दमयंती स्वयंवर - पृष्ठ ४

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

गंगातरंगसम जो निज देहवर्णी । भृंगापरी रुचिर कांति जयासि कर्णी ॥

जंघाल जो पवनसंगतिची सवे घे । श्रृंगारिला हय तयावरि भूप वेधे ॥३१॥

जो अंबरी उफळता खुर लागलाहे । तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे ॥

जो या यशास्तव कसे धवलत्व नेघे? । श्रृंगारिला हय तयावरि भूप वेघे ॥३२॥

दण्डी

सवे सेना भूपाळ निघालाहे । सीम लंघी उद्यान येक पाहे ॥

रिघे तेथे मित सेवकांसि बाहे । फौज सारी बाहेर उभी राहे ॥३३॥

दण्डी

फनस जंबू जंबीर विविध निंबे । कुंद चंदन माकंद दाऽलिंबे ॥

तुंग नारिंगे विकसली कदंबे । वसति जेथे शुकसारिकाकदंबे ॥३४॥

वंशस्थ

लतेतळी रुंद निरुंद कालवे । गळोनि तेथे मकरंद कालवे ॥

परागही सांद्र तयात रंगती । फुलांसवे भृंगतती तरंगती ॥३५॥

गीति

उपरी कंटक साचे परंतु साचे जयात सुरसाचे ।

घोस तसे फणसांचे षण्मासांचे कितेक वरसाचे ॥३६॥

उपेंद्रवज्रा

तया वनी एक तटाक तोये । तुडुंबले तामरसानपाये ॥

निरंतरामंद मरंद वाहे । तपांतही यास्तव रिक्त नोहे ॥३७॥

द्रुतविलंबित

अमृतही पयही म्हणवीतसे । उभय होय तसी रुचि वीतसे (ब) ॥

मधुर सारस ते जल गा तसे । मधुर सारस यास्तव गातसे ॥३८॥

वसंततिलका

वीता मरंद उदरंभर बंभराचे । जे होय मंदिरहि सुंदर इंदिरेचे ॥

ते पद्म जेथिल सहस्त्रदळा धरिते । प्रत्येक सूरकिरणास विकासवीते ॥३९॥

दण्डी

तया सरोवरि राजहंस पाहे। राजहंसाचा कळप पोहताहे ॥

तयासाठी हे वापिकाच पोहे । नळे केली हे कोण म्हणे नोहे? ॥४०॥

तया हंसांचे देह काञ्चनाचे । पक्ष झळकति वीज जसी नाचे ॥

रंग माणीक चंचुचे पदाचे । जसे अधरराग भीमकन्यकेचे ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP