मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| खेळगाणी अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - खेळगाणी लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत खेळगाणी Translation - भाषांतर गाण्याचे स्वरुप : १कोंबडयाला कधी नवरा समजून गाणे म्हणताना आढळतात.कोंबडा कू म्हणतो कू म्हणतो ।आजारी बाजारी जाय म्हणतो. जाय म्हणतो ।खारीक खोबरं आण म्हणतो, आण म्हणतो । येता जाता खातो माय खातो माय ।मव्हच नाव घेतो माय, घेतो माय ।आपुन जाता औताले औताले ।मलेच धाडतो गवताले गवताले । गवतात होता काटा काटा ।त्यो मुल्डा पायाले पायाले । सांगुन धाडा बैयाले बैयाले ।शिळे कुटके खायाले खायाले ।बयानं धाडल्ली चिठ्ठी चिठ्ठी ।ती पडल्ली दह्यात दह्यात ।आसं दही नासलं नासलं ।फुटक्या डोळ्यात घातलं घातलं ।फुटका डोळा भाऊ भाऊ ।वडील मही जावू जावू ।वडे वडे चिरती चिरती ।वडयाले नाही सांबार सांबार ।गावाले नाही कुंभार कुंभार, कोंबडा कू. ॥सागरगोटी बाई सागरगोटी ।बाई मव्हं गाव पंढरपूर बाई पंढरपूर ।कसं दिलं बाई इतक्या दूर, इतक्या दूर, इतक्या दूर ।सागरगोटी बाई सागरगोटी. कोंबडा कू म्हणतो कू ।पाय-पायघसरीएक पाय शेणाचा, एक पाय मेणाचा ।पाय पाय घसरी, वाण्याची वसरी ।वाण्याची वसरी, बलवा तिसरी । तिसरी कशाले, कोंबडा खेळायले ।बलवा चौथी. चौथी कशाले ।सांबार वाटायलें. सांबार वाटला ।बलवा कुंभार, कुंभार कशाले ।हांडे दांडे उतरायले, उतरले हांडे । बलवले पांडे, चिठ्ठी लिहायले ।लिहिली चिठ्ठी, बलवा वठ्ठी ।धुणं धुवायले, धुतलं धुणं ।बलवा सून. पाय धुवायले ।फुगडी रचनादोन हाताची फुगडी, मामा देतो लुगडी ।लुगड्यातले गोंडा, फु बाई फु नवरा कानकोंडा फु ।बशी बाई बशी काचाची बशी ।लागू नको पोरी मले एकादशी फू ऽऽमाळयाची लेक कांदा खाते पातीचा ।नवरा करते जातीचा फु ऽऽआपण दोघी वाण्याच्या वाण्याच्या ।हातात पाटल्या सोन्याच्या सोन्याच्या फु ऽऽइंग्रजी शाळेले लावले काच ।आपण दोघी मँट्रीक पास फु ऽऽपारामांगं सांडल्या तुरी ।येसता येसता दमल्या पोरी फु ऽऽतिकडून आला वाणी धरली मही वेणी ।सोड सोड मेल्या मही सोबतीन गेली फु ऽऽनदी काठी शेवाळगोटा । बाई शेवाळगोटा ।सवती सवतीचा झगडा मोठा फु ऽऽ तुही मही फुगडी तल्वार गं, तल्वार गं ।फुटतील महे बिल्लोर गं, बिल्लोर गं ।फुटतील तर फूटतील काचाचे । उद्या भरु पेचाचे फु फू ऽऽअपु गेले टपू गेले, ठेसनात गेले ।झुम झुम तोडे मह्या बापाजीने केले फु फू ऽऽझिम्मानदीच्या पलीकडे कोकणपट्टी बाई कोकणपट्टी । सुपार्या आल्या देठोदेठी बाई देठोदेठी ।तोडायला गेले भरली वटी बाई भरली वटी ।गंगावती दारी उभी इंद्रावती बाई इंद्रावती ।नदीच्या पलीकडे कोकणपट्टी बाई कोकणपट्टी N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP