मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - फुगडी गाणे

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


शिणला जीव मव्हा शिण शिणकरी ।
तान्हां घेते मांडीवर शिण गेला वरच्यावरी ॥
पाय पाय घसरी वाण्याची वसरी ।
वानी गेला मोळीले । तीन टिकल्या चोळीले ॥
येथे ‘स’ व ‘ल’ घी पुनरावृत्ती झाली आहे.
पाणी घालू घालू तुळशीला आले फुलं ।
तुळशीचं नाव पतिव्रता ठुलं ॥
भाळयाच्या मळयात माळी दादाचं लेकरू ।
पिकलं अंजीर झडा घालते पाखरु ॥
उगवले नारायणे उगवले लाल लाल ।
याहीनं पांधरली शालं ॥
दिवस माळवला दिवा लाव देवळीत ।
बांधवाचे मह्या नंदी आले गव्हानीत ॥

फुगडी गीत
एक हाताची फुगडी । मामा घेतो लुगडी ॥
लुगडीचा दोरा । आमचा मामा गोरा ॥
आमची मामी काळी । करवंदाची जाळी ॥
शेवंती गेली बोराले । तीन खाल्ले बोरं ॥
तिले झाले पोरं । एक पोरगं मेलं । गाडीत टाकून नेलं ॥
गाडी वाजे खुळूखुळू । शेवंती रडे मुळूमुळू ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP