TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २५०१ ते २५५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २५०१ ते २५५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


ओव्या २५०१ ते २५५०
तैसे हे माया ईशादि तृणांत । सत्यत्वें नसोनि जाहले समस्त ।
यासि प्रेरणा निर्विकारत्वें होत । ब्रह्मात्मयाची ॥१॥
परी यासी स्वतां चेष्ठवीना । ना न चेष्टवी हेंही असेना ।
हेंचि उद्भवून पावतें अवसाना । तया अधिष्ठान मात्र ॥
सर्पविकारा जेवीं दोरी । तेवीं सर्वां आधार निर्विकारी ।
मग प्रेरी अथवा न प्रेरी । परी आळ अधिष्ठानीं ॥३॥
ऐसिया हेतु श्रुति जाणे । ब्रह्मात्मया प्रेक्षक म्हणे ।
येऱ्हवीं पहातां प्रेरणा न होणें । निज परब्रम्हीं ॥४॥
हेंही जग जया सत्य वाटलें । तयासी श्रुति उगीच बोले ।
कीं हें परमात्मसत्तें वर्तलें । तया स्मरा अखंडिता ॥५॥
जया साधका मिथ्या कळतां । जाहलेंचि नाहीं वाटे चित्ता ।
तेव्हां प्रेरकत्वाची वार्ता । मिथ्या होय ॥६॥
म्हणोनि श्रुति निःशंक बोलली ।
परी अंतरीं सारांशता भिन्न भाविली ।
कैशीं ही भाविकें समजाविलीं । परी यथार्थ नव्हे ॥७॥
यथार्थ विकारें जो प्रेरक । हा ईश्र्वराचाचि धर्म एक ।
कारण कीं ईक्षणादि शक्ति अनेक । असती विक्षेपादि ॥८॥
यासीही श्रुति बहु प्रमाण । कीं प्रेरक सर्वज्ञ ईशान ।
आणि युक्ति अनुभवेंही कडून । ईशेंविण प्रेरण नव्हे ॥९॥
जयाच्या भीतीनें वायु वाहे । हे श्रुति ईश्र्वरा प्रमाण आहे ।
बुद्धीचा प्रेरक गायत्री म्हणताहे । ब्रह्म परमात्मा ॥
ब्रह्मात्मा प्रेरक जें म्हणितलें । हें उगें सहजत्वें बोलिलें ।
ईश्र्वराचे भीतीनें म्हणतां जाहलें । विकाररूप प्रेरण ॥११॥
या सर्वांसी जे भीति होय । ते सामर्थ्याविणें म्हणों नये ।
सामर्थ्य तेंचि विकारी जेणें भय । पावती सर्व ॥१२॥
तें सामर्थ्य ईश्र्वरींच असे । ब्रह्मीं विकाराचें नांव नसे ।
हें विचारें पहावें मानसें । विचारवंतीं ॥१३॥
तस्मात् ईशाचें प्रेरण तें विकारी । ब्रह्मात्मा प्रेरक निर्विकारी ।
हें दृष्टांताचिये अनुकारी । स्पष्ट कळे तो ऐका ॥१४॥
जैशी रहाटमाळा लोकीं करिती । तेणें पाणी येतसें वरुती ।
तयासी चक्रें बहुत असतीं । ते दाटिती एकमेकां ॥१५॥
परी ते वृषभ लावितां चाले । नातरी निवांत राहे उगलें ।
तो बैलही न चाले पहिले । हाकणाराविण ॥१६॥
ऐसे वृषभ आणि पुरुष हाकितां ।
आणि रहाटमाळेची सामग्री समस्ता । एका असती भूमीवरुता ।
तिच्या आधारें चालती ॥१७॥
हा दृष्टांत पाहतां विचारून । दाष्ट्रांताचें होय विवेचन ।
अर्थात् विकारी निर्विकारी कोण । कळेल स्पष्ट ॥१८॥
देहादि प्राण बुद्धि स्फूर्ति । हे एक एकांचे दाट असती ।
जैशी का रहाटमाळेची स्थिति तेवीं कळासिली ठाईं ठाईं
यासी जीव हा वृषभ जुंपिला । साभिमानें खांदा वाहे उगला ।
तेणें चालतसे देहयंत्रमाला ।
सुखदुःख पाणी उफाळे हाकिता पुरुष तो इश्र्वर ।
वर्तवीत प्रारब्धानुकार । हाचि जीवासी बलात्कार ।
विक्षेपशक्ति चाबुकें ॥२१॥
असो राहाटमाळा वृषभ नर । येका असती भूमीवर ।
तेवीं देहादि जीव आणि ईश्र्वर । ब्रह्मात्माधिष्ठानीं ॥२२॥
भूमि निर्विकारें आधार सहज । तेवीं ब्रह्म परमात्मा अचोज ।
तेथें प्रेरणेचें कैचें व्याज । सर्वाधार मात्र ॥२३॥
बैलासी हांकितां पुरुष ईश्र्वर । विक्षेपशक्ति चाबुकाचा मार ।
तेणें भयें चाले हें जगयंत्र । तस्मात् ईश प्रेरक खरा ॥२४॥
ऐसें विचारून खरें पाहतां । विरोधाची नसे वार्ता ।
आतां सावधान असावें रविदत्ता । चालिला प्रसंग निरोपूं ॥२५॥
पंचभूतें पंचयोनीचीं शरीरें । त्यांत पंचप्राण दशइंद्रिय सारे ।
मन बुद्धि विषयांत वावरे । हे जड चंचळपणें ॥२६॥
विद्या अविद्या ईश्र्वर जीव । पांचवी माया स्फूर्ति स्ययमेव ।
एवं हीं बत्तीस तत्त्वें सर्व । क्षणक्षणां अन्यथा होती ॥२७॥
ईशाचि प्रेरकत्त्वें विकारी । क्षणक्षणें होत अन्यथा परी ।
मा जीवादि देहांत तों सार्री । हे तों अन्यथा मुळींचे ॥२८॥
असो हे सारे अन्यथा होती । क्षणक्षणां विकारें पालटती ।
परी सर्वांत अनुस्यूत जे चिती । अन्यथा नव्हे ॥२९॥
जैसें आकाश घटीं मठीं व्यापून । किंचित् अन्यथा न पावे चलन ।
तैसेंचि ब्रह्म परिपूर्ण सच्चिद्घन । सर्वत्रीं परी अन्यथा नव्हे ॥३०॥
जरी ब्रह्मादि कीटकापर्यंत । कोठें अज्ञान कोठें ज्ञान स्फुरत ।
परी ब्रह्म आत्मा अन्यथा भूत । कधीं नव्हे सहसा ॥३१॥
नाना देहामध्यें राहून । सूक्ष्मासी होय वर्तन ।
त्याचा जीव हा धरी अभिमान । प्रेरकपण ईशाचे ॥३२॥
साभिमान येथवरी घेतला । कीं आपणचि देह होऊन बैसला ।
बळें कल्पिलें पापपुण्याला ।
मीच कर्ता म्हणोनी तेणेंचि वारंवार उपजे मरे ।
नाना योनीचीं पावुनि शरीरें । उंच नीच स्वर्ग नरक अपारें ।
भोगी अनंत कल्प ॥३४॥
आधींच अज्ञानें अन्यथा जाहलें । वरी अन्यथात्वें भ्रमूं लागलें ।
कोठें सान थोर कीं वाईट चांगुलें । परी अन्यथा क्षणक्षणां ॥३५॥
इतुकेही अन्यथात्व पावती । परी सर्वत्रीं व्याप्त जें चिती ।
अन्यथा नव्हेचि कल्पांतीं । आदि अंतीं कां मध्यें ॥३६॥
अज्ञानकालीं जें निजरूप । अन्यथा विकारी नव्हे अल्प ।
मा जो जाणेल स्वकीय स्वरूप । तेथें अन्यथा कैंचें ॥३७॥
अज्ञानी अन्यथा जाहलें नाहीं । परी वाउगेंचि मानिती सर्वही ।
कीं मीच वर्तणूक जें कांहीं । अन्यथा होय माझी ॥३८॥
मी हा पुण्य पाप करितसें । तें भोगिलेंचि भोगीन आपैसें ।
ऐसिये अभिमानाचे ध्यासें । भोगणेंचि लागे ॥३९॥
ऐसा हा अज्ञानाचा जल्प । हाही तोंवरीच संताप ।
जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अपरोक्षें न कळे ॥२५४०॥
तोंवरीच मी जीव मज बंधन । मीच पावे जन्ममरण ।
जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिद्घन । अपरोक्षें न कळे ॥४१॥
तोंवरीच षड्विकार बाधती । क्षणक्षणां अन्यथा होती ।
जोंवरी ब्रह्मात्मा सच्चिनमूर्ति । अपरोक्षें न कळे ॥४२॥
तोंवरीच तूं एक मी एक । माझें तुझें नानात्व सकळिक ।
जोंवरी ब्रह्मात्मा आपण येक । अपरोक्षें न कळे ॥४३॥
तोंवरीच हे जग सत्य वाटे । ब्रह्मादि कीटकांत सान मोठें ।
जोंवरी ब्रह्मात्मा घनदाटे । अपरोक्षें न कळे ॥४४॥
तोंवरीच दारापुत्र धनादि । विषय लालचीनें संपादी ।
जोंवरी ब्रह्मात्मा आनादि । अपरोक्षें न कळे ॥४५॥
तोंवरीच अंकित कर्म धर्माचा । वर्ण आश्रम कीं देव वेदाचा ।
जोंवरी ब्रह्मात्मा अभिन्न साचा । अपरोक्षें न कळे ॥४६॥
तोंवरीच स्वजन मोहिती । उपजीवना परतंत्र करिती ।
जोंवरी ब्रह्मात्मा स्वानंदमूर्ति । अपरोक्षें न कळे ॥४७॥
तोंवरीच सुखदुःखाचा शीण । पापपुण्य हे बागुल दोन ।
जोंवरी ब्रह्मात्मा सघन । अपरोक्षें न कळे ॥४८॥
तोंवरीच उत्तम अधम गति । अधोर्ध्व स्वर्ग नरक भासती ।
जोंवरी ब्रह्म परमात्मा निश्चिती । अपरोक्षें न कळे ॥४९॥
तोंवरीच स्वामिसेवकभाव । मी भक्त तूं अससी देव ।
जोंवरी ब्रह्मात्मा स्वानुभव । अपरोक्षें न कळे ॥२५५०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-20T05:04:54.3170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विधुम

  • n. अष्टवसुओं में से एक, जिसकी पत्नी का नाम अलंबुसा था (अलंबुसा देखिये) । 
RANDOM WORD

Did you know?

मंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site