मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - सामाजिक अनुभव

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


कापुस येसु येसु पर्‍ह्याटी पल्डी सुनी ।
आताच्या समयाले, कोणाचं नाही कोणी ॥
संगती सोबती एका दांडा पाणी पिती ।
येरंड वाया जाती उसाले गोडी किती ॥
नको म्हणूनं गोरी मपलं आसंच चाललं ।
दुपारची सावली कव्हातरी कलल ॥
काकडीचा येल कडु निंबावरी गेला
संगतीचा गुण कडुपणा अंगी आला ॥
संसारी येवून भलाई भोगनारी ।
संग नाही येत धन मालाच्या घागरी ॥
संसारी येवूनी करु नाही माझं माझं ।
गावाच्या खालतं, जागा आहे साडेतीन गजं ॥

राजकीय व सामाजिक जीवनाचा आविष्कार
राज्यामंधी राज्य फिरंग्याचं खोटं ।
आताच्या समयाले नंदा (नणंदा) उचलती भावजईचे ताटं ॥
दिल्लीचा बादशहा अमदाबादले चालला ।
छंद मव्हना नारीचा लागला ॥
मामा करे रामराम, भाचा करतो सलाम ।
बोलले दादा, भाचे निजामाचे गुलाम ॥
आंग्रेज म्हणतं काहुन काँग्रेस भिकारी ।
नेईन म्हणतो तुपल्या देशाची सुपारी ॥
आंग्रेज म्हणतं काहून काँग्रेस नादर ।
परमीटावर मिळेना धोतर ॥
आंग्रेज राजा ईवाइनातून येतो जातो ।
कागदाच्या केल्या नोटा, येडे लोक भुलवतो ॥
कंट्रोल लावलं बाई, गावच्या पाटलानं ।
मोजतो साखर्‍या, छटाकाप्रमाणं ॥
मारले गांधीबाबा रक्त्ता भरली कढई ।
काँग्रेस सरकारनं जितली लढाई ॥
मारले जगदेवराव, रक्ता भरला हौद
पळाली परायाची फौज ॥

कुंकू लावणे (साखरपुडा)
मैनाने मांगलं आकुलं बाळापूर ।
एकली मैना नका देवू इतक्या दूर ॥
मैनाने मांगलं दारी सावली बोरीची ।
मैनाच्या मामीयानं फडकी सांगीतली जरीची ॥
मैनाने मांगलं घोडयावरचे लोक मोया ।
चित्राबाईले कुंकू लावून गेला राजा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP