मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या २६०१ ते २६५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या २६०१ ते २६५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


जया स्वतां उत्थान असेना । कारण कीं निश्चय नव्हे उणा ।
भलते अवस्थे सहसा उद्भावेना । संशय कधीं ॥१॥
तया शास्त्रेंही सांगों येती । अथवा प्रवृत्ति लोकरीती ।
परी पुन्हां नव्हेचि भ्रांति । ऐसे परतोत्थान नसे ॥२॥
अखंडैकरस ब्रह्मात्मा । स्वतां निजांगें येर हें अनात्मा ।
यया सत्यत्वचि नये रूप नामा । निखळ अद्धय निश्चयें ॥
याचि नांवें पूर्ण ज्ञान । याचि नांवें पूर्ण समाधान ।
हेंचि कैवल्यमुक्तीचें लक्षण । हेचि सहज समाधि ॥४॥
ययाचि ज्ञानें हरिहर । नित्य मुक्तत्वें निरंतर ।
आणि सनकादि ज्ञात अपार । मागें जाहलें असती ॥५॥
पुढें होणार आतां असती । येणेंचि ज्ञानें पावली तृप्ति ।
हे सत्य सत्य त्रिधा वचनेक्ति । अन्यथा नव्हे ॥६॥
ऐसें ज्ञान उत्तमाधिकारी । गुरुमुखें सच्छास्रानुकारी ।
विचारें पावती अभेद अंतरीं । निःसंशय होउनी ॥७॥
शाखा दावितांचि चंद्र लक्षिती । तैसे उपदेशमात्रें अभेदा पावती ।
तेचि उत्तमाधिकारी धन्य जगतीं ।
तीव्रप्रज्ञ जे तस्मात् रविदत्ता सावधान । तूं पाहें स्वतां विचारून ।
ऐसा अधिकार असे कीं पूर्ण । समाधान आकळावया ॥९॥
बहु प्रकारें आम्ही तुजला । विवेचून अर्थ सांगितला ।
उपदेश प्रांजलपणें केला । जेवीं आंवळा हातींचा ॥२६१०॥
परी तुज समाधान बाणलें । नाहीं ऐसें आम्हां कळलें ।
तस्मात् मंदप्रज्ञत्व दिसलें । प्रत्यक्ष आतां ॥११॥
तरी तुज विचाररूप ज्ञानासी । अधिकार नसे निश्चयेंसी ।
तुवां कर्म अथवा उपासनेसी । जाऊन संपादावें ॥१२॥
इतुकें बोलून मौन धरिलें । तेव्हां रविदत्ता कैसें जाहलें ।
वज्रचि काय मस्तकीं पडिलें । जाहलें शतचूर्ण ॥१३॥
आहें कीं मेलों आठवेना । अंतःकरणा आली मूर्छना ।
शरीरीं येकवटता जाहली प्राणा । अतिक्रमण करूं पाहे ॥१४॥
सर्व चळणवळण राहिलें । इंद्रिय ठाईंच्या ठाई निमालें ।
श्र्वासही किमपि न चाले । थंड जाहलीं गात्रें ॥१५॥
ऐशा लोटतां घटिका दोन । कांही प्राण पावला चलन ।
दीर्घ श्र्वास घ्राणें दाटून । सोडिता जाहला ॥१६॥
पुढें चिरकाळें मन उद्भवलें । तेव्हां हळुहळू नेत्र उघडिले ।
परी नेत्रांसी कांही न दिसे पाहिलें ।
मन भ्रमलें म्हणोनि नंतर आठवीतसे मानसीं ।
की सद्गुरूनें उपेक्षिलें मजसी । आतां कोणता उपाय जळचरासी ।
जेवीं जीवनावीण ॥१८॥
तया तळमळीसी काय पुसावें । तप्तपात्रीं कण भाजावे ।
शेखीं प्राणाचेंही उत्क्रमण नव्हे । उगी चरफड अंतरीं ॥१९॥
नेत्रांसीही अंधता आली । वाणीसी तों बोबडी वळली ।
सर्व गात्रें कापूं लागलीं । मस्तक झाडितसे ॥२६२०॥
बळें बोलतां येकाचें येक । शब्द होत असती भ्रामक ।
चित्तासी फुटेचिना तर्क । हां हां मेलों म्हणे ॥२१॥
कंठ सद्रद बाष्पें दाटला । नेत्रद्वारें पूर चालिला ।
तो काहार नव जाय सोसवला । श्रवण करितां मुमुक्षा ॥२२॥
ऐसे दोन मुहुर्त लोटल्यावरी । बलात्कारें अवस्था सारी ।
उठोनि लोळे चरणावरी । उपेक्षूं नये म्हणे ॥२३॥
अहो अहो सद्गुरुस्वामी । मी जळालों बाह्य अंतर्यामीं ।
उपेक्षू नये पाववा विश्रामीं । अभय शीतळकरें ॥२४॥
मी अन्यायी अपराधी परी स्वामीचा । मंदप्रज्ञ अनधिकारी साचा ।
जैसा पुत्र मूर्ख समर्थ मातेचा ।
परी त्या माता नुपेक्षी जरी अन्यथा उपेक्षी माता ।
तरी तया दुजा उपाय कोणता । तेवीं दयाळूवें भज उपेक्षिता ।
त्राता त्रैलोकीं नसे ॥२६॥
हरिहर रूष्ट जाहले जरी । तरी तया सद्गुरु अस कैवारी ।
सद्गुरु कोपतां पुरारिमुरारि । संरक्षितीना ॥२७॥
आतां कोणते मी कर्म करूं । अवघा स्वप्नांतील प्रकारू ।
अथवा जाऊनियां पाय धरूं । कोण्या निर्बळाचे ॥२८॥
गंथर्वनगरी चित्रींची सेना । त्यांत कवण थोर कवण साना ।
तेवी हरिहरादि उपासना ।
आतां मज करणें अयोग्य मृगजळासी धरण बांधावें ।
त्यांतील मासोळे अपेक्षावे । तैसे म्यां यज्ञादि कर्म करावें ।
स्वर्गादि अपेक्षूनी ॥२६३०॥
याची जोंवरी वोळखी न होती । तोंवरी केलीच केली जनरीती ।
आतां मज अधिकार नसे पुढती । कर्म कीं उपासनेचा ॥३१॥
करितां करितां जाहला शीण । भूस बडविलें सांडूनी कण ।
संदिसें प्रारब्धउदयें दर्शन । श्रीचरणाचें जाहलें ॥३२॥
मृगजळा देखोनि धांवतां । मृगा पाणी मिळालें अवचिता ।
तेवीं अनंत पुण्याचिये सुकृता । जोडले श्रीचरण ॥३३॥
ऐसा मज अलभ्य लाभ जाहला । तो केवीं जाय मनें त्यागिला ।
जरी दयाळुवें ढकलून घातिला ।
तरी चरण न सोडी भुकेलिया अमृतपान ।
जोडतां केवीं फिरवी वदन । तृप्ति जाहलिया सहज आपण ।
तेथेंचि शयन करी ॥३५॥
तेवीं भवार्णवीं सद्गुरुपाय । नौका जोडलीसे निर्भय ।
तेथें ब्रह्मामृताचा लाभ होय । जिव्हाग्रीं अकस्मात ॥३६॥
तेथूनियां परत कवण । अविट तृप्ति जाहलियाविण ।
तृप्ति जाहलियाहि होय लीन । जेथील तेथें ॥३७॥
मध्यें जरी परतें सारिलें । तरी तें मरेल जरी उपेक्षिलें ।
हें उचित नव्हे दीनासी लोटिलें ।
समर्थ दातिया उदारा हें असो कामधेनूनें वत्सासी ।
कीं मेघें अनन्य चातकासी । अथवा चंद्रें कधीं चकोरासी ।
उपेक्षिलें न देखों ॥३९॥
दुष्ट जलचरें जाहली जरी । तरी जळें टाकिलीं बाहेरी ।
ऐसी मातही श्रवणावरी । आली नाहीं अद्यापि ॥२६४०॥
तेवीं सद्गुरूसी शरण आला । तो दयाळुवें पिटून घातिला ।
ऐसा न देखों न ऐकिला । कवणेंही काळीं ॥४१॥
परी मजविशीं उद्भवलें काय । हा नेणों कैसा उदेला समय ।
परी मी न जाय हाचि निश्चय ।
उपेक्षितांही दयाळे मी मरमरून शतजन्म घेईन ।
परी न सोडी हे चरण । हे प्रतिज्ञाचि सत्य प्रमाण ।
अन्यथा नव्हे नव्हे ॥४३॥
इतुकियावरीही समर्थें । उपेक्षूनिया दवडितां अनाथें ।
काय उपाय कवणिया अर्थें । घडेसा नाहीं ॥४४॥
परी दयाळूवें ब्रीद रक्षूनी । स्वीकारावें दीनालागुनी ।
निववावें अभयवचनीं । हेंचि उचित ॥४५॥
ऐसें विनऊनि पुढती पुढती । चरणीं लोळे नेत्राश्रु वाहती ।
पुन्हां बद्धांजलि मागुती । पुन्हां नमस्कार ॥४६॥
ऐसा अनन्य रविदत्त । देखतां स्वामी आनंदभरित ।
उचलूनि आलिंगिला त्वरित । म्हणती ना भी ॥४७॥
तुजसी वाउगेंचि वाटलें । की मजला गुरूनें उपेक्षिलें ।
परी आम्हीं नाहीं गा अंतरीं आणिलें । कीं त्यागावें ऐसें ॥
अरे शिष्यासी अलभ्य गुरु । तेवींच गुरूसी अलभ्य लेंकरू ।
तरी आम्ही उपेक्षा केवीं करूं ।
परी निर्धारु पाहतसों सदगुरुसी अनन्यभावें ।
जरी त्यागूनि शरण यावें । तेणें अबोधे परतोनि जावें ।
तरी वाहावें ब्रीद कासया ॥२६५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP