत पिंगागीत Translation - भाषांतर दोन पिंपळ शेजारी शेजारी । एक पिंपळ तलवारी तलवारी ॥तलवार्याले सांगुन द्या । आमचा खेळ मांडून द्या मांडून द्या ॥आमच्या खेळाले साखळया साखळया । साखळया देवू वान्याले वान्याले ॥वान्या वान्या कुंकु दे कुंकु दे । कुंकू देवू गायीले गायीले ॥गाय गाय दुध दे दुध दे । दुध देवू चांदाले चांदाले ॥चांदा चांदा घोडे दे घोडे दे । घोडे देवू बापाले बापाले ॥बापा बापा लुगडे दे लुगडे दे । लुगडे देवू मायले मायले ॥माय माय चोळया दे चोळया दे । चोळया देवू बहिणीले बहिणीले ॥बहिणी बहिणी पिवश्या दे पिवश्या दे । पिवश्या देवू नणंदेले नंदंले ॥नणंदबाई एकली । पान खाया शिकली शिकली ॥तांबूळ दादाला ईकली ईकली । तांबूळदादा नकटा नकटा ॥शेंडीला धरुण उपटा उपटा । शेंडीले आळया शेंगा शेंगा ।घाल गं पोरी पिंगा पिंगा । एकीचा की दोघीचा, दोघीचा ।मामाजीच्या लेकीचा लेकीचा । मामची लेक गौरी गौरी ॥हळद लावा थोडी । हळदीचा उंडा बाई उंडा ॥रेशमाचा गोंडा बाई गोंडा । रेशमाच्या गोंडयावर पाय कसा देवू ॥मामाच्या लेकची नाव कसे घेवू बाई नाव कसं घेवू ।नमो घालू देवा जन्मा बहिणीवाचून भावाले ।निंबोनीवाचून शोभा नाही बगिच्याले ॥किंवाबोळवण केली बाप बैया येशीलोक ।भाऊ आले मेरं लोक । भासे आले शिवलोक ।आंगडं टोपडं पाळण्याच्या कळसाले ।बैयाच्या बाळाले काय तान्हं राजसाले ।किंवामाय इतकी मया बहिणी इतका कनवळा ।हात नाही घालू बाई बिरान्याच्या गळा ।किंवामाय लेकीचं भांडन जसी दुधाची उकळा ।बैया मनाची मोकळी ॥लाडक्या लेकीले सासू पहा करणीची ।जाणल तहान भूक हरणीची ॥किंवाइनी सवंदरी नको म्हणून मोठी झाली ।शेंग चवळीची येला गेली ॥गौरी मही मैना काळया सावळयाले देली ।माणका-शेजी रत्नटिक जडवली ॥किंवाअशीलाले कमशिल पाह्मतं कसूनं ।चंदन बेलाचं लाकुड झिलपी निंघती तासुनं ॥जिठं जाशील जीवा तिथं तुहं गोतं ।वासनीच्या येलावानी बैया गेली मोकलतं ॥मपलं मामकुळ कोण पुसतं इथं तिथं ।चांदडी रुपया याले डाग नाही कुठं ।घरची अस्तुरी जसं मुंदीचं ठिकडं ।पर नारीसाठी करे मुंडासं वाकडं ॥सुनले सासुरवास नको करु मायबाई ।आपला होता चाफा आली परायाची जाई ॥लेकाले म्हणते दादा सुनले म्हणते बाई ।आपल्या वाडयात विठ्ठल रुख्माई ॥सासरा महादेव सासु मही पारबती । कपाळाची कुंकू घोळात वागवती ॥बाप मव्हा राजा काशीखंडाचा वड ।माय गं गिरजा मही पाणी त्रिगुणीचं गोड ॥किंवापुसतील शेज्या तुले भाऊ किती जण?चांद-सूर्या दोघं बापाजी नारायण ॥मोत्या पवळयाच्या पाऊस कुठं पडतो कुठं नाही ।एवढया दुनियेत भाऊ बहिणीले अप्रूप बाई ॥किंवाभावापरत भावजय रतन । सोन्या कारण चिंधी करावी जतन ॥सीता भावजय मले हासून बोलली । कुंकू कपाळाचं जसी डांळिबी खुलली ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP