दमयंती स्वयंवर - पृष्ठ १३

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


दण्डी

"नळे तुजसी एकांत काय केला । तोचि ऐकाया जीव हा भुकेला ।

तया बोले निववी या भुकेला । 'आइका हे!' मज म्हणुनि; नायिकेला ॥१२४॥

निषधराजी हे फार दिसे राजी । असे हंसे जाणोनि मनामाजी ॥

बोलिजेली नळराजकथा हे जी । भला हेजीव तया म्हणे हे जी ॥१२५॥

"नळासी जो एकांत तुझा तो का । प्रकट कीजे म्यां सांग इतर लोका? ॥

धन्य डोळे हे करुनि तवालोका । नळकथेने हे कर्ण धन्य हो कां" ॥१२६॥

"नळ म्हणाला मज धरुनि सरळ बाही । 'तुला कोठेही बंक अटक नाही ॥

सकळ भुवने तरि फिरुनि राजगेही । एक नवरी मज योग्य बरी पाही' ॥१२७॥

वसंतलतिका

एकांत हाच वदलो तुज जाण बाळे । तू सांग जो वर तुला रुचला रसाळे !" ॥

येणेपरी परिसतांच तया अनन्या । हे बोलते चतुर सुंदर राजकन्या ॥१२८॥

"मी जाण देवनळही स्वकरी धराया । मागेन काय चतुरा मज लाज जाया ॥

काळे करूनि मुख जो वर होय लेखी" । हे बोलणे खग मनी उभयार्थ लेखी ॥१२९॥

स्त्रग्विणी

श्लेषशब्दे इणे भाव सांगीतला ।

नैषधाधीश तो नाथ मागीतला ॥

होय जाणीतली हे त्रपाकंचुला ।

हंस बोलावया हालवी चंचुला ॥१३०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP