मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २४०१ ते २४५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २४०१ ते २४५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


ज्ञाते निजांगें ब्रह्म होऊनी । सर्वांतें जाणती सर्वज्ञपणी ।
परी जाणों न शकती ध्यातेहीपणीं ।
ऐशिया अनुभवा बाध गर्भस्थ मातेतें नेणती ।
तैसेचि बत्तीसही न जाणती । तस्मात् बत्तीस म्हणतां जाणों लाहती ।
या युक्तीसीही बाध आतां स्वरूपें स्वरूप जरी जाणावें ।
तरीही बाधचि थोर संभवे । द्रष्ट्याचे प्रतीतीस जें यावें ।
तें म्हणावें दृश्य ॥
दृश्यत्व जरी जाहलें ब्रह्म । तरी केवढा हा विरोध परम ।
आणि आपआपणासी जाणे सम । ऐशी युक्तिही नसे ॥४॥
डोळा पदार्थ रूप पाहे । जिव्हा रसातें चाखों लाहे ।
उभयतां भिन्न कर्ता कर्म आहे । म्हणोनि होती ग्राह्य ग्राहक ॥५॥
परी डोळियानें डोळा पाहिला । कीं जिव्हेचा रस जिव्हेनें चाखिला ।
ऐसा वृत्तांत कवणें नाहीं ऐकिला ।
कवणाचे मुखें तैसें ब्रह्म ब्रह्माहूनी वेगळें । असतें जरी स्वकीय लीळे ।
तरी कश्चित्ही अनुभवाचे डोळे । जाणावया शकती ॥७॥
ऐसें द्वैत तों ब्रह्मीं नाहीं । तरी अनुभवावें कवणें कहीं ।
तस्मात् अंगेंचि व्हावें न जाणतांही । सर्वनिरासें साधकें ॥८॥
डोळिया डोळा पाहणें न घडे । ब्रह्मासी ब्रह्माचा अनुभव न जोडे ।
जेथें द्वेताचें भानचि मोडे । तेथें जाणणें कैंचें ॥९॥
जरी डोळा डोळिया देखेना । तरी डोळा डोळियासी चुकेना ।
कीं जिव्हा जिव्हेसी चाखेना । वरी अरसज्ञ नव्हे ॥
तैसें ब्रह्म ब्रह्मासी जाणों न शके । तरी काय ब्रह्मत्वा ब्रह्म मुके ।
न जाणतांही स्वतःसिद्ध निकें ।
ब्रह्म ब्रह्मीं निघोट येथेंही कल्पना ऐशी करिसी ।
कीं ब्रह्मीं ब्रह्म असे अविनाशी । परी कवणें रीतीं ये प्रतीतीसी ।
निश्चय राखावया ॥
तरी पाहें डोळा डोळिया न देखे । परी सर्व पदार्थां तो ओळखे ।
जिव्हा आपण जरी न चाखे । परी सर्व रसां सेवी ॥१३॥
तैसें न जाणे जरी ब्रह्म ब्रह्मासी । परी जाणे स्वप्रकाशें सर्वांसी ।
हेंचि कीं प्रतीति सहजत्वेंसी । देखणा बत्तिसांचा ॥१४॥
डोळा जो पदार्थातें पाहे । तो कां म्हणावा लोपला राहे ।
ब्रह्मात्मा देखणा स्वतःसिद्ध आहे । लोपेना सहसा ॥१५॥
डोळा अंधारीं अपेक्षी प्रकाश । ब्रह्म लयकाळींही स्वयंप्रकाश ।
म्हणोनि लोपेना सहसा अविनाश ।
हे उघड प्रतीति पदार्थ जरी नाहींसे जाहले ।
तरी नेत्रें दीपासी देखिलें । तैसे स्फूर्तीतें स्वतः अनुभविलें ।
जागृति अभावीं सुप्ति ॥१७॥
अथवा दीप जरी निमाला । तरी डोळा पाहे अंधाराला ।
मायास्फूर्तीचाही अंत जाहला । परी लय ओळखी स्वयें ॥१८॥
अंधाराची प्रतीति देखिली । तेचि डोळियाची ओळखी जाहली ।
स्फूर्तीचीही शून्यदशा पाहिली ।
स्वप्रकाशें स्वतां ऐशी उघड प्रतीति स्वयें ।
जयेचा लोप कालत्रयीं न होय । ऐशी विचारें कळेना सोय ।
जया मंदासी ॥२४२०॥
तो ब्रह्मज्ञाना नव्हे अधिकारी । तरी तो जाणावा पाषाणापरी ।
तया गुरू आणि शास्त्रें सारीं । काय करितीं ॥२१॥
तेणें कर्म अथवा उपासनेसी । आदरावें चित्तशुद्धि स्थैर्यतेसी ।
तो पात्र नव्हेचि अपरोक्ष ज्ञानासी । पुढें अधिकार येईल ॥२२॥
येथें विचारवंतचि पाहिजे । तेणेंचि निजांगें ब्रह्मत्व लाहिजे ।
न जाणोनि जाणणें आकळिजे ।
अनुभवेंवीण अनुभाव्य ऐशिया हेतु श्रुतिमाउली ।
यथार्थचि या रीतीं बोलिली । कीं अविज्ञात ती विज्ञात जाहली ।
विज्ञात ते अविज्ञात असो विचारवंतचि येथें असावा ।
येर मंदाचा संबंध न पडावा ।
जे अनुभवेंवीण पावले स्वानुभवातोचि धन्य धन्य ऐशिया उत्तम
अधिकारिया ।
श्रुति बोले बाह्या उभारूनियां । महावाक्य म्हणिजेत जया ।
अथर्वण वेदींचें ॥२६॥
हा आत्मा ब्रह्म अपरोक्ष । परप्रकाशें नव्हे परोक्ष ।
हा जाणावा साधकें प्रत्यक्ष । स्वप्रकाशत्वें ॥२७॥
आतां स्वप्रकाश परप्रकाश । हा श्रुत्यर्थाचा सारांश ।
तात्पर्य कैसें तें रहस्य । बोलोनि दाऊं ॥२८॥
इंद्रियगोचर जो विषय । तया अपरोक्ष म्हणे न्याय ।
जें जें इंद्रियगोचर न होय । तें तें परोक्ष ॥२९॥
तरी मोक्षमार्गीं साधकासी । ऐशी अपरोक्षता न ये उपेगासी ।
तस्मात् श्रुतीची स्वप्रीति जैशी । प्रगट करूं ॥
इंद्रियें पाहती जे जे विषय । ते ते इंद्रियांहून भिन्न प्रमेय ।
जडरूप तें आपण न होय । वेगळें तें परोक्ष ॥३१॥
जें जें भिन्न आपणाहूनी । तें तें परोक्ष आपणाहून मानी ।
आपण तोचि कीं न पाहे कोणी । स्वतां पाहे सर्वां ॥३२॥
विषयाहून इंद्रियांकडे । या अर्थें अपरोक्षता घडे ।
परी यांतही विचारें निवडे । ऐसें करावें ॥३३॥
पंचज्ञानेंद्रियां एक वृत्ति । मनबुद्धिचि अपेक्षिजेती ।
त्या वृत्तीमाजीं जीवाची स्फूर्ति । अमुक स्फुरवावया ॥३४॥
तो जीव तरी प्रतिबिंबरूपें । तोही असे जयाच्या पडपें ।
जयामाजीं जीव उद्भवे लोपे । तो सामान्य आत्मा ॥३५॥
एवं इंद्रियवृत्ति तिजा जीव । आणि सामान्य आत्मा स्वयमेव ।
यांत कोण असे सर्व दैव । तोचि अपरोक्ष ॥३६॥
मनोराज्य जेव्हां अंतरीं । होत असतां इंद्रियें सारीं ।
वृत्तीमाजी मीनती परी । प्रत्यक्ष अभाव ॥३७॥
अभाव इंद्रियांचा जाहला । परी आपण कोणी असे उरला ।
तोचि अपरोक्ष येरां इंद्रियांला । परोक्षता आली ॥३८॥
आतां वृत्ति जीवासहित । स्वप्रकाशें अपरोक्ष वाटत ।
येर इंद्रियें तों परप्रकाश समस्त । जडरूप परोक्ष ॥३९॥
वृत्ति जीवासहित जो आपण । वाटे अपरोक्ष स्वप्रकाशमान ।
 यांतही पहावें विचारून । ज्ञानदृष्टी साधकें ॥२४४०॥
एका वृत्तीचे प्रकार दोन । एक संकल्प एक उगेपण ।
संकल्परूप तोचि बुद्धि मन । उगेपण ते वृत्ति ॥४१॥
संकल्पामाजीं जीव विशेषें । स्फुरवी तो कार्यरूपी असे ।
उगेपणीं कारणरूपीं वसे । तो अस्पष्ट जीव ॥४२॥
असो उगेपण जेव्हां प्रगटलें । तेव्हां संकल्प विशेषत्व निमालें ।
तयाचें नाहींपण अनुभविलें । जया उगेपणें ॥४३॥
तस्मात् उगेपण स्वप्रकाश अपरोक्ष ।
संकल्प परप्रकाश जाहला परोक्ष । जीव मन बुद्धि जड हे प्रत्यक्ष ।
स्वानुभवाआले आतां नुसधी वृत्ति उगेपण । कारणरूपी जीवपण ।
यासहित वाटे प्रकाशमान । आत्मा अपरोक्ष ॥४५॥
येथेंही साधकें समाधिकाळीं । बैसोनि पहावें स्फूर्तितळीं ।
आधीं चिरकाळ उगेपणा न्याहाळी । तोचि साधी हें कृत्य ॥४६॥
स्फूर्ति सहज उठे मुरे । उठतां उगीच अवकाशीं पसरे ।
निमतां नाहींच होय निर्धारें । पुन्हां तत्क्षणीं उठो ॥४७॥
वृत्ति उठतांचि जीवत्व उमटे । वृत्ति अभावीं नासे गोमटें ।
जेवीं सहज पाणी उफाळे आटे । तैसेंचि प्रतिबिंब ॥
स्फूर्तीचा उद्भव पहातसे । तैसाचि लयहि अनुभवीतसे ।
परी उद्भवकाळीं आहेसा दिसे । नसे वाटे लयीं ॥४९॥
नाहींपण वाटलें जयासी । तो आहेचि कीं लयसाक्षी अविनाशी ।
वृत्ति आणि जीवाचे रूपासी । अभाव जाहला ॥२४५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP