TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १२५१ ते १३००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १२५१ ते १३००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


ओव्या १२५१ ते १३००
अहं ब्रह्मस्फूर्ति मायेची । त्या चंचळपणीं वस्ती जाण त्याची ।
तेथेंचि इच्छा वसे बहुपणाची । कीं व्हावें बहुत ॥५१॥
ती इच्छा परी निर्हेतुक । मनसंकल्पादि नसती तर्क ।
नुसधी वृत्ति निर्विकल्पक । त्या इच्छेंनें सर्व जाहलें ॥५२॥
मायास्फूर्तिसहित जाणीव । इच्छाबीजेंसी  जो आठव ।
आदिनारायण तयाचें नांव । सविशेष स्वयंभू ॥५३॥
तयाचिये इच्छेसरिसे । भूतगुणादि होती अपैसे ।
चंचल तत्वादि होऊन सरिसे । स्थूल जाला विरिंचीचा ॥५४॥
तया स्थूलामाजीं प्रवेशतां । ईशचि जाहला जीवत्वें स्वतां ।
मग चंचळ जड उभयतां । चळण पावले ॥५५॥
देहाचा चाळक तो प्राण । विषय निवडावया मन ।
तया संकल्पामाजीं जीवपण । आभासरूप असे ॥५६॥
पूर्वीचा जो निर्विकल्प हेतु । तोही असे बुद्धिआंतु ।
तोचि ईशान प्रवर्तवितु । संकल्पांसह सर्वां ॥५७॥
एवं मायेसहित ईश्र्वर । ससंकल्पजीव अनेश्र्वर ।
या उभयांनींही केलें बिढार । साकार सप्राण ॥५८॥
इतुका संघ जेव्हां मिळाला । देहीं प्राण वायु कळासिला ।
तेव्हां वर्णरूपें शब्द उठिला । ध्वनि नादासहित ॥५९॥
शब्दगुण जरी गगनाचा । परी हेलावा पाहिजे वायूचा ।
त्यावरी आंवाका भासरूप तेजाचा ।
वरी आपाचें द्रवत्व हे चाऱ्ही मिळतांही
पृथ्वी पाहिजे । जडाच्या आधारें चळण पाविजे ।
तेंव्हाचि हेलावियासरिसा उठिजे । शब्द हा वर्णात्मक ॥६१॥
आरंभीं सामान्य ध्वनि । नादरूपें झाली उभवणी ।
तोचि अकार जेथून श्रेणी । पन्नास मात्रांच्या होती ॥६२॥
अकारीं उकार मिळतां । ओकार उमटे पाहतां ।
मकार शेवटीं आदळतां । ॐ इति प्रगटे ॥६३॥
पहिली स्फूर्ति अर्थरूप । अहंब्रह्म जे निर्विकल्प ।
तेंचि प्राण आणि मनसंकल्प । मीनतां जडत्वा आली ॥६४॥
सोहं अक्षरें प्राणाच्या बळें । उठलीं त्यांत हेतु तो मिळे ।
तेणें सोहं शब्द हा उफाळे । हाच कीं प्रणव ॥६५॥
सकारशक्ति बीजाआंत । अकार उकार मकार मिश्रित ।
हे चंचळपणाचे प्रकार होत । देह उपाधीमुळें ॥६६॥
ध्वनीमाजीं चंचळ जाणता । ते अर्धमात्रा बोलिजे तत्वतां ।
तेथें मात्रेचा उच्चार न होतां । नुसधा नाद ॥६७॥
तिहीं मात्रांतही नाद असे । परी ते मात्राध्वनि भिन्न दिसे ।
त्या ध्वनींत नुसधा जाणता विलसे ।
तो बिंदुत्वें कल्पावा एवं अर्धमात्रा बिंदू सहज । हाचि हकार पुरुषबीज ।
पहिला सकार तोचि समज । त्रिमात्रात्मक ॥६९॥
एवं अकार उकार मकार । अर्धमात्रा चौथा प्रकार ।
पांचवा तो बिंदू साचार । ऐशीं पांच अंगें प्रणवाचीं ॥१२७०॥
परी सोहं अक्षरें जीं दोन । तेंचि प्रणव पंचांग संपूर्ण ।
हेंचि पहावें विचारून । साधकें अंतरीं ॥७१॥
ऐसा जो प्रणव उमटला । हाचि वेद स्वयंभ जाला ।
येकाक्षर ब्रह्म नाम जयाला । आणि मोक्षाचा सेतु ॥७२॥
वेद म्हणिजे जाणणिया । तें जाणतेपण या वेदराया ।
येर अक्षरां कल्पिणें वायां । वेद म्हणोनी ॥७३॥
तथापि शब्दाविण अर्थासी । जाणणें न घडे मुख्य जीवासी ।
म्हणोनी शब्दरचना व्हावयासी । पन्नास मात्रा निर्मिल्या अकारादि सोळा वर्ण ।
कादिमांत पंचवीस गणन । तयासी स्पर्श म्हणती विचक्षण । जे स्पर्शोन उठती ॥७५॥
यरादि हे उष्मसांत । आणि हक्ष हे मुळींचे उदभूत ।
एवं पन्नासांची होय गणित । भिन्नभिन्न मात्रा ॥७६॥
इतुकियांतही प्रणवाची । व्याप्ति असे अन्वयाची ।
अकारावीण तो नव्हेची । उच्चार मात्रेचा ॥७७॥
भास तोचि उकाराचा । दिसणेपणा अक्षरांचा ।
दृश्यभास तो मकाराचा । परिणाम असे ॥७८॥
एवं त्रिमात्रात्मक ॐकार । तयापासूनीच पन्नास अक्षरें ।
आणि सर्वांमाजींही निरंतर । व्याप्ति प्रणवाची ॥७९॥
तस्मात् इतुकियाही मातृकांसी । वेदाचि म्हणावें अक्षरांसी ।
हे निर्माण झाले अंतरश्र्वासीं । साकार ब्रह्मयाचे ॥१२८०॥
परा पश्यंती मध्यमा वैखरी । हींच स्थानें वेदाचीं चारी ।
चहूंपासून या येकसरी । उच्चार होतसे ॥८१॥
ह्याची मातृका पुढें मागें । होतां शब्द होती अनंत प्रसंगें ।
म्हणोनि आहे निजांगें । अनंता वै वेदा ॥८२॥
ऐसा वेद जो निर्माण जाला । तो साकार ब्रह्मयानें नाहीं केला ।
प्राणचि परिणामा पावला । परी न करी प्राण ॥८३॥
संकल्पासहित जो जीव । तयासीही कर्तृत्वाचा अभाव ।
म्हणोनि ईश्र्वर जो स्वयमेव । तेणेंचि केला ॥८४॥
मायेसहित जो मायावी । वाउगेंचि येकाचें येक दावी ।
जो शिवशक्ति नारायण नांवीं । तेणेंचि वेद निर्मिला ॥८५॥
हेंही मायेचेंचि करणें आघवें । जें अज्ञानास्तव वाउगें उभवावें ।
परी तें जड म्हणोनि आरोपावें । आभासरूप ईशावरी जैसे बुद्धीनें
केले जे जे संकल्प । ते ते जीवावरी कीजे आरोप ।
तैसेंचि मायेचें कृत्य मोठें की अल्प । तें ईश केलें म्हणावें असो ऐसा शब्द ब्रह्मासहिताब्रह्मा निर्माण जाला मृष्टिहेत ।
तो कल्पना जीवत्वें जेव्हां करीत तेव्हां अनंत प्रजा निर्मिल्या पशु पक्षी श्वापद कीटकें ।
स्थावर जंगमात्मक  जितुकें । अवघें जोडेचि सकौतुकें ।
 निर्माण होते जाले ॥८९॥
पुढें मैथुनसृष्टि उद्भवली । सर्वही येकापासून येक जाली ।
परी आरंभीं संकल्पें जे प्रगटली ं ते मानसिकसृष्टि ॥१२९०॥
येथेंही कोणी मंदमति । येकाचें येकचि भाविति ।
कीं मानसिक जे होती । तें करणें ब्रह्मयाचें ॥९१॥
तो ब्रह्मदेवाचि ईश्र्वर म्हणावा । कारण कीं कर्ता जाहला सर्वां ।
जरी हा साकार जीव कल्पावा । तरी विरोध येतसे भूतादि तृणांत निर्माण जितुकें ।
हें ईशाचें कर्तव्य असे तितुकें । आतां जीवें केलें म्हणतां निकें । तरी केवढा विरोध ऐसिये आशंकेसी उत्तर ।
बोलिजेत आहे पहा विचार । जरी मानसिक करी अनेश्र्वर ।
तरी मैथुनसृष्टि ही जीवाची स्त्रीपुरुषसंयोगें उत्पत्ति व्हावी ।
हे जीवाचे स्वाधीनचि जरी असावी । तरी मग संतति नसतां जीवीं ।
तळमळ कासया प्रतिसंगासी बाळें व्हावें । ऐसें तों कोठें न संभवे ।
मैथुन तों दिननिशीं न सोडवें । परी पुत्रार्थ रडती ॥९६॥
तस्मात् करणें नव्हें जीवाचें । मैथुन जरी स्त्रीपुरुषांचें ।
जेव्हां प्रारब्ध उद्भवे होणाराचें । तेव्हां ईशसत्ते होतें ॥९७॥
कोणीकडे रक्तरेत । कोणीकडे साकार जन्मत ।
प्राण जीवही होय त्यांत । हें जीवाचे बापें नव्हे ॥९८॥
तैसाचि जीवसंकल्प ब्रह्मयाचा । परी करणें हा उपाय नव्हे त्याचा ।
जरी स्वाधीनचि असता साचा । तरी घाबरता कासया ॥९९॥
येकदां दृष्टप्रजा निघाली । ती विरिंचीशीं मैथुना प्रवर्तली ।
तेव्हां पळतां भूमि थोडी जाली । कोणी कैवारी ही नसे मग त्या ॥१३००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-19T22:10:55.0870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

नंदवर्धन II.

 • n. (प्रद्योत. भविष्य.) भागवत मतानुसार जनक का पुत्र । इसके नाम के लिये नंदिवर्धन तथा वर्तिवर्धन पाठभेद प्राप्त हैं । 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.