TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ लघुवाक्यवृत्ती|
ओव्या १४५१ ते १५००

सार्थ लघुवाक्यवृत्ती - ओव्या १४५१ ते १५००

श्रीमच्छंकराचार्यकृत सार्थ - लघुवाक्यवृत्ती ग्रंथावर हंसराजस्वामींनी ओवीबद्ध टीकेसह, अतिशय सुंदर निरूपण केले आहे.


ओव्या १४५१ ते १५००
घटामाजीं मृत्तिका येत । तेवीं उपादानत्वें जीव बुद्धींत ।
कुल्लाळ घटाहून भिन्न राहत । तेवीं भिन्न राहे ईश ॥५१॥
विद्या जरी बुद्धींत प्रवेशे । परी ईशत्व न ये जीवसहवासें ।
अथवा विद्यासह ईश प्रतिभासे । तरी तो परिणाम ॥५२॥
प्रेरणाकार्य ईशासी जोंवरी । ईशही सरूप सनाम तोंवरी ।
तें कार्य नसतां नाम ईश्र्वरीं । कोठें उरे ॥५३॥
बुद्धीमाजीं जरी येता । प्रेरणाकार्या होय त्यागिता ।
तैसाचि सुषुप्तिकाळ होतां । ईश सकार्य नाम सांडी ॥५४॥
जीव जैसा अज्ञानगर्भी उरे । तैसेंचि आनंदकोशीं ईशत्व स्थिरे ।
विज्ञानात्मा जीवा नाम वारे । प्रज्ञानात्मा ईश ॥५५॥
हे दोन्ही कारणात्मा शुद्ध । त्यांतचि मिळून राहती अभेद ।
जेव्हां प्रवृत्तीचा उभारा विशद । तेव्हां दोघे उद्भवती ॥५६॥
जीवाच्या प्रारब्धदशेचा उभारा । तेव्हां बुद्धियोगें ये जागरा ।
तयाचा प्रेरक ईश हा खरा । तितुक्या विक्षेपकाळीं ॥५७॥
पुन्हा बुद्धीचे तरंग नाना । होत असती जे क्षणाक्षणां ।
तेही ईश्र्वराची प्रेरणा । परी ते विकार जीवाचे ॥५८॥
तूं म्हणसी तो अंतर्यामीं । ओळखीस न ये अनुक्रमीं ।
तरी तो अतिसूक्ष्म सुखधामीं । आहाच पाहतां न कळे ॥५९॥
पटामाजीं तंतु ओळखितां । प्रतीतीस येत असे तत्त्वतां ।
परी तंतूचे अंतरीं अंशु असतां । स्थूळदृष्टी दिसेना ॥६०॥
तैसा बुद्धीचा आभास कळों येतो । परी विद्याप्रतिबिंबीं कळेना तो ।
तोही सूक्ष्म अनुभवा कळतो ।
अंशु सूक्ष्मदृष्टी जेवीं पहा पहा बुद्धीविण जीव ।
जो नुसधा अविद्यात्मक भाव । तयाचाही नव्हे अनुभव । बहिर्मुखत्वें ॥६२॥
बुद्धिअभावीं जीव दिसेना । मा ईश कैसा ये अनुमाना ।
न कळे म्हणून न करावी कल्पना । जीवेश अभावाची ॥६३॥
बुद्धि उद्भवे आणि नासे । परी विद्याअविद्यात्मक वृत्ति न नासे ।
त्या दोहींमाजीं असताचि असे । जीवत्व ईशत्व ॥६४॥
तस्मात् जयासी पहावें वाटे । तेणें अंतर्मुख व्हावें नेटे ।
विशेष बुद्धीचा तरंग नुठे । तेव्हां वृत्ति अनुभवावी ॥६५॥
या वृत्तींत कळणें न कळणें । दोन्हीही असती समानें ।
तेचि विद्याअविद्येचीं लक्षणें । आवरण विक्षेरूपें ॥६६॥
जया अधिष्ठानीं वृत्तिं । उद्भवली तया होती नेणती ।
जाणूं लागे चंचल स्फूर्ति । सहित कार्य जें जें ॥६७॥
स्फूर्तिसी जाणे तेचि विद्या । येर न जाणे ते अविद्या ।
ह्या दोन्हीं समजाच्या आद्या । सूक्ष्मदृष्टी ॥६८॥
यांत चिद्रूप ज्ञानाऐसें । ज्ञान स्फूरे जे मिथ्या आभासें ।
तेंचि जीवेश जाणावें अभ्सासें । तेव्हां कळती ॥६९॥
परी त्यांतही मुख्य बिंबात्मा । सामान्यत्वें ज्ञानघन आत्मा ।
तोचि जाणावा कारणात्मा । त्याहून भिन्न हे दोन्ही ॥७०॥
तो ब्रह्मप्रत्यगात्मा ज्ञानघन । ब्रह्मादि तृणांत अविच्छिन्न ।
जो स्वप्रकाशें भासवी संपूर्ण । आणि लयही जाणे ॥७१॥
जो या श्र्लोकीं निरोपिला । रूपादिसह बुद्धि व्यापाराला ।
बुद्धि आणि निर्विकल्प वृत्तीला । सहज प्रकाशी ॥७२॥
अविद्याविद्या जीवशीव । निर्माण तितुकें प्रकाशी सर्व ।
याहून प्रतिबिंबित जो स्वभाव । जीवेशांचा भिन्न ॥७३॥
जैसा सूर्य भिंती अंगणें घरें । घट जळ प्रतिबिंबादि सारें ।
एकदांचि प्रकाशी साचोकारें । तैसा आत्मा प्रकाशी ॥७४॥
घटजळीं जो बिंबला । तो सूर्याहून वेगळा जाहला ।
तैसा आभासरूपें वृत्तींत उमटला । तो स्वरूपाहून भिन्न ॥७५॥
वृत्तीचा उगाच चंचळपणा । त्यांत जाणिवेची बिंबित लक्षणा ।
येक चिद्रुपाचा व्यापकपणा । एवं दोन्हीही सत्यमिथ्या सत्य तो व्यापक बिंबात्मा ।
मिथ्या तो प्रतिबिंब अनात्मा ।
हे दोन्ही जो निवडी महात्मा । विचारदृष्टीनें ॥७७॥
मिथ्यात्वें मिथ्याचा करी त्याग । सत्य तें सत्य होय अंगें ।
परी दोन्हीही समजावें अध्यंग । सत्य आणि आभास ॥७८॥
सूर्यदृष्टांती जळीं व्यापकता । नसे म्हणून न ये सभ्यता ।
परी सत्यमिथ्या चिदाभासता । निवडून गेली ॥७९॥
आतां वृत्तींतचि येक प्रतिबिंब । दुसरें व्यापकत्वें चिद्रुप स्वयंभ ।
हें स्पष्ट कळावें सुलभ । ऐसा दृष्टांत देऊं ॥१४८०॥
घटीं जल घालितां भासत । आकाशापरी आभास दिसत ।
दुसरें शुद्ध गगन सर्व घटांत । न दिसतां व्यापून असे ॥८१॥
व्यापलें तें जला आदि अंती । आहे तैसें असे निश्चितीं ।
तैस स्फूर्तींत व्यापक जो चिन्मूर्ति । वृत्ति अभावीं सत्य ॥८२॥
जलाभास जल तोंवरी दिसे । जल नसतां भासकता नासे ।
तेवीं वृत्तींत प्रतिबिंबरूप भासे । तें नासे वृत्तीसर्वे ॥८३॥
जें वृत्तिबुद्धींत प्रतिबिंबलें । चिद्रूपा ऐसे उगेंच भासलें ।
तया मिथ्यासी नाम ठेविलें । जीवेश दोन ॥८४॥
येक विकल्प दोष गुणाचा । करितो जीव बुद्धिगत साचा ।
दुजा प्रेरकजीवाचे कर्माचा । नुसते वृत्तीचा आभास ॥८५॥
असो जीवें केलें तें जीवनिर्मित । ईशें केलें तें ईश्र्वरद्वैत
इतुकेंही कार्यरूप जगत । आणि जीवेश कारण ॥८६॥
इतुकियाही दृश्यभासाहून । स्वप्रकाश ब्रह्म आत्मा ज्ञानघन ।
वेगळा असे सर्वात असून । निर्विकारें असंग ॥८७॥
जैसें घटजळीं असोन गगन । सर्वांवेगळें व्यापकपण ।
जळाचे विकार अनान । न स्पर्शती तया ॥८८॥
तैसेंचि सर्व जग जीवेशसाहित । चंचळ जड दृश्य भास समस्त ।
इतुकियांमाजींही चित्प्रभा व्याप्त ।
परी वेगळी सर्वांहूनी तेंचि आतां पुढील श्र्लोकीं । विवेचना कीजे निकी ।
येथें सावधान असावें साधकीं । यया निरूपणीं ॥१४९०॥
सर्व मागील आलोढून आलें । निरूपण जितुकें होऊन गेलें ।
सर्व पदार्थमात्र निवडले । तिनुकाही अनुवाद येथें ॥९१॥
तस्मात् अतितर सावधान । सांग घडत असे विवेचन ।
अनात्मजात निरसून । आत्मत्वें आत्मा भेटे ॥९२॥
रुपाच्च गुणदोषाभ्यां विविक्ता केवलाचितिः ।
सैवानुवर्तते रुप रसदीनां विकल्पने ॥८॥
रूपाहून गुणदोषांहूनी । वेगळी चित्प्रभा सर्वां भासउनी ।
तेचि व्यापक असे सर्वांलागुनी । रूपरसादि विकल्पासह रूपाहून वेगळे म्हणितलें ।
ईशनिर्मित तितुकेंही आलें ।
रूप येक उपलक्षण केलें । परी ईश द्वैताहुनीं भिन्न ॥९४॥
गुणदोष म्हणजे जीवें केलें । जितुकें कल्पून भोग्या आणिलें ।
तितुकियाहूनही चिद्रूप संचलें । विकारलें नाहीं ॥९५॥
तेंचि व्यापून सर्वा असे । पदार्थमात्र त्याहून न दिसे ।
घटीं कीं जलीं आकाश जैसें । तेवीं रसादि विकल्पीं ॥९६॥
हेंचि आता प्रांजळ करूं । पदार्थमात्र विवेचनें विवरूं ।
ध्वनितार्थें कळावया निर्धारू । व्यतिरेक अन्वयाचा ॥९७॥
रूप म्हणजे आदिकरून । पंचविषयात्मक संपूर्ण ।
या पांचांपरता पदार्थ अन्य । त्रिभुवनीं नाहीं ॥९८॥
रूप तितुकें ईशनिर्मित । जडचंचलादि समस्त ।
एक रूपाचा करितां संकेत । नाम वेगळे घेणें नको ॥९९॥
नामरूप तितुकी माया । आदिकरून तृणांत कार्या ।
व्यापून चित्प्रभा जे अद्वया । सर्वां ऐशी नव्हे ॥१५००॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-19T22:14:28.2470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चार जणांची आई, बाजेवर जीव जाई

  • एकाच कामात चौघे पाहणार असल्‍यास ते एकमेकांच्या भरंवशावर राहतात व काम नासते असा भावार्थ. चौघे मुलगे असून आईचा प्राण बाजेवरच गेला. कारण प्रत्‍येक जणाने दुसरा भाऊ उपचार करील असे मनात आणून स्‍वतः वैद्य आणण्याचे किंवा औषध देण्याचे काम केले नाही. यामुळे आईस मुळीच औषधोपचार पोचला नाही, किंवा मरतांना तिला घोंगडीवर कोणी काढले नाही. 
RANDOM WORD

Did you know?

जेवण उष्टे सोडून अन्नाचा अपमान करणार्याला विविध शास्त्र, पुराणात काय शिक्षासांगितली आहे कृपाया संदर्भासह स्पष्ट करणे .
Category : Vedic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.