मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १८०१ ते १८५०

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १८०१ ते १८५०

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


अविद्यात्मक मायास्फूर्ति । जीवेश त्रिगुण चत्वार वृत्ति ।
प्राण दशेंद्रियें वावरती । गोलकेंविण अंतरीं ॥१॥
बोलणें ऐकणें पाहणें चालणें । स्पर्शणें आणि देणें घेणें ।
खाणें रति विसर्ग गंध घेणें । आभासरूपें स्वप्नीं ॥२॥
तेथें हर्ष खेद होती व्यापारीं । ऐसे गुणदोष नानापरी ।
हे असो सुप्तीही माझारी । गुणदोष असे ॥३॥
तेथें मनबुद्धीचा आभाव । इंद्रिय प्राणादिकां नसे ठाव ।
येक स्फूर्तिमात्र स्वयमेव । असे अविद्यात्मक ॥४॥
जीवेश प्रतिबिंबे दोन्ही । असती तया नेणीवपणीं ।
हाचि आनंदमय कोश वाणी । बोलिजे पांचवा ॥५॥
येरवीं ज्ञानादि चारी कोश । यांचा तेथें होतसे नाश ।
नेणीवरूपेंचि असे विशेष । प्राज्ञ अभिमानही ॥६॥
असो ऐसिया सुप्तीआंत । सुखाकरिता हा गुण प्रगटत ।
कांहीच न कळे दोष दिसत । व्यापाराविण ॥७॥
जैसे एक पिंडीं अवस्थें तिहीं । गुणदोष असती सर्वदाही ।
तैसेंचि ब्रह्मादि कीटकांत सर्वही । गुणदोषें व्याप्त ॥८॥
हे असो भौतिकांची कथा । परी महाभूतींही सर्वथा ।
असे गुणदोषाची व्यथा । सहजगति ॥९॥
पुथ्वी अन्नरसें तारी हा गुण । तेणेंचि विषरूपें होय मरण ।
तेवींच जीवनें तृषा हरण । मरे बुडतां ॥१८१०॥
अग्नि हा शीत निवारित । येऱ्हवीं दहन करी समस्त ।
मंद वायु सुखही देत । नातरी उडवी ॥११॥
आकाशीं अवकाश वाड । हाचि गुण तेथें घबाड ।
शून्यपणें नेणवि निबिड । हाचि दोष ॥१२॥
एवं आकाशादि देहांत तृण । आणि स्फूर्तिपासूनियां प्राण ।
इतुके बत्तीसही संगूर्ण । गुणदोषें भरले ॥१३॥
जैसा सजल साभास घट । तेथेंहि गुणदोष स्पष्ट ।
आणि ओघीं पडला जो बुद्धिनष्ट । तेथें गुणदोषां उणें नसे ॥१४॥
तरंग मेघ सर्प चोर । रजत मृगजलादि विकार ।
तेथें जैसें हर्ष भय थोर । तेवींच बत्तिशीं गुणदोष ॥१५॥
असो बत्तीसांचे रूपाहुनीं ं चित्प्रभा वेगळी पूर्णपणीं ।
तैशीची बत्तिसांचे दोषगुणीं । न लिंपे सहसा ॥१६॥
जैसें घटजल प्रतिबिंबासहित । आकाश व्यापून अलिप्त त्यांत ।
मा तयाचे गुणदोषें मिश्रित । होईल कैसें ॥१७॥
आणि नदींत वृक्षीं जो बैसला । तो पडियला याहून भिन्न संचला ।
तो पडल्याचे गुणदोषें मेला । हें घडेना सहसा तरंगाचिये सारिसे पाणी ।
विकारा नपवे त्यांत असोनि । मा उद्भवलयीं दोषगुणीं । उद्भवे मरे केवीं ॥१९॥
मेघे आकाश गजबजीना । मा पाझरें केवि सरिसें जीवना ।
सर्पेंही रज्जु आच्छादेना । तरी चाले केवीं त्यासवें स्थाणु चोरा ऐसा नसतां ।
लुटील केविं हो पांथस्था । शिंप जाहलीच नाहीं साम्य रजता । तरी हर्ष खेद दे केवीं ॥२१॥
सविता न बुडे मृगजलपुरीं । तो ग्रासिला केवीं मृगजलचरीं ।
हें बोलता जैशी शिणे वैखरी । तैशीच ब्रह्मात्मया अरे जो मायेसी अतीत ।
तो मायाविकारें केवीं चळत । मायाचि तेथें उद्भवून नासत ।
तो जैसा तैसा ॥२३॥
अविद्या तया आच्छादिना । विद्याही ज्ञानें जाणेना ।
ईशाचे प्रेरणेंत गवसेना । सर्वज्ञही नव्हे ॥२४॥
मुख्य ईशाऐसें नव्हे ब्रह्म । मा सर्वज्ञादि केवीं घे धर्म ।
तेथून प्रेरकत्वादि नाना कर्म । हे तो अति दूरतर ॥२५॥
जीवाचे रूपाऐसें नाहीं । मग किंचिंज्ज्ञधर्म स्फुरवणें तेंही ।
आणि साभिमान घेऊन बैसे देहीं । याहून भिन्न म्हणणें नको ॥२६॥
बुद्धिचिये धर्माप्रति । भय लज्जादि धारणा घृति ।
आशा चिंता निश्चय चित्तीं । भिन्न असे पूर्णपणीं ॥२७॥
मनाचे संकल्पविकल्पासी । शोक मोहो कामदिकांसी ।
चित्प्रभा वेगळी निश्चयेंसी । पूर्णपणीं असे ॥२८॥
चित्ताचे चिंतनापासूनी । अहंकाराचे अहंकर्तव्याहुनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥२९॥
प्राणाचे विहरणाहूनी । क्षुत्पानादि धर्मांपासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं ं केवळत्वें सहज ॥१८३०॥
श्रोत्राचिये ऐकण्याहूनी । त्वचेचे स्पर्शनापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्व सहज ॥३१॥
चक्षूचिये देखण्याहूनी । रसनेचे अशनापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३२॥
घ्राणाचे सुगंध दुर्गंधाहूनी । चहूंवाणीचे वचनापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३३॥
हस्ताचे देण्याघेण्याहूनी । पादाचे गमन क्रियेपासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३४॥
उपस्थाचे रतिसुखाहुनी । गुदाचे विसर्गापासोनि ।
चित्प्रभा पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३५॥
देहाचे संमतीपासूनी । जन्मणें वाढणें यांहुनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहज ॥३६॥
बाल्य तारुण्य वृद्धाप्याहूनी । अंतकाल मरणापासुनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णपणीं । केवळत्वें सहजें ॥३७॥
कुरूप सुरूप लावण्याहूनी । वर्ण आश्रमादिकांपासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥३८॥
स्त्रीपुरुष नपुंसकाहूनी । राजा कीं रंकादिकापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥३९॥
जागृतीचे पुचवृत्तीहुनी । व्यवहाराव्यवहारापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥१८४०॥
स्वप्नाचिये पंचवृत्तीहुनी । सुप्तीचिये नेणिवेपासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४१॥
जैशी सर्व प्रपंचाहूनी । तेवींच परमार्थापासुनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४२॥
बद्ध मुमुक्षु साधकाहूनी । तेवींच सिद्धाचे देहापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४३॥
श्रवण मनन निदिध्यासांहुनी । तेवींच समाधिसुखापासुनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४४॥
जेवा येक पिडतादात्म्याहूनी । तेवीं कीटकादि ब्रह्मयापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४५॥
पृथ्वीचे धारणादिकांहूनी । आपाचे क्लेदनापासोनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४६॥
तेजाचे दहनादिकांहूनी । वायुचे विहरणापासूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४७॥
आकाशाचे शून्यपासुनी । अवकाशादि धर्माहूनी ।
चित्प्रभा भिन्न पूर्णंपणीं । केवळत्वें सहज ॥४८॥
जैसें घटजल जलाभासी । गगन भिन्न पूर्णपणेंसी ।
अथवा सर्पादि नाना दृष्टांतासी । रज्जावादि भिन्न ॥४९॥
तेणें रीतीं पिंड ब्रह्मांड । मायास्फूर्तीचें मिथ्या बंड ।
या सर्वांहून ब्रह्मात्मा निबिड । सहजीं भिन्नरूप ॥१८५०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP