दमयंती स्वयंवर - पृष्ठ २२

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वसंततिलका

"आहेस की सुखवती कमनीय-लीले । निश्चिंत की ह्रदय होय तुझे सुशीले ॥

आतां नकोच अवलंब विलंबनाचा । हेजीव मी समज मुख्य, सुराधिपाचा ॥२११॥

स्वागता

जो धरी निजकरी शतकोटी । ज्यासि नम्र सुमनः शतकोटी ॥

तो सुरेंद्रही तुला नत याची । हा असो वर तुला न तयाची ॥२१२॥

वोवी

तया इंद्रा करी धरी । अथवा तयाचे सेजारी ॥

नांदे तेजोनिधि भारी । तया वरी राजसे ॥२१३॥

तोही येना जरी मना । तरी वरावे शमना ॥

अथवा करूनि करुणा । त्या वरुणा वरी की" ॥२१४॥

ऐसे बोलता भूपाळ । काय बोलते वेल्हाळ ।

"का हो बोलता पाल्हाळ । नाम कुळ सांगा का ॥२१५॥

वसंततिलका

बोले नृपाळ, "पुससी मज वंश-नामे । यावीण सांग तटली तुझि काय कामे? ॥

आलो सुधांशुमुखि, जे घटना कराया । तीते विचारुनि वरी सुरलोकराया ॥२१६॥

वोवी

बोले सुंदरी तयासी । 'वंशनाम न सांगसी ॥

तरी आम्ही परपुरुषासी । वदणे मर्यादा नोहे' ॥२१७॥

तिचा पाहुनिया कोप । काय बोले महाभूप ।

"चंद्रवंशाचे हे रोप । माझे रूप राजसे ॥२१८॥

महाजनाचा आचार । निजनामाचा उच्चार ।

करू नये हे साचार । शास्त्राधार आहे की" ॥२१९॥

पुन्हा बोलते सुंदरी । "चंद्रवंशी महीवरी ।

बहुत आहेत तेपरी । नाम घेता जाणावे ॥२२०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP