मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - फेरावरील कथाकाव्य

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


अवं तू फुकाचे बटकोरी । अवघं धूनं का धूवावं ।
पाण्याले लावू नको दगडावर ठेवू नको ।
धुनं धून बगळयाचे पंखं ।
विजूरा रडती फडती । केस कुरळे तोडती ।
साती बगळे जमा झाले काहून रडता बिजूराबाई ।

खाडाड सुनेचे गाणे
खाऊन पिऊन झाली तंबूर । जीव देते मी सासूवर
गेली बारनीच्या घरी हे पैशाचे आणले शंभर पान ।
पतीसमोर जीव देते मी सासुवर ।
गेली वाण्याच्या दुकाना आणलं सव्वाशेर खोबरं ।
एका शेराचे केले बोंडं । तीन शेराच्या केल्या पोळया ।
ताट केलं सासुदेखत । जेवत बसली सासूसमोर ।
खाऊन पिऊन झाली तंबूर । जीव मी देते सासूवर ।
खाऊन पिऊन राधाबाई फुगल्या आणि फुसकन गेल्या ।

फुगडीगाणे
आपरी खाली टिपरु, टिपर्‍या खाली गळा । बायका केल्या सोळा ।
केल्यात्‌ केल्या पळू पळू गेल्या फू फू
पळता पळता मोडला काटा । शंभर रुपये आला तोटा ॥

बीभत्सरसाची गाणी
गावखोरी पांढरीत पेरला आंबट चुका बाई चुका ।
मांडवाचे दारी ईव्हाई घेतो ईहिणीचा मुका ।

किंवा
अवेह ईहिनबाई तुम्ही येवायले चला ।
हत्ती एवढ उंदिर तुमच्या काष्टयातून गेला ॥

किंवा
शालूच्या पडदण्या देणं होतं आमच्या मनी ।
तुम्ही आणल्या भाडयाच्या वर्‍हाडणी ।
मांडवाच्या दारी इहिन बसली मुताया ।
ईव्हाई म्हणतो इहिनीले काय वाजतं ।
गाव जेवणाचे वरण शिजतं ॥

किंवा
नणंदबाई नणंदबाई तुमच्या परकोराले जाई ।
रातीचं भांडण तुमच्या शिगोरीच्या पायी ॥

किंवा
नणंदबाई नणंदबाई तुमच्या परकराले कसे ।
राती भांडण झाले तुम्हाले मुसलमान पुसे ॥

किंवा
सगळे उखाणे मह्या मुखात ।
सगळे मुंगळे ईहिनीच्या मुखात ।

किंवा
वान्याच्या घरावर गुळाचा भेला ।
मेला पण ल्योक नाही झाला ॥  

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP