दमयंती स्वयंवर - पृष्ठ २

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


दण्डी

असी अगणन गुणकीर्ति नैषधाची । फिरे भुवनत्रय जान्हवीच साची ॥

असे असता द्विज सातपांच याची । भेटि घेती विदर्भराजयाची ॥११॥

द्वारी झुलोत गजसंघ हिंसोत तेजी । गाजी तुला सकल लोक असोत राजी ॥

सोमाभिरामवदना सदनांतरंगी । क्रीडा करो तुजसवे ललना पलंगी ॥१२॥

दण्डी

अशा आशीर्वादासि तिही केले । भीमभूपे मग तया बोलिजेले ॥

तुम्ही आला कोथूनि अशा बोले । द्विजी निषधापासाव म्हणीजेले ॥१३॥

भीमभूपाळ गिरा वदे ऐसी । निषधदेशी नळराजरीति कैसी ॥

ऐसे ऐकोनी वदति विप्र यासी । विप्रयासी वक्‍तृत्व ये जयांसी ॥१४॥

वसंततिलका

हे वामनैकपदा भूमि, नसोनि जंघी । एके दिनीच रविसूत नभास लंघी ॥

वार्राशि वानरविलंघित होय तो की । लोकी नसे नलमनस्तुलना विलोकी ॥१५॥

शा०वि०

जो पाहे सदसद्विचार ह्रदयी जोपा जनाची करी ।

जो पावे समयी विशेष गणिला जो पावनाभीतरी ॥

सोपा जो सकळा द्विजा सुमतिचा सोपा सदा लाभतो ।

कोपातें न धरीच तो नळ महीगोपायिता शोभतो ॥१६॥

जो धैर्ये धरदा, सहस्त्रकरसा तेजे तमा दूरसा ।

जो रत्नाकरसा गभीर, शिरसा भूपां यशें हारसा ॥

ज्ञाता जो सरसावलाच सरसांमाझारि श्रृंगारसा ।

शोभे तामरसाक्ष तो नळ रसानाथ स्तवू फारसा ॥१७॥

दण्डी

अशी होता नळचरितकथा काही । भीमनाभा भूपाळ परिसता ही ॥

जवळि होत लडिवाळ जे सदाही । सुता दमयंती नाम जीस पाही ॥१८॥

मालिनी

निषधपतिकथा हे जे सुधेते जयंती ।

परिसुनि दमयंती रंजली रंजयंती ॥

नवल मज न भासे चंद्रवंशैकशाली ।

नळ तरि वनमाळी भीमजा हेचि जाली ॥१९॥

माल्यभारा

नळराजकथा सुधाचि साजे । दमयंती वरवर्णिनी विराजे ॥

मिळनी उभयांसि होय जेथे । अधिकारी अधिकानुराग तेथे ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP