दमयंती स्वयंवर - पृष्ठ २३

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

वारा अरूपधर रूप नसेच कामा । तोही पहा परिसतेच अनेक नामा ॥

या पाहते तुज मनोहर रूपधेया । कर्णाभिराम करवी निज नामधेया ॥२२१॥

गीति

'मी वासुदेव,' ऐसे स्वनाम मुरहर वदे सकळ-वेदी ।

आधार तोचि मानुनि निजाभिधानासि कवण न निवेदी? ॥२२२॥

वोव्या

बोले नैषधेंद्र वाचा । "नाम हेजीब इंद्राचा ।

किती आक्षेप नामाचा । काय तेणे करिसी ॥२२३॥

केला काय अंगीकार । बोलू इंद्रासी निर्धार"

तव बोले सुकुमार । चंद्राकारवदना ॥२२४॥

वसंततिलका

"ऐरावतावरि बसोनि विमानदेशी । जो संचरे सुरपती सुखसंपदेसी ।

मी भूमिकेवरि असोनि तया चुनाही । मागावया तरि कसी मज लाज नाही? ॥२२५॥

वोव्या

नळावेगळा भर्तार । नलगे स्वपनीही साचार ॥

ऐसा निश्चय विचार" । तव राजेंद्र बोलतो ॥२२६॥

"टाकुनि इंद्राचा संभ्रम । धरिसि का हा नळभ्रम ।

जाईल विश्राम विभ्रम । नसता श्रम होईल ॥२२७॥

तुझे सौंदर्य पाहाया । धरी सहस्त्राक्ष काया ॥

तया वरी देवराया । नळमाया टाकुनी ॥२२८॥

अथवा जो तुला मोहला । होऊ नेदी नैषधाला ॥

यास्तव याच इंद्राला । माळ गळा घालावी ॥२२९॥

वसंततिलका

येणेपरीच अनळासि यमाधिपासी । पाशीसही तरि वरू वदता नृपासी ॥

आधार लेश न वदे नवसारसाक्शी । हो ते तयासि सुरनायक गुप्त साक्षी ! ॥२३०॥

ऐसा अवंचक वदोनि नृपाळ आला । इंद्रादिकांसहि निवेदित वृत्त जाला ॥

पाचारिले मग महींद्र विदर्भभूपे । आले समस्तहि सभेस सहर्षरूपे ॥२३१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP