मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १०१ ते १५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १०१ ते १५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


सुषुप्तीमाजीही नेणिवेचा । अभिमान घेतला असे साचा ।
अभाव नव्हेचि कर्तृत्वाचा । लीनत्वें जरी ॥१॥
उस्थान होतांच मी देह स्फुरे । म्यां अमुक केलें करीन सारें ।
ऐसी अभिमानें जे हुंबरें । तेचि वासना ॥२॥
सुषुप्तींत मात्र गुप्त होती । नेणीव गोचर राहे वृत्ति ।
तेथील आठव घेऊन येती । स्फूर्ति उत्थान कालीं ॥३॥
तेथें अभाव जरी असतां । तरी उत्थानीं प्राप्त न होतां ।
तस्मात् वासनारूपें अहंता । इचा सुषुप्तींत अभाव नाहीं ॥४॥
हे असो सुषुप्तीची कथा । परी मृत्युकाळीं हानी नोहे सर्वथा ।
सर्वही घेऊन बैसली माथां ।
अनंत जन्मींचें केले जेवीं घोकिलें जन्मवरी ।
न म्हणतां न विसरे तिळभरी । तेवीं वासनेमाजीं सामग्री ।
अनंत जन्मींची असे ॥६॥
स्वरूपाहून वेगळी पडली । तधींपासून जीं जी कर्में केलीं ।
तीं तीं माथां घेऊन बसली । तया नांव संचित ॥७॥
जोंवरी ज्ञान नोहे प्राप्त । तों काळ हें न जळे संचित ।
भोगणेंचि लागे अकस्मात । जें विभागा जे क्षणीं ॥८॥
एका देहीं शत योनींचें । कर्म केलें पापपुण्याचें ।
तितुकें एकदांचि भोगा नवचे । एकेक भोगावें लागे ॥९॥
शतांतील नव्याण्णव रहाती एक योनीसी एक घेऊन येती ।
तेथेंही शत योनींची कर्में होतीं त्यांतीलही एक भोगासी
ये ऐसें अनंत जन्मींचें सांचलें । भोगा येऊन जें जें उरलें ।
तितुकें वासनेमाजीं गुप्त राहिलें । तया नांव संचित ॥११॥
देहा येऊन जें जें करी ं तें तें क्रियमाण निर्धारी ।
प्रस्तुत भोगुनियां सारी । तें प्रारब्ध देहारंभक ॥१२॥
एवं प्रारब्ध संचित क्रियमाण । कर्तेपणें बैसलीसे घेऊन ।
हेचि वासना बैसली बळाऊन । अनंत कल्पें जरी आतां
कल्पांतींही अभाव नसतां । या मृत्यु सुप्तींत कायसी वार्ता ।
एवं ऐसी वासनारूप अहंता ।
इचेंच नांव सूक्ष्म देह ऐसिया लिंगदेहावांचून ।
स्थूळदेहासी कैचें वर्तन । म्हणोनि वासनायोगें जन्ममरण ।
प्राणियां होय ॥११५॥
पूर्ववासनेने देह केला । तो प्रारब्ध सरतांचि पुन्हां मेला ।
पुढें दुसरा देह अवलंबिला । मृत्युकाळीं ॥११६॥
अळिका जेवीं पुढील पाय । धरोनि मागील सोडिती होय ।
तेवीं पुढील देह धरोनि जाय । हा देह सोडुनी ॥११७॥
ऐसे अनंत जन्म नानायोनी । किती जाले कोण वाखाणी ।
पुढें होणार तेंही लेखनीं । नये कवणाच्या ॥११८॥
जेधवां आपुले अज्ञान फिटेल । स्वस्वरूप ज्ञान प्राप्त होईल ।
तेधवांचि हे वासना निमेल । येरवीं न नासे ॥११९॥
कल्पवरी अग्नींत जळेना । पाणिया माजीं विघुरेना ।
बहुत कासयासी वल्गना । सहस्त्रधा योगेंही न निमे ॥१२०॥
असो ऐसी वासना दृढ । हाचि सूक्ष्म देह वाड ।
वर्तवित असे स्थूळ जाड । जो जो प्राप्त ज्या क्षणीं ॥२१॥
ऐसिया लिंगदेहाचे प्रकार । सत्रा भिन्न भिन्न साचार ।
तेचि ऐकावे सविस्तर । बोलिजे असे ॥२२॥
एका वृत्तीचे प्रकार दोन । एक बुद्धि दुजें मन । संकल्प जो होणें ।
हें मनाचें रूप ॥२३॥
पुढे निश्चय करी ते बुद्धि । ऐसे दोन प्रकार जाले आधीं ।
यांत जाणतेपणा जो त्रिशुद्धी । आला असे ॥२४॥
याचि नांवे ज्ञानशक्ति । भोक्ता सत्त्वगुणात्मक वृत्ती ।
याचेही प्रकार पांच होती । व्यापारभेदें ॥२५॥
श्रोत्रेंद्रियासी येऊनी । ऐकूं लागे शब्दालागुनी ।
तयासी श्रोत्र बोलिजे वचनीं । द्वार निर्गमाचें ॥२६॥
त्वचाद्वारें स्पर्श घेणें । तयासी त्वगिंद्रिय म्हणणें ।
चक्षुद्वारां जया पहाणें । तोचि चक्षु ॥२७॥
जिव्हेंद्रियें रस घेणें । सुगंध निवडिजे घ्राणें ।
एवं पांचही बहिःकरणें । मन बुद्धीचीं ॥२८॥
आंतील इंद्रिय अंतःकरण । ज्ञानेंद्रिया नाम बहिःकरण ।
एवं सातही जालीं लक्षणें । वृत्तिरूप ज्ञानाचीं ॥२९॥
स्फुर्तींत जाणीव जे होती । तिचे प्रकार बोलिले असती ।
आतां चळणरूप जे जे वावरती । तेचि प्राण ॥१३०॥
जाणीव मन बुद्धीकडे गेली । नुसती जडता जे उरली ।
ते नाडीद्वारा फिरों लागली । तोचि प्राण ॥३१॥
व्यापारभेदें तोचि प्राण । पंचधा जाल संपूर्ण ।
व्यान समान उदान प्राण । अपान पांचवा ॥३२॥
अधो वाहे तो अपान । ऊर्ध्व वाहे तोचि प्राण ।
उभयांची ग्रंथी तो समान । नाभिस्थानीं ॥३३॥
कंठी उदान रहातसे । व्यान सर्वांगीं विलसे ।
या पंचप्राणांच्या सहवासें । कर्मेंद्रियां चळण ॥३४॥
वाचा पाणी आणि पाद । चवथें उपस्थ पांचवें गुद ।
एवं हीं कर्मेंद्रियें प्रसिद्ध । क्रियारूप प्राणा ऐसीं ॥३५॥
पाणी पाद उपस्थ गुद । ही चार तों कर्मेंद्रिय प्रसिद्ध ।
परी वाणीमाजी द्विविध । ज्ञानक्रिया असे ॥३६॥
वैखरी जें शुद्ध बोलणें । हें तों क्रियारूप होणें ।
मध्यमेमाजीं असती लक्षणें । ज्ञान क्रिया दोन्ही ॥३७॥
परा आणि दुजी पश्यंती । ह्या दोन्ही ज्ञानरूप असती ।
तेथें क्रियेची समाप्ती । असे सहसा ॥३८॥
एवं मन बुद्धि ज्ञानेंद्रिय । पंचप्राण कर्मेंद्रिय ।
हा सत्रा तत्त्वांचा समुदाय । लिंगदेह बोलिजे ॥३९॥
इतुकीं सत्रा तत्त्वें बोलिलीं । ही सर्व वासनेचीं विभागलीं ।
परी ही भूतांपासून जालीं । यास्तव भौतिक ॥१४०॥
भूतांचे जे गुण तीन । तेच द्रव्य शक्ति क्रिया ज्ञान ।
द्रव्य शक्ति जो तमोगुण । तींच विषय भूतें ॥४१॥
आतां क्रिया ज्ञान दोन्ही शक्ती । भूतांपासून केवीं होती ।
हेच लिंगदेहाची उत्पत्ती । अपंचीकृत बोलिजे ॥४२॥
गुण भूतें कालवलीं । जे अष्टधा बोलिजे पाहिलीं ।
तेचि सत्रा तत्त्वें प्रसवली । ईक्षणें ईशाचे ॥४३॥
आकाशाचा सत्त्व गुण । श्रोत्रेंद्रिय जालें निर्माण ।
त्वगिंद्रिय होय उत्पन्न । वायु सत्त्वांशाचें ॥४४॥
चक्षु तेज सत्त्वांशाचें । जिव्हेंद्रिय तें आप सत्त्वाचें ।
घ्राण तें पृथ्वी सत्त्वांशाचें । ज्ञानेंद्रियें पांच ऐसीं ॥४५॥
पांचांपासून पांच वेगळाले । जाले तें असाधारण कार्य बोलिलें ।
आतां साधारण कार्य उभवलें । भूत सत्त्वांशाचें ॥४६॥
पांचांचे येकदांचि काढिलें । सत्त्वांशें जें कां द्रव्य निघालें ।
तेंचि अंतःकरण विभागलें । दों प्रकारें ॥४७॥
मन बुद्धि प्रकार दोन । व्यापारभेदें अभिधान ।
एवं ज्ञानशक्तीचें सप्तधा लक्षण । भूत सत्त्वांशाचें ॥४८॥
आतां भूतरजांशाची उत्पत्ती । जाली असे ते बोलिजेती ।
तेही साधारण असाधारण असती । शक्ति क्रियात्मक ॥४९॥
आकाश रजांशाची वाचा । पाणी वायु रजांशाचा ।
पाद तो तेज रजाचा । उपस्थ आप रजाचें ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP