मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - महालक्ष्या

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


सणामंधी सण मायलक्ष्मी आनंदाची ।
नवरी आणा गोईंदाची ॥
दाळी साळी लिंपण देऊ बळदाले ।
मायलक्ष्म्या आळया भादव्याच्या महिन्याले ॥

किंवा
लक्ष्मीबाई तूहा जन्म वनात ।
दूरनागिरीच्या (द्रोणागिरीपर्वत) रानात ॥
रख्यांत धरली मनात । तिठून निघली वनात ॥
माय लक्ष्मीचा सण । तोडले कवळे पान ।
मायलक्ष्मीचा सण । पीढ बसाया टाकलं ते सोनियाचं झालं ॥
मायलक्ष्मी आली । अवघड कोनियाचे काठी ।
निवंद केला नानापरी । लक्ष्मी जेवी घरी ।
अंगी चोळी भरजरी । चहुकडून बसल्या चौघीजणी ।
मंधी बसल्या लक्ष्मीबाई । लक्ष्मीबाई बसल्या न्हाया ।
न्हाऊन धुवून उठल्या । आंबील देवून तृप्त केल्या ।
सुपानं वाती निजवल्या । कापूरानं ओवाळल्या ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP