मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| होळी अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - होळी लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत होळी Translation - भाषांतर शिमग्याच्या दिसी होळी रचतो शेणाची ।पाटलाची पोळी घेईन मानाची ।सणामंदी सण होळी बाई बाळंतिण ।सख्यानं उभी केली ताफ्याखाली कळवातीण ।होळीला नवस करण्याची रुढी नवस बोलले होळीले पाच येढे ।अंगडयाचा राया जावळाची मैना कडे ।सणामंदी सण शिमगा गाजतो ।सख्याच्या वाडयाले, हंडा रंगाचा शिजतो ।सणामंदी सण, होळीबाई बाळंतीण ।गुराखी दिवाळी गाण्याचे स्वरुपआटंबोट बाई मोगाटं । हरण पळे तटं तटं ।गाई म्हशीनं भरले वाडे । बळवंत राजा हो ।दिवाळी हालते जोरानं । पदर हाले वार्यानं ।काळा बैल शिंग शिंगोटी । ह्यानं काढली नागाटी ।नांगरुन वखरुन तयार केली । त्यात पेरली पळाटी ।पळाटी आली नखी बोटी । येचता येचता भरली वटी ।नेऊन टाका खामगांव पेठी । खामगांव पेठची डिकमाळ उंची ।पैसे भेटले त्याच्या आणा । दहा पाच म्हशी ।त्याचं दुध कोन बा खाईल ।आमच्या गावचा गुराखी खाईल बळीवंट राजा हो ऽऽऽदिवाळी चाले जोर्यानं । पदर हाले वार्यानं ।आटं बोटं गाई गोमाटं । गाई म्हशीनं भरले वाडे ।इठुन संपले आमचे गाणे । आता म्हणावे मागच्याने । बळवंत राजा हो ऽऽऽपहिला गट कोडी घालतो मह्या मळयातून जायी गोपाळा । तुह्या मळयातून जायीआरगुन जायी तिरगुन जायी बिन शेंडीचं काय ?ते सांगून दे गोपाळा मग जाय रे ऽऽऽदुसर्या गटाचे उत्तरआरगुन जायी तिरगुन जायी बिन शेंडीचे ।टेकळं (जमिनीतील कंदफळ) गोपाळ सांगून दे ।म्हणून चालले रे गोपाळा ।मारोती बा नवरा कधी व्हाशील?शिरी बांशिग परण्या जाशीलएवढी करणी कशासाठी । मारोतीच्या धोतरासाठी ।मारोती बा नवरा कधी व्हशील?शिरी बाशिंग परण्या जाशील ।एवढी करणी कशासाठी । मारोतीच्या पटक्यासाठी ।मारोती बा नवरा कधी व्हशील?शिरी बाशिंग परण्या जाशील एवढी करणी कशासाठी । मारोतीच्या बारबंदीसाठी ।मारोती बा नवरा कधी व्हशील?शिरी बाशिंग परण्या जाशील आटं बोटं गाई गोमाटं । हरण पळे तटं तटंगाई म्हशीनं भरले वाडे । दिवाळीचं तेल ना वाटेती कोंगडमत्ती तिच्या घरात दिवा ना बत्ती बळीवंत राजा हो.नवीन घरी परत नवे गाणे म्हणतात. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP